ANU SWAPN BLOG
  • Home
  • Home
  • Articles
  • Poems
  • Image Quotes
  • Tech and Educational
  • About Us

# मधुमिता - एक भयकथा - अंतिम भाग# - horror stories in marathi

 August 25, 2020     article     2 comments   



ANU SWAPN BLOG

मधुमिता - एक भयकथा - अंतिम भाग 


horror stories in marathi

मधुमिता भाग १ साठी खालील लिंकवर क्लिक करा 👇
 https://anuswap.blogspot.com/2020/07/MADHUMITA-PART1.html

मधुमिता भाग २ साठी खालील लिंकवर क्लिक करा 👇  
https://anuswap.blogspot.com/2020/07/Madhumita-Part2.html

मधुमिता भाग 3 साठी खालील लिंकवर क्लिक करा 👇  
https://anuswap.blogspot.com/2020/07/Madhumita-HorrorStory-Part3.html

मधुमिता भाग 4 साठी खालील लिंकवर क्लिक करा 👇  
https://anuswap.blogspot.com/2020/08/Madhumita-horror-stories-in-marathi-part4.html

मधुमिता भाग 5 साठी खालील लिंकवर क्लिक करा 👇 
https://anuswap.blogspot.com/2020/08/Madhumita-bhag5-horror-stories-in-marathi.html

मधुमिता भाग 6 साठी खालील लिंकवर क्लिक करा 👇 
https://anuswap.blogspot.com/2020/08/MadhumitaBhat6-horror-stories-in-marathi.html

मधुमिता भाग ७ साठी खालील लिंकवर क्लिक करा 👇 
https://anuswap.blogspot.com/2020/08/MadhumitaBhag7-Horror-story-in-marathi.html

आता सर्वजण पुढील तयारीला लागले... पोलीस इन्स्पेक्टर संजय यांनी सांगितल्याप्रमाणे काकांनी विजूला फोन लावला...  

काका विजूला म्हणाले, " विजू इतक्या दिवस तिकडे मुंबईच्या आपल्या ऑफिसमध्ये बसून काय करत आहेस??? इकडे गावाकडील किती कामे खोळंबली आहेत... इथे जागेच्या संदर्भात भेटायला एक पार्टी आली होती... आणि त्यांना भेटण्यासाठी इथे मला यावं लागलं... त्यामुळे तू इकडे लवकर ये.... कामाचा खूप खोळंबा व्हायला लागलाय.... 

विजू म्हणाला, " काका मला वाटले इकडे शहरात खूप काम असेल म्हणून मी इकडे थांबलो होतो... आता तुम्ही म्हणताय म्हणून येतो.... "

काका विजूला म्हणाले, " अरे तू बाथरूम मला न विचारता का दुरुस्त केलस.... मला बोलावलं असत तर मी तिकडून माझी लोक पाठवून दिली असती... आणि बाथरूम दुरुस्ती करून घेतली असती... कशाला त्रास घेतलास इतका???"

विजू आता त त प प करू लागला.... त्याला काहीच सुचेना आता ह्यांना काय सांगायचे ते... मग तो म्हणाला काय करायचे काका चोक अप झालं होत म्हणून म्हंटल जरा दुरुस्त करून घ्यावं इतकच... 

काका विजूला म्हणाले, " आजच निघ गावाकडे यायला.... "

अविनाश काकांना म्हणाला, " मनोहर काकांनाही बोलावून घेऊ इकडे... दोन तीन दिवस शहरात काहीतरी काम आहे म्हणून सांगून गेले आहेत ते अजून नाही आले... " मनोहर काकांनाही फोन करून बोलावून घेतले.... 

आज रात्रीच ह्या गोष्टींचा उलघडा करायचा हे ठरवूनच इन्स्पेक्टर संजय यांनी आपल्याबरोबर हवालदार व इत्तर पोलिसांना बोलावून घेतले होते... आता फक्त सावजाला अडकवायचे इतकेच बाकी राहिले होते.... विजू काकांचा फोन झाल्या झाल्या ताबडतोब निघाला नि संध्याकाळीच तिकडे पोहोचला... गावी पोहोचल्यानंतर फार्महाऊसकडे आला.... काका त्याचीच वाट पाहत होते... आणि बाकी सर्वजण तिथेच होते... मनोहर काकाही आले होते आणि त्यांनी सर्वांची रात्रीच्या जेवणाची तयारी करून ठेवली होती... 

विजूने सर्वांना पहिले आणि म्हणाले अरे वाह! सर्वजण आहेत इकडे.... इतक्या दिवसांनी अविनाशला बघून खूप आनंद झाला... 

अविनाश विजूला म्हणाला, " हो का आम्हालाही तुम्हाला बघून खूप आनंद झाला.... आज रात्रीची तर तयारी खूप सुंदर करून ठेवलीय तुमच्यासाठी... म्हणजे आम्ही सर्वजण मिळून एक गेम खेळणार आहोत... आणि तुम्हालाही त्या गेममध्ये सामील करून घेणार आहोत... 

विजू म्हणाला, " वाह वाह... म्हणजे बरेच दिवसांनी नवीन काहीतरी शिकायला मिळणार वाटत मला... बर गेम कोणता आहे??? नाव तरी कळेल का... "

अदवैत्य म्हणाला," ते सरप्राईझ आहे.... तुम्हाला रात्रीच कळेल... "

अविनाश मनातल्या मनात म्हणाला, " बघा तर खरं आज चांगला धडाच शिकवतो तुम्हाला... "

मनोहर काका विजूला म्हणाले, "  विजू इतके दिवस कुठे होतास... मुले इकडे येणार होती हे तुला माहिती असूनही तू निघून गेलास... मुलांना सतत काहीना काही लागत असते आणि तू मात्र निघून गेलास... आता मी थकलोय, मला आता जास्त काम नाही जमत.... तू थांबायला हवं होतस इथे... " 

विजू मनोहर काकांना म्हणाला, " आता मी इथे आलोय ना... मी बघतो काय करायचं ते... "

रात्रीचे जेवण झाले... सर्वजण पोलीस इन्स्पेक्टर संजय यांनी सांगितल्याप्रमाणे विजूशी व्यवस्थित वागत होते.... नंतर गप्पागोष्टी झाल्यानंतर.... विजू म्हणाला आपण काहीतरी गेम खेळायचा होता त्याचे काय झाले... 

अविनाश म्हणाला तो गेम रात्री बारानंतर खेळायचा असतो... 

विजू म्हणाला असला कसला गेम आहे??? 

click on below image for getting best products


अदवैत्य म्हणाला, "आहे तुला दाखवतो रात्री बारानंतर"

रात्रीचे घड्याळात बाराचे ठोके पडले.... आणि पोलिसांनी बाहेरून फार्महाऊसच्या सर्व दरवाजांच्या कड्या घातल्या कारण विजू पळून जाण्याची शक्यता होती.... 

इकडे अदवैत्यचे बाबा मधुमिताला शांत ठेवण्यासाठी गेस्ट हाऊसमध्ये काही मंत्र म्हणत होते... कि जेणेकरून ते मंत्र ऐकून मधुमिता शांत राहील आणि विजूला काही करू शकणार नाही.... इकडे अदवैत्यने सर्वांना प्लँचेट खेळण्यासाठी बसविले... विजू म्हणाला हा कसला खेळ??? अदवैत्य म्हणाला हा खेळ खेळून आपण आपल्या आजूबाजूंच्या अतृप्त आत्म्यांना बोलावू शकतो.... विजू म्हणाला, " मला नाही खेळायचा असला खेळ..." पण काका म्हणाले कि तुला आता आमच्याबरोबर हा खेळ खेळावाच लागेल.... परत अदवैत्याने कुंकवाचे रिंगण काढले... सर्वांना ग्लासवर बोट ठेवायला लावले.... लाईट्स घालवल्या आणि पुन्हा तो, आत्म्याला बोलावू लागला.... विजू आधी थोडा घाबरला होता... परत खिडक्या उघडझाप होऊ लागल्या.... परत हॉल मधील खुर्च्यांनी, टेबलांनी आपली जागा सोडली, घड्याळाचा काटा १ वाजून ३० मिनिटापाशी जाऊन अडकला.... आणि अक्राळविक्राळ रूप घेऊन मधुमिता तिथे प्रकट झाली... तसा विजू घाबरला आणि इकडेतिकडे पळू लागला.... 

मधुमिताचे हे रूप पाहून मनोहर काका जागीच बेशुद्ध झाले... 

मधुमिता विजूला म्हणाली , " ओळखलस का मला??? बघितलंस घड्याळात किती वाजलेत ते.... ह्या वेळीच तू मला, माझ्या नवऱ्याला आणि माझ्या न झालेल्या बाळाला निर्दयीपणे मारलस... आता मी तुला नाही सोडणार.... तुला मारून टाकणार... 

अविनाश मधुमिताच्या आत्म्याला म्हणाला, " तू आम्हाला वचन दिले होतेस कि तू विजूला काही करणार नाहीस म्हणून... 

पण मधुमिताची सूडबुद्धी हि सर्वांच ऐकण्याच्या पलीकडे गेली होती... अदवैत्यने त्याच्या बाबांना फोन करून सांगितलं कि मधुमिता ऐकेना झालीय... तसे अदवैत्याच्या बाबांनी त्याच्यापेक्षा कडक मंत्र उच्चार करायला सुरुवात केली... आणि मधुमिता शांत झाली... विजूला म्हणाली सांग त्या मुलींसोबत तू काय केले आहेस??? तू सांगितलं नाहीस तर बघ मी तुझा जीवच घेते... विजू मधुमिताला म्हणाला, " हो सांगतो आम्ही त्यांना शहरात नेऊन विकत होतो.... त्यांना चुकीच्या गोष्टी करायला भाग पाडत होतो.... आणि काही मुलींना परदेशात गुलामी करायला पाठवले आहे... परदेशातून हि खूप पैसा मिळत असे आम्हाला... 

मधुमिता विजूला म्हणाली, "मला आणि माझ्या नवऱ्याला कसे मारले हे सांग... तुझ्या साथीदारांची नावे सांग " 

विजूने त्यांची कशी हत्या केली आणि कुठे त्यांना नेऊन पुरले हे सांगितले... तसेच त्याच्या साथीदारांची हि नावे सांगितली... "

इतक्यात पोलिसांनी दरवाजाची कडी काढली व ते आत आले आणि त्यांनी विजूला पकडले... 

विजू पोलिसांना म्हणाला, " विना पुराव्याच तुम्ही मला असे नाही पकडू शकत..."

पोलीस इन्स्पेक्टर संजय विजूला म्हणाला, " आम्ही तुला पकडण्यासाठी आधीच सापळा रचला होता... ह्या  फार्महाऊसमध्ये सगळीकडे कॅमेरे लावले होते... आणि जे जे बोललास ते ह्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झाले आहे... आणि चल आता दाखव आम्हाला तू सुभाषला आणि मधुमिताला कुठे गाडले आहेस ते दाखव... पोलीस विजू सांगेल त्या ठिकाणी घेऊन गेले... त्या दोघांचे मृतदेह उकरून बाहेर काढले... सुभाषचा मृतदेह काढून त्यांनी इकडे फार्महाऊसकडे आणला... 

अविनाश मधुमिताला म्हणाला, " मधुमिता ताई झालं ना तुझ्या मनासारखं... "

मधुमिता म्हणाली, " हो झालय माझ्या मनासारखे.... पण माझा आत्मा एकाच गोष्टीसाठी तळमळत आहे कि मला शेवटपर्यंत सुभाषला सांगता नाही आले कि तो बाबा होणार होता ..."

अदवैत्य म्हणाला, " सांग ना मग... मी त्याचाही आत्मा बोलावून घेतो... "

परत प्लँचेट खेळून सर्वांनी सुभाषच्या आत्म्याला बोलावून घेतले.... सुभाषच्या आत्मा तिथे आला... मधुमिताने त्याला तिच्या मनातले सर्व सांगितले... इकडे मनोहर काकाही शुद्धीवर आले होते.... ते हि हुमसून हुमसून रडले... 

मधुमिता मनोहर मामाला म्हणाली, "रडू नकोस मामा... मी सदैव तुझ्या आठवणीत राहीन... फक्त मला आणि सुभाषला आता मुक्ती हवी आहे..."  अदवैत्यच्या बाबांनी आधीच सर्व तयारी केली होती... त्यांनी एक होम पेटवून मंत्र उच्चार करून... त्यांना मुक्ती मिळावी अशी देवाकडे प्रार्थना केली आणि शिवमंदिरातून आणलेले अभिषेकाचे पाणी त्यांच्या आत्म्यांवर आणि मृतदेहांवर शिंपडले... पाणी पडल्या पडल्याचं त्यांचे आत्मे मुक्त झाले... 

जगदीश सोबत घेऊन गेलेला कॅमेराही सुरु झाला... पोलीस इन्स्पेक्टर संजयने सर्व पुरावे कोर्टात सादर केले आणि विजूच्या सर्व साथीदारांना पकडले... कोर्टाने सर्वांना शिक्षा केली... आणि सर्व मुलींना जिथे असतील तेथून सोडवून आणण्याचे आदेश पोलिसांना दिले.... 

अविनाशच्या आणि त्याच्या मित्रमैत्रिणींच्या पालकांना ह्या सर्व गोष्टी कळाल्या.... सर्वांना मुलांचा अभिमान वाटला... पण मधुमिता आणि तिचा पती ह्यांचा मृत्यू हा सर्वांच्या मनाला चटका लावणारा होता.... अविनाशचे आणि इतर सवंगड्यांचे पालक गावाकडे पोहोचले... अविनाशच्या काकांनीच त्यांना बोलावून घेतले होते.... त्यांनी मुलांचं सुरप्राइझ अविनाशच्या आई बाबांना सांगितलं.... 

अविनाशचे आई बाबा म्हणाले की आमच्या लग्नाचा वाढदिवस तुम्हाला करायचा आहे ना तो तुम्ही साजरा करा पण आपल्याला  मधुमिताची आठवण सतत येत राहावी यासाठी आपण आपल्या फार्महाऊसला एक नाव देऊ... सर्वजण एका दमात म्हणाले कोणत????

अविनाशचे आई बाबा म्हणाले "मधुमिता"....  ( आणि सर्वांनी होकाराच्या माना डोलावल्या... इकडे पोलिसांनी सर्व मुलींची सुटका केली.... व ह्या सर्व बहादूर मुलांना इतकी मोठी काळ्या यादीत असलेली गुंडांची गॅंग पकडून दिल्यामुळे सरकारने बक्षीस जाहीर केले.... आणि सुभाष आणि मधुमिताला मरणोत्तर शौर्य पुरस्कारांनी सन्मानित केले.... )

समाप्त.... 

लेखिका - सौ. अनुष्का हणमसागर 
© Anu Swapn Blog
 


(टीप - वरील लेखाचे सर्व अधिकार हे लेखिकेकडे अबाधित आहेत.... जर कोणी हे लिखाण आपल्या लेखनात जसेच्या तसे वापरले तर कॉपी राईट होऊ शकते.... वरील लेखन हे कोणतीही अंधश्रद्धा पसरविण्यासाठी केले नाही... हि एक मनोरंजन कथा आहे... जरी लेखन शेअर करावयाचे असल्यास वेबसाईट लिंक सहित शेअर करावेत... ह्यातील व्यक्ती आणि कथा काल्पनिक आहेत आणि जरी ह्या कोणाच्या आयुष्याशी मिळत्या जुळत्या असतील तर तो केवळ योगायोग समजावा... धन्यवाद)



  • Share This:  
Email ThisBlogThis!Share to XShare to Facebook
Newer Post Older Post Home

2 comments:

  1. SnehalAugust 28, 2020 at 2:43 PM

    👍

    ReplyDelete
    Replies
      Reply
  2. ANU SWAPN BLOGAugust 28, 2020 at 9:42 PM

    Thanks

    ReplyDelete
    Replies
      Reply
Add comment
Load more...

Popular Posts

  • FARMER POEM एका शेतकऱ्याचे मनोगत
  • Sad love quote / विरह
  • BEST BLOGGING NICHE 2021
  • # मधुमिता - एक भयकथा - अंतिम भाग# - horror stories in marathi
ANU SWAPN BLOG

Translate

Categories

  • article
  • International women's day 2021
  • Love Quotes in Marathi
  • poem
  • Quote
  • Tech & Educational

Blog Archive

  • May 2022 (1)
  • March 2022 (1)
  • April 2021 (1)
  • March 2021 (3)
  • February 2021 (1)
  • November 2020 (1)
  • September 2020 (5)
  • August 2020 (5)
  • July 2020 (5)
  • June 2020 (2)
  • May 2020 (8)
  • April 2020 (3)

Anu Swapn blog

This blog is created for only entertainment and knowledge purpose.
Disclaimer | Contact us | Privacy Policy | Terms of us

Copyright © ANU SWAPN BLOG | Powered by Blogger