ANU SWAPN BLOG
  • Home
  • Home
  • Articles
  • Poems
  • Image Quotes
  • Tech and Educational
  • About Us

Fathers day Special/"बाबा" इज ग्रेट मॅन

 June 20, 2020     article     2 comments   



 
Fathers Day Quote
fathers day
 
"बाबा" इज ग्रेट मॅन 
"आई म्हणजे आपल्या दुःखांशी लढणारी 
तलवार असली तरी 
बाबा म्हणजे आपल्यावर दुःखच येऊ नये म्हणून 
सामोरी जाणारी ढाल आहे "

आवर्जून सांगावस वाटलं आपल्या आयुष्यातल्या "बाबा" या व्यक्तिमत्त्वाबद्दल म्हणून हा लेख लिहीत आहे. आजपर्यंत बरेच लेख हे आईची महती सांगतात.... पण बाबांबद्दल लिहिणारे व बोलणारे खूपच कमी लोक आहेत... खरंतर आपलं भावविश्व म्हणजे आपली "आई" कारण आपण सतत तिच्या सानिध्यात असतो.... पण बाबा आपल्यापाशी कमीच असतो.... कारण तो आपल्या गरज पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस काबाडकष्ट करत असतो.... आपल्या आयुष्यामधील इंद्रधनुष्यात सुखाचे रंग भरण्यासाठी त्याची अत्यंत धडपड चालू असते..... 

जेव्हा एखाद्या पुरुषाला कळत कि आपण वडील होणार आहोत.... तेव्हापासूनच तो आपल्याशी जोडला जातो... जरी नाळ जोडली नसली तरी मनाशी एकरूप होणारी एक प्रेमळ डोर बंधन म्हणून असते.... इवल्याशा जीवाला जेव्हा तो पहिल्यांदा हातात घेतो, तेव्हा तो स्पर्श म्हणजे त्याला एक स्वर्गसुखासारखेच असते.... त्यावेळी त्याला जबाबदारीची जाणीवही होते.... 

जन्मानंतर मुलांबरोबर त्याचा पुढचा प्रवास चालू होतो.... बाबा आपल्या बाळाला हाताचे बोट धरून चालायला शिकवतात ... ज्यावेळी मुलं त्याच्या आधाराशिवाय चालू लागते, तेव्हा त्याच्या आनंदाला पारावार नाही राहत... कामावरून दमून भागून आला तरी मुलांसोबत खेळायला त्याचा उत्साह दांडगाच असतो.... तो कधी बॅडमिंटन शिकवतो, तर कधी सायकल शिकवतो.... कॅरम, बुद्धिबळाचा डावही शिकवतो.... 

समजा, एखादा दिवस आई नसली घरात आणि आपल्या मुलाला भूक लागली असेल तर नकाशाच्या आकाराचे ऑम्लेट किंवा सोप्यातलं सोपं सँडविचहि करून देतो.... 

जसेजसे मुलं मोठं होऊ लागत.... तसतशा मुलांच्या गरजाही वाढतात.... त्यांना हवी ती गोष्ट आणून देण्यासाठी तो डबल शिफ्टमधसुद्धा काम करतो.... मुलांना शिकवून परदेशी पाठवण्यासाठी आपल्या फंडातून कर्ज काढतो... व ते कर्ज आयुष्यभर फेडत राहतो.... 

कधी आपल्या मुलाच्या हातून चूक घडल्यास रागावतोही.... कन्येचा कन्यादान करताना मन त्याच भरून आलेलं असत पण चेहऱ्यावर दाखवत देखील नाही.... पण ती गेल्यानंतर मात्र आईच्या खांद्यावर डोकं ठेवून आसवं गाळतो.... 

फक्त त्याची एकच ईच्छा असते कि, आपल्या मुलांनी  शिकावं, देशाचे चांगले नागरिक व्हावं.... मुलांनी आपलं नाव उज्ज्वल करावं... 

असा हा कष्टकरी, प्रेमळ, दयावान, भिन्नरूपी बाबा कि त्याच्यासाठी शब्दच अपुरे....  

वरील माहिती आवडल्यास नक्कीच शेअर करा.. कंमेंट करा... लायक करा... धन्यवाद 
फोटो सौजन्य : गुगल क्रोम 

© Anu Swapn Blog 2020-2021

Read More
  • Share This:  

Sad love quote / विरह

 June 07, 2020     poem, Quote     3 comments   


love poem
sad love poem 

विरह 


जरी असलास दूर मजपासून,
प्रियतमा तुझी वाट पहाटे मी.... 
कधी येशील परत फिरुनी,
या आशेवर जगते मी.... 

कधी देशील साथ मला,
या कल्पनेवर खुलते मी.... 
तुझे स्वप्न नयनी साठवून,
सुखी स्वप्न अनुभवते मी.... 

आठवणींचा साठा घेऊनि डोळ्यांत,
तुझ्याच साठी झुरते मी.... 
परी होतात भास तुझ्या अस्तित्वाचे,
त्यात प्रेमाची गोडी अनुभवते मी.... 

दुःख साठवूनी मनात विरहाचे,
घाव हृदयी झेलते मी.... 
येशील जीव लावल्या माझ्या प्राणाला,
या विश्वासालाच सुख मानते मी.... 
या विश्वासालाच सुख मानते मी.... 
 


Read More
  • Share This:  
Newer Posts Older Posts Home

Popular Posts

  • FARMER POEM एका शेतकऱ्याचे मनोगत
  • Sad love quote / विरह
  • BEST BLOGGING NICHE 2021
  • # मधुमिता - एक भयकथा - अंतिम भाग# - horror stories in marathi
ANU SWAPN BLOG

Translate

Categories

  • article
  • International women's day 2021
  • Love Quotes in Marathi
  • poem
  • Quote
  • Tech & Educational

Blog Archive

  • May 2022 (1)
  • March 2022 (1)
  • April 2021 (1)
  • March 2021 (3)
  • February 2021 (1)
  • November 2020 (1)
  • September 2020 (5)
  • August 2020 (5)
  • July 2020 (5)
  • June 2020 (2)
  • May 2020 (8)
  • April 2020 (3)

Anu Swapn blog

This blog is created for only entertainment and knowledge purpose.
Disclaimer | Contact us | Privacy Policy | Terms of us

Copyright © ANU SWAPN BLOG | Powered by Blogger