ANU SWAPN BLOG
  • Home
  • Home
  • Articles
  • Poems
  • Image Quotes
  • Tech and Educational
  • About Us

# मधुमिता - एक भयकथा - अंतिम भाग# - horror stories in marathi

 August 25, 2020     article     2 comments   



ANU SWAPN BLOG

मधुमिता - एक भयकथा - अंतिम भाग 


horror stories in marathi

मधुमिता भाग १ साठी खालील लिंकवर क्लिक करा 👇
 https://anuswap.blogspot.com/2020/07/MADHUMITA-PART1.html

मधुमिता भाग २ साठी खालील लिंकवर क्लिक करा 👇  
https://anuswap.blogspot.com/2020/07/Madhumita-Part2.html

मधुमिता भाग 3 साठी खालील लिंकवर क्लिक करा 👇  
https://anuswap.blogspot.com/2020/07/Madhumita-HorrorStory-Part3.html

मधुमिता भाग 4 साठी खालील लिंकवर क्लिक करा 👇  
https://anuswap.blogspot.com/2020/08/Madhumita-horror-stories-in-marathi-part4.html

मधुमिता भाग 5 साठी खालील लिंकवर क्लिक करा 👇 
https://anuswap.blogspot.com/2020/08/Madhumita-bhag5-horror-stories-in-marathi.html

मधुमिता भाग 6 साठी खालील लिंकवर क्लिक करा 👇 
https://anuswap.blogspot.com/2020/08/MadhumitaBhat6-horror-stories-in-marathi.html

मधुमिता भाग ७ साठी खालील लिंकवर क्लिक करा 👇 
https://anuswap.blogspot.com/2020/08/MadhumitaBhag7-Horror-story-in-marathi.html

आता सर्वजण पुढील तयारीला लागले... पोलीस इन्स्पेक्टर संजय यांनी सांगितल्याप्रमाणे काकांनी विजूला फोन लावला...  

काका विजूला म्हणाले, " विजू इतक्या दिवस तिकडे मुंबईच्या आपल्या ऑफिसमध्ये बसून काय करत आहेस??? इकडे गावाकडील किती कामे खोळंबली आहेत... इथे जागेच्या संदर्भात भेटायला एक पार्टी आली होती... आणि त्यांना भेटण्यासाठी इथे मला यावं लागलं... त्यामुळे तू इकडे लवकर ये.... कामाचा खूप खोळंबा व्हायला लागलाय.... 

विजू म्हणाला, " काका मला वाटले इकडे शहरात खूप काम असेल म्हणून मी इकडे थांबलो होतो... आता तुम्ही म्हणताय म्हणून येतो.... "

काका विजूला म्हणाले, " अरे तू बाथरूम मला न विचारता का दुरुस्त केलस.... मला बोलावलं असत तर मी तिकडून माझी लोक पाठवून दिली असती... आणि बाथरूम दुरुस्ती करून घेतली असती... कशाला त्रास घेतलास इतका???"

विजू आता त त प प करू लागला.... त्याला काहीच सुचेना आता ह्यांना काय सांगायचे ते... मग तो म्हणाला काय करायचे काका चोक अप झालं होत म्हणून म्हंटल जरा दुरुस्त करून घ्यावं इतकच... 

काका विजूला म्हणाले, " आजच निघ गावाकडे यायला.... "

अविनाश काकांना म्हणाला, " मनोहर काकांनाही बोलावून घेऊ इकडे... दोन तीन दिवस शहरात काहीतरी काम आहे म्हणून सांगून गेले आहेत ते अजून नाही आले... " मनोहर काकांनाही फोन करून बोलावून घेतले.... 

आज रात्रीच ह्या गोष्टींचा उलघडा करायचा हे ठरवूनच इन्स्पेक्टर संजय यांनी आपल्याबरोबर हवालदार व इत्तर पोलिसांना बोलावून घेतले होते... आता फक्त सावजाला अडकवायचे इतकेच बाकी राहिले होते.... विजू काकांचा फोन झाल्या झाल्या ताबडतोब निघाला नि संध्याकाळीच तिकडे पोहोचला... गावी पोहोचल्यानंतर फार्महाऊसकडे आला.... काका त्याचीच वाट पाहत होते... आणि बाकी सर्वजण तिथेच होते... मनोहर काकाही आले होते आणि त्यांनी सर्वांची रात्रीच्या जेवणाची तयारी करून ठेवली होती... 

विजूने सर्वांना पहिले आणि म्हणाले अरे वाह! सर्वजण आहेत इकडे.... इतक्या दिवसांनी अविनाशला बघून खूप आनंद झाला... 

अविनाश विजूला म्हणाला, " हो का आम्हालाही तुम्हाला बघून खूप आनंद झाला.... आज रात्रीची तर तयारी खूप सुंदर करून ठेवलीय तुमच्यासाठी... म्हणजे आम्ही सर्वजण मिळून एक गेम खेळणार आहोत... आणि तुम्हालाही त्या गेममध्ये सामील करून घेणार आहोत... 

विजू म्हणाला, " वाह वाह... म्हणजे बरेच दिवसांनी नवीन काहीतरी शिकायला मिळणार वाटत मला... बर गेम कोणता आहे??? नाव तरी कळेल का... "

अदवैत्य म्हणाला," ते सरप्राईझ आहे.... तुम्हाला रात्रीच कळेल... "

अविनाश मनातल्या मनात म्हणाला, " बघा तर खरं आज चांगला धडाच शिकवतो तुम्हाला... "

मनोहर काका विजूला म्हणाले, "  विजू इतके दिवस कुठे होतास... मुले इकडे येणार होती हे तुला माहिती असूनही तू निघून गेलास... मुलांना सतत काहीना काही लागत असते आणि तू मात्र निघून गेलास... आता मी थकलोय, मला आता जास्त काम नाही जमत.... तू थांबायला हवं होतस इथे... " 

विजू मनोहर काकांना म्हणाला, " आता मी इथे आलोय ना... मी बघतो काय करायचं ते... "

रात्रीचे जेवण झाले... सर्वजण पोलीस इन्स्पेक्टर संजय यांनी सांगितल्याप्रमाणे विजूशी व्यवस्थित वागत होते.... नंतर गप्पागोष्टी झाल्यानंतर.... विजू म्हणाला आपण काहीतरी गेम खेळायचा होता त्याचे काय झाले... 

अविनाश म्हणाला तो गेम रात्री बारानंतर खेळायचा असतो... 

विजू म्हणाला असला कसला गेम आहे??? 

click on below image for getting best products


अदवैत्य म्हणाला, "आहे तुला दाखवतो रात्री बारानंतर"

रात्रीचे घड्याळात बाराचे ठोके पडले.... आणि पोलिसांनी बाहेरून फार्महाऊसच्या सर्व दरवाजांच्या कड्या घातल्या कारण विजू पळून जाण्याची शक्यता होती.... 

इकडे अदवैत्यचे बाबा मधुमिताला शांत ठेवण्यासाठी गेस्ट हाऊसमध्ये काही मंत्र म्हणत होते... कि जेणेकरून ते मंत्र ऐकून मधुमिता शांत राहील आणि विजूला काही करू शकणार नाही.... इकडे अदवैत्यने सर्वांना प्लँचेट खेळण्यासाठी बसविले... विजू म्हणाला हा कसला खेळ??? अदवैत्य म्हणाला हा खेळ खेळून आपण आपल्या आजूबाजूंच्या अतृप्त आत्म्यांना बोलावू शकतो.... विजू म्हणाला, " मला नाही खेळायचा असला खेळ..." पण काका म्हणाले कि तुला आता आमच्याबरोबर हा खेळ खेळावाच लागेल.... परत अदवैत्याने कुंकवाचे रिंगण काढले... सर्वांना ग्लासवर बोट ठेवायला लावले.... लाईट्स घालवल्या आणि पुन्हा तो, आत्म्याला बोलावू लागला.... विजू आधी थोडा घाबरला होता... परत खिडक्या उघडझाप होऊ लागल्या.... परत हॉल मधील खुर्च्यांनी, टेबलांनी आपली जागा सोडली, घड्याळाचा काटा १ वाजून ३० मिनिटापाशी जाऊन अडकला.... आणि अक्राळविक्राळ रूप घेऊन मधुमिता तिथे प्रकट झाली... तसा विजू घाबरला आणि इकडेतिकडे पळू लागला.... 

मधुमिताचे हे रूप पाहून मनोहर काका जागीच बेशुद्ध झाले... 

मधुमिता विजूला म्हणाली , " ओळखलस का मला??? बघितलंस घड्याळात किती वाजलेत ते.... ह्या वेळीच तू मला, माझ्या नवऱ्याला आणि माझ्या न झालेल्या बाळाला निर्दयीपणे मारलस... आता मी तुला नाही सोडणार.... तुला मारून टाकणार... 

अविनाश मधुमिताच्या आत्म्याला म्हणाला, " तू आम्हाला वचन दिले होतेस कि तू विजूला काही करणार नाहीस म्हणून... 

पण मधुमिताची सूडबुद्धी हि सर्वांच ऐकण्याच्या पलीकडे गेली होती... अदवैत्यने त्याच्या बाबांना फोन करून सांगितलं कि मधुमिता ऐकेना झालीय... तसे अदवैत्याच्या बाबांनी त्याच्यापेक्षा कडक मंत्र उच्चार करायला सुरुवात केली... आणि मधुमिता शांत झाली... विजूला म्हणाली सांग त्या मुलींसोबत तू काय केले आहेस??? तू सांगितलं नाहीस तर बघ मी तुझा जीवच घेते... विजू मधुमिताला म्हणाला, " हो सांगतो आम्ही त्यांना शहरात नेऊन विकत होतो.... त्यांना चुकीच्या गोष्टी करायला भाग पाडत होतो.... आणि काही मुलींना परदेशात गुलामी करायला पाठवले आहे... परदेशातून हि खूप पैसा मिळत असे आम्हाला... 

मधुमिता विजूला म्हणाली, "मला आणि माझ्या नवऱ्याला कसे मारले हे सांग... तुझ्या साथीदारांची नावे सांग " 

विजूने त्यांची कशी हत्या केली आणि कुठे त्यांना नेऊन पुरले हे सांगितले... तसेच त्याच्या साथीदारांची हि नावे सांगितली... "

इतक्यात पोलिसांनी दरवाजाची कडी काढली व ते आत आले आणि त्यांनी विजूला पकडले... 

विजू पोलिसांना म्हणाला, " विना पुराव्याच तुम्ही मला असे नाही पकडू शकत..."

पोलीस इन्स्पेक्टर संजय विजूला म्हणाला, " आम्ही तुला पकडण्यासाठी आधीच सापळा रचला होता... ह्या  फार्महाऊसमध्ये सगळीकडे कॅमेरे लावले होते... आणि जे जे बोललास ते ह्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झाले आहे... आणि चल आता दाखव आम्हाला तू सुभाषला आणि मधुमिताला कुठे गाडले आहेस ते दाखव... पोलीस विजू सांगेल त्या ठिकाणी घेऊन गेले... त्या दोघांचे मृतदेह उकरून बाहेर काढले... सुभाषचा मृतदेह काढून त्यांनी इकडे फार्महाऊसकडे आणला... 

अविनाश मधुमिताला म्हणाला, " मधुमिता ताई झालं ना तुझ्या मनासारखं... "

मधुमिता म्हणाली, " हो झालय माझ्या मनासारखे.... पण माझा आत्मा एकाच गोष्टीसाठी तळमळत आहे कि मला शेवटपर्यंत सुभाषला सांगता नाही आले कि तो बाबा होणार होता ..."

अदवैत्य म्हणाला, " सांग ना मग... मी त्याचाही आत्मा बोलावून घेतो... "

परत प्लँचेट खेळून सर्वांनी सुभाषच्या आत्म्याला बोलावून घेतले.... सुभाषच्या आत्मा तिथे आला... मधुमिताने त्याला तिच्या मनातले सर्व सांगितले... इकडे मनोहर काकाही शुद्धीवर आले होते.... ते हि हुमसून हुमसून रडले... 

मधुमिता मनोहर मामाला म्हणाली, "रडू नकोस मामा... मी सदैव तुझ्या आठवणीत राहीन... फक्त मला आणि सुभाषला आता मुक्ती हवी आहे..."  अदवैत्यच्या बाबांनी आधीच सर्व तयारी केली होती... त्यांनी एक होम पेटवून मंत्र उच्चार करून... त्यांना मुक्ती मिळावी अशी देवाकडे प्रार्थना केली आणि शिवमंदिरातून आणलेले अभिषेकाचे पाणी त्यांच्या आत्म्यांवर आणि मृतदेहांवर शिंपडले... पाणी पडल्या पडल्याचं त्यांचे आत्मे मुक्त झाले... 

जगदीश सोबत घेऊन गेलेला कॅमेराही सुरु झाला... पोलीस इन्स्पेक्टर संजयने सर्व पुरावे कोर्टात सादर केले आणि विजूच्या सर्व साथीदारांना पकडले... कोर्टाने सर्वांना शिक्षा केली... आणि सर्व मुलींना जिथे असतील तेथून सोडवून आणण्याचे आदेश पोलिसांना दिले.... 

अविनाशच्या आणि त्याच्या मित्रमैत्रिणींच्या पालकांना ह्या सर्व गोष्टी कळाल्या.... सर्वांना मुलांचा अभिमान वाटला... पण मधुमिता आणि तिचा पती ह्यांचा मृत्यू हा सर्वांच्या मनाला चटका लावणारा होता.... अविनाशचे आणि इतर सवंगड्यांचे पालक गावाकडे पोहोचले... अविनाशच्या काकांनीच त्यांना बोलावून घेतले होते.... त्यांनी मुलांचं सुरप्राइझ अविनाशच्या आई बाबांना सांगितलं.... 

अविनाशचे आई बाबा म्हणाले की आमच्या लग्नाचा वाढदिवस तुम्हाला करायचा आहे ना तो तुम्ही साजरा करा पण आपल्याला  मधुमिताची आठवण सतत येत राहावी यासाठी आपण आपल्या फार्महाऊसला एक नाव देऊ... सर्वजण एका दमात म्हणाले कोणत????

अविनाशचे आई बाबा म्हणाले "मधुमिता"....  ( आणि सर्वांनी होकाराच्या माना डोलावल्या... इकडे पोलिसांनी सर्व मुलींची सुटका केली.... व ह्या सर्व बहादूर मुलांना इतकी मोठी काळ्या यादीत असलेली गुंडांची गॅंग पकडून दिल्यामुळे सरकारने बक्षीस जाहीर केले.... आणि सुभाष आणि मधुमिताला मरणोत्तर शौर्य पुरस्कारांनी सन्मानित केले.... )

समाप्त.... 

लेखिका - सौ. अनुष्का हणमसागर 
© Anu Swapn Blog
 


(टीप - वरील लेखाचे सर्व अधिकार हे लेखिकेकडे अबाधित आहेत.... जर कोणी हे लिखाण आपल्या लेखनात जसेच्या तसे वापरले तर कॉपी राईट होऊ शकते.... वरील लेखन हे कोणतीही अंधश्रद्धा पसरविण्यासाठी केले नाही... हि एक मनोरंजन कथा आहे... जरी लेखन शेअर करावयाचे असल्यास वेबसाईट लिंक सहित शेअर करावेत... ह्यातील व्यक्ती आणि कथा काल्पनिक आहेत आणि जरी ह्या कोणाच्या आयुष्याशी मिळत्या जुळत्या असतील तर तो केवळ योगायोग समजावा... धन्यवाद)



Read More
  • Share This:  

# मधुमिता - एक भयकथा - भाग 7# - horror stories in marathi

 August 17, 2020     article     3 comments   


ANU SWAPN BLOG

मधुमिता - एक भयकथा - भाग 7


horror stories in marathi

मधुमिता भाग १ साठी खालील लिंकवर क्लिक करा 👇
 https://anuswap.blogspot.com/2020/07/MADHUMITA-PART1.html

मधुमिता भाग २ साठी खालील लिंकवर क्लिक करा 👇  
https://anuswap.blogspot.com/2020/07/Madhumita-Part2.html

मधुमिता भाग 3 साठी खालील लिंकवर क्लिक करा 👇  
https://anuswap.blogspot.com/2020/07/Madhumita-HorrorStory-Part3.html

मधुमिता भाग 4 साठी खालील लिंकवर क्लिक करा 👇  
https://anuswap.blogspot.com/2020/08/Madhumita-horror-stories-in-marathi-part4.html

मधुमिता भाग 5 साठी खालील लिंकवर क्लिक करा 👇 
https://anuswap.blogspot.com/2020/08/Madhumita-bhag5-horror-stories-in-marathi.html

मधुमिता भाग 6 साठी खालील लिंकवर क्लिक करा 👇 
https://anuswap.blogspot.com/2020/08/MadhumitaBhat6-horror-stories-in-marathi.html

 ठरल्याप्रमाणे सर्वजण पुढील प्लॅनच्या तयारीला लागले.... रात्री अदवैत्यने परत प्लँचेट चा डाव मांडला पोलीस इन्स्पेक्टर संजय यांना हा सर्व प्रसंग खरा आहे दाखवण्याची हि एकच संधी होती... अदवैत्यने सर्व वस्तू आणल्या... पूर्वी तयार केलेलं प्लँचेट बोर्ड तसाच होता.... त्याने संजयना नियम समजावून सांगितले.... अदवैत्यने मेणबत्त्या लावल्या... अविनाशने लाईटस घालवल्या  आणि सर्वजन पुन्हा कुंकवाने काढलेल्या घेऱ्यात बसले.... सर्वांनी काचेच्या ग्लासवर बोट ठेवले.... 

परत त्याने मधुमिताला बोलवायला चालू केले.... "मधुमिता तू आजूबाजूला असशील तर तुझ्या अस्तित्वाची आम्हाला झलक दाखव...." असे दोन तीन वेळा म्हणून दाखवले.... पण काहीच प्रतिसाद मिळत नव्हता.... अद्वैतचे  लक्ष हे संजयने हातात घातलेल्या अंगठीकडे गेले... त्या अंगठीत ओम अक्षर कोरले होते आणि त्यामुळेच त्यांना काहीच प्रतिसाद मिळत नव्हता... त्याने संजयला अंगठी काढायला सांगितले आणि ती कुंकवाच्या घेऱ्याच्या बाहेर फेकायला सांगितली... संजयने सांगितल्याप्रमाणे अंगठी बाहेर काढून फेकली.... परत अदवैत्यने प्लँचेट खेळायला चालू केले आणि ग्लास पुढे सरकू लागला आधी संजयला वाटले कि हे सर्व अदवैत्यच करत आहे... पण त्याने निरखून पहिले तर तो कोणताही जोर त्या ग्लासवर लावत नव्हता.... तो ग्लास आपोआपच पुढे सरकत होता.... आणि पुन्हा तो "येस" पाशी जाऊन थांबला...  संजयला हे नवीनच होते...  त्यामुळे त्याचा अविनाशच्या गोष्टीवर हळूहळू विश्वास बसू लागला होता.... 

Click below Link for getting related products

अदवैत्य पुढे म्हणाला, " मधुमिता काहीतरी करून दाखव कि संजय साहेबांचा ह्या गोष्टीवर विश्वास बसेल..."

इतक्यात अचानकच बाहेर कोल्ह्याची कोल्हेकुई चालू झाली... घरातील कपाटांची दारे आपोआपच उघडझाप होऊ लागली.... खुर्च्या, टेबलांनी आपोआपच जागा सोडली.... घड्याळ्यामधे अचानकच बेल वाजू लागली आणि संजयला कोणीतरी रडायला लागलाय असा विहिरीकडून आवाज येऊ लागला.... तो उठत असताना अदवैत्यने त्यांना सांगितले कि ग्लासवरचा हात काढू नका... मी तुमची तिच्याशी भेट करून देतो.... आता मात्र संजय थोडाफार का असेना घाबरला होता.... 

अदवैत्य म्हणाला, " मधुमिता तुझ्या मनातील सर्व गोष्टी संजय साहेबांना समजावून सांग.... आणि ते आपल्याला मदत करण्यासाठी इथे आले आहेत...  त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेव.... त्यांच्याशी बोल.... "

इतक्यात पुन्हा मधुमीताच अक्राविक्राळ रूप त्यांच्या समोर आलं... ते रूप बघून संजय पुरताच हादरला... त्याला समजलं कि हिला कोणत्या प्रकारे हाल हाल करून मारले असेल ते.... त्याने तिला प्रश्न विचारायला सुरुवात केली... 

संजय मधुमिताला म्हणाला, " तुम्ही जेव्हा खिडकीतून आत पाहत होता तेव्हा तिथे काय काय चालले होते???"

मधुमिता म्हणाली कि, " साहेब आम्ही गेस्ट हाऊस मध्ये होतो तेव्हा आम्हाला मुलींच्या रडण्याचे आवाज येऊ लागले होते... म्हणून आम्ही फार्महाऊसकडे आलो... आतमध्ये तीन मुली होत्या त्यांना बांधले होते आणि त्या सोडविण्यासाठी याचना करत होत्या.... आतमध्ये साधारण पाच ते सहा गुंड होते आणि त्यांचा म्होरक्या विजू तिथं बसला होता.... त्या मुलींना शहरात नेऊन विकायची चर्चा त्यांच्यात चालली होती आणि त्यांना विकण्यासाठी तो दुसऱ्या दिवशीच निघणार होता... आम्ही हे सर्व आमच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड केले होते.... तोपर्यंत त्यातील एकाने आम्हाला पहिले व आम्ही पळू लागलो आणि आम्ही पळत असतानाच मी पडले... तो कॅमेरा माझ्या हातातून सुटून कुठेतरी पडला किंवा त्यांनी उचलला त्यामुळे मला तुम्हाला आता पुरावे म्हणून दाखवायला काहीच उरले नाही.... बाकी अविनाशने तुम्हाला माझी आणि माझ्या नवऱ्याची हत्या कशी केली हे सांगितलेच असेल.... आता त्यांना शिक्षा देऊन आमच्या आत्म्यांना ह्या निर्दयी दुनियेतून मुक्त करावं हीच माझी इच्छा आहे... "

संजयने मधुमिताचे सर्व बोलणे ऐकून घेतले.... त्यांनी तिला कॅमेरा सापडल्याचे सांगितलं... पण तो बंद पडला आहे... तो दुरुस्त होतोय का हे पाहण्यासाठी जगदीश शहरात गेला आहे... तो दुरुस्त होईपर्यंत  माझ्या डोक्यात एक आयडिया आली आहे त्याप्रमाणे जर आपण सर्वांनी काम केले तर नक्कीच गुन्हेगारांना सजा मिळायला वेळ नाही लागणार... या सर्वांमध्ये मधुमिताची, अविनाशच्या काकांची आणि अदवैत्यच्या बाबांची साथ हवी आहे... आणि आपण विजूकडून सर्व गुन्ह्यांची कबुली करून घेऊच... 

मधुमिता म्हणाली, " मी तर कधीपासूनच तयार आहे ह्या सर्वांचा बदला घ्यायला... सांगा मी काय करू शकते... "

संजय म्हणाला, " फक्त तुला रात्रीच हे काम करायचं आहे... आम्ही विजूला इथे कस आणायचे हे पाहतो.... फक्त एकच मागणी आहे कि तू विजूला काही करायचं नाही.... "

मधुमिताने हो म्हंटले.... संजय सर्वांना प्लॅन सांगू लागला...  पहिल्यांदा काकांना इथे बोलावून घ्या... 

अविनाश संजयला म्हणाला , " अरे पण काकांना बोलावलं कि, आई बाबांना संशय येईल कि.... मला त्यांचा लग्नाचा वाढदिवस हे सर्व सांगून नाही बिघडवायचा.... "

संजय म्हणाला, " आपण काकांना अचानकच  गावात जमिनीचं काहीतरी काम निघालय असं सांगून बोलावून घेऊ.... त्यांना हेच वाक्य तुमच्या आई बाबांना सांगायला सांगू..."

घड्याळात तीन वाजले आणि मधुमिताची परत जाण्याची वेळ झाली.... तिने संजयने सांगितलेला सर्व प्लॅन समजून घेतला....

अदवैत्यने तिला घालविण्यासाठी परत प्लँचेट चा डाव खेळला... आणि ती निघून गेली.. 

त्यानंतर सकाळी अविनाशने काकांना फोन केला कि, " गावात एक पार्टी आली आहे जमिनीच्या संदर्भात आणि तुम्ही या गावाकडे.... "

पोलीस इन्स्पेक्टर संजय यांनी अदवैत्यलाही फोन करून त्याच्या मांत्रिक बाबांना बोलावून घेतले... येताना त्यांना आत्म्याला मोक्ष मिळावा ह्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी आणण्यास  सांगितले.... 

काकाही सकाळी लगेचच गावी येण्यासाठी निघाले आणि दुपारपर्यंत पोहोचले देखील.... त्याचप्रमाणे अदवैत्यचे बाबा देखील त्याच वेळी आले.... सर्वजण फार्महाऊसच्या हॉलमध्ये बसले... 

अविनाशला काका म्हणाले, "कुठं आहे पार्टी??? जी जागेसंदर्भात आम्हाला भेटणार होती... आणि अदवैत्यचे बाबा इथे काय करत आहेत???"

पोलीस इन्स्पेक्टर संजय यांनी काकांना आणि अदवैत्यच्या बाबांना घडलेला सर्व प्रकार समजावून सांगितला.... काकांना हे सर्व पटतच नव्हते.... आपला विश्वासू सेक्रेटरी विजू आपल्या नावाखाली हे सर्व वाईट कृत्य करत आहे याच्यावर त्यांना विश्वासच बसत नव्हता...

अविनाशचे काका म्हणाले, " यावर आता काय उपाय आहे???"

पोलीस इन्स्पेक्टर संजय म्हणाले, " काका आम्ही एक खूप छान प्लॅन केला आहे... आणि त्यामध्ये आम्हाला तुमची आणि अदवैत्यच्या बाबांची मदत लागेल.... आपण मधुमिताला सर्वजण मिळून न्याय मिळवून देऊ... गावातील इतर मुली कोठे आहेत हे सुद्धा शोधून काढू.... "

संजय यांनी सर्वांना प्लॅन समजावून सांगितला आणि सर्वजण त्यामध्ये मदत करायला तयार झाले... 

क्रमश..... 

लेखिका - सौ. अनुष्का हणमसागर 
© Anu Swapn Blog
 

पुढे काय घडले हे वाचण्यासाठी मधुमिता - एक भयकथा - भाग 8 साठी कंमेंट करा... लाईक करा...

(टीप - वरील लेखाचे सर्व अधिकार हे लेखिकेकडे अबाधित आहेत.... जर कोणी हे लिखाण आपल्या लेखनात जसेच्या तसे वापरले तर कॉपी राईट होऊ शकते.... वरील लेखन हे कोणतीही अंधश्रद्धा पसरविण्यासाठी केले नाही... हि एक मनोरंजन कथा आहे... जरी लेखन शेअर करावयाचे असल्यास वेबसाईट लिंक सहित शेअर करावेत... ह्यातील व्यक्ती आणि कथा काल्पनिक आहेत आणि जरी ह्या कोणाच्या आयुष्याशी मिळत्या जुळत्या असतील तर तो केवळ योगायोग समजावा... धन्यवाद)



Read More
  • Share This:  

# मधुमिता - एक भयकथा - भाग 6# - horror stories in marathi

 August 13, 2020     article     2 comments   


Anu Swapn Blog

मधुमिता - एक भयकथा - भाग 6


horror stories in marathi

मधुमिता भाग १ साठी खालील लिंकवर क्लिक करा 👇
 https://anuswap.blogspot.com/2020/07/MADHUMITA-PART1.html

मधुमिता भाग २ साठी खालील लिंकवर क्लिक करा 👇  
https://anuswap.blogspot.com/2020/07/Madhumita-Part2.html

मधुमिता भाग 3 साठी खालील लिंकवर क्लिक करा 👇  
https://anuswap.blogspot.com/2020/07/Madhumita-HorrorStory-Part3.html

मधुमिता भाग 4 साठी खालील लिंकवर क्लिक करा 👇  
https://anuswap.blogspot.com/2020/08/Madhumita-horror-stories-in-marathi-part4.html

मधुमिता भाग 5 साठी खालील लिंकवर क्लिक करा 👇 
https://anuswap.blogspot.com/2020/08/Madhumita-bhag5-horror-stories-in-marathi.html


सुभाषने बरोबर आपला कॅमेरा घेतला.... आम्ही त्या फार्महाऊसच्या जवळ जाऊ लागलो.... आतमध्ये पाच ते सहा गुंड होते, सोबत तुमच्या काकांचा सेक्रेटरी विजूही तिथे होता आणि त्यांनी गावातील तीन ते चार मुलींना पकडून आणून बांधून ठेवले होते.... आम्ही हे सर्व खिडकीतून पाहत होतो... विजू ह्या सर्वांचा म्होरक्या होता... ते त्या मुलींना शहरात कुठेतरी नेऊन विकणार होते.... सुभाषने आपला कॅमेरा काढला आणि सर्व रेकॉर्ड करत होता.... तितक्यात त्यांच्यातल्या कोणीतरी आम्हाला पहिले आणि ते सर्व आमच्या मागे लागले... पळता पळता सुभाषकडील कॅमेरा मी माझ्या हातात घेतला.... पुढे पळत असताना माझा पाय विहिरीजवळच्या एका झाडाच्या मुळात अडकला आणि मी तिथे खाली पडले आणि तो कॅमेरा माझ्या हातातून निसटून कुठेतरी जाऊन पडला.... सुभाषने मागे पहिले तेव्हा मी पडले होते... तरीही मी त्याला जा म्हणत होते... त्याने माझे नाही ऐकले... तो मला उठविण्यासाठी परत आला आणि तिथेच घात झाला.... त्यांनी त्याला पकडले आणि कॅमेराबद्दल विचारायला सुरवात केली... तो हाडाचा पत्रकार होता त्याने शेवटपर्यंत तो कॅमेरा कुठे आहे हे नाही सांगितले आणि त्यांनी त्याला माझ्या डोळ्यासमोर मारले आणि त्याला झऱ्याच्या पलीकडे एका झाडाखाली पुरले.... 

त्यानंतर त्यांनी मला पकडून त्या विजूच्या समोर घेऊन गेले.... त्या विजूने परत मला विचारायला सुरुवात केली कि कॅमेरा कुठे आहे??? मी सांगत होते, " मला माहित नाही, तो अंधारात कुठेतरी पडला..." त्याला ते पटतच नव्हते... 
त्यांच्यातलाच एकजण म्हणाला बॉस जर आपण हिला नाही मारले तर आपले पितळ उघडे पडेल.... आणि कॅमेरा काय आपण सकाळी शोधू.... आता हिला मारनेच योग्य आहे.... 

मी ओरडत होते, " मला मारू नका, माझ्या पोटात एक जीव आहे... कृपा करा मला मारू नका"

पण त्यांनी माझे ऐकले नाही.... त्यातील एकाने माझ्या डोक्यात काहीतरी मारले... मी खाली बेशुद्ध पडले... माझ्या डोक्यातून भळाभळा रक्त वाहत होते.... त्यांना वाटले कि मी मेले... मग नंतर त्यांनी मला जाळायचे ठरवले.... पण जळत असतानाच मी शुद्धीवर आले आणि ओरडू लागले.... मी ओरडत असल्याचे पाहून ते घाबरले कि कोणीतरी माझ्या किंचाळ्या ऐकतील म्हणून त्यांनी परत मला विझवले आणि मला जिवंतच बाथरूम खोदून त्यात पुरले....  दुसऱ्या दिवशी शेजारच्या गावातील फरशीवाला आणि प्लंबरवाला आणून सर्व पॅक करून घेतले.... बहुतेक तो कॅमेरा विहिरीत पडला आणि खराब झाला असेल.... आणि कदाचित त्यांना मिळाला असेल आणि त्यांनी तो एकमेव पुरावा नाहीसा केला असेल... आणि त्यांना अडकवायचा एकच पुरावा माझ्याकडे होता.... आणि तोही नाहीसा झाला.... त्यामुळे मीही कॅमेरा नाही शोधला.... 

मला मारलं ह्याच काही नाही रे... पण त्यांनी माझ्या न जन्माला आलेल्या बाळालाही मारले त्याचबरोबर माझ्या नवऱ्यालाही मारले.... आणि त्या मुलींनाही त्यांनी काहीतरी केलं असेल.... माझी एकच ईच्छा होती कि, मी आई होणार आहे, हे माझ्या नवऱ्याला मला सांगायचं होत.... 

ह्या सर्वांचा बदला मी घेणारच आहे.... मी त्या नराधमांना सर्वांना मारणार आहे... आणि जोपर्यंत तुम्ही माझी हि ईच्छा पूर्ण करत नाही तोपर्यंत मी तुम्हालाही इथून सोडणार नाही.... आणि माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या आत्म्यालाही मोक्ष मिळणार नाही... आमचे आत्मे इथेच भटकत राहतील कायमचे... कृपा करून मला मदत करा आणि त्या मुलींच त्यांनी काय केलं आहे त्याचा शोध लावा.... मी इथून बाहेर नाही पडू शकत कारण फार्महाऊसच्या समोर तुळशीचे वृन्दावन आहे आणि फार्महाऊसच्या तीनही बाजूला तुळशीची पवित्र रोपे आहेत.... तसेच मागील बाजूला जो झरा आहे त्यात मंदिरातले अभिषेकाचे पवित्र पाणी मिसळत असते... ह्या सर्व पवित्र गोष्टींनी माझ्या आत्म्याला जखडून ठेवलाय त्यामुळे मला कुठेच बाहेर जाता येत नाही.... नाहीतर मी कधीच त्यांना संपवलं असत.... 

अविनाश मधुमिताच्या आत्म्याला म्हणाला, " हे बघ मधुमिता ताई आम्ही तुला सर्वोतोपरी मदत करू पण एक अट आहे कि तू त्या गुंडांना किंवा विजूला काही करणार नाहीस..."

मधुमिता म्हणाली, " हे कस शक्य आहे... त्या लोकांना मारल्याशिवाय मला मुक्ती नाही भेटणार... " 

सायली मधुमिताला म्हणाली, " आम्ही तुझे दुःख समजु शकतो, पण त्या लोकांना मारणे हा त्यावरील उपाय नाही.... आणि त्यांना तू मारलस तर आपल्याला कस कळणार कि त्यांनी त्या व गावातील इत्तर मुलींसोबत काय केलं ते.... आणि पोलीस आहेत कि.... त्यांना फासावर चढवू आपण... "

मधुमिताचा आत्मा म्हणाला, " ठीक आहे पण जोपर्यंत माझी इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही गाव सोडून कुठे जाणार नाही असे मला वचन द्या... आणि मनोहर काकांना ह्यातील काही सांगू नका त्यांना धक्का बसेल"
यावर सर्वजण हो म्हणाले

अविनाश म्हणाला, " माझा एक मित्र पोलीस आहे... मी त्याला इकडे बोलावून घेतो... त्यानंतर आपण त्याच्याशी चर्चा करून हा प्रश्न सोडवू आणि त्या लोकांना बेड्यात अडकवू.... फक्त मला सांग कि तू कुठे पडली होतीस म्हणजे आम्हाला तो कॅमेरा मिळतो का बघता येईल... सकाळी आम्ही त्याचा शोध घेऊ... आणि विजूला इकडे आणून त्याच्याकडून सर्व गोष्टींचा छडा कसा लावायचा ते आम्ही सर्व मिळून ठरवू... तू हि एक वचन दे कि तो इकडे आला तर तू त्याला काही करणार नाहीस म्हणून... "

हे सर्वजण आपल्यासाठी इतका प्रयत्न करत आहेत म्हंटल्यावर मधुमिताने त्यांना वचन दिले.... इतक्यात घड्याळात ३ वाजून गेले होते... आता मधुमिताची आजची वेळ संपत आली होती.... मधुमिताने सर्वांना ती जाणार असल्याचे सांगितले आणि तो ग्लास परत सरकत "बाय" वर गेला आणि मधुमिताचा आत्मा गायब झाला.... हे सर्व ऐकून सर्वांचे मन अगदी सुन्न झाले होते.... किती निर्दयी असतात लोक पैशासाठी तीन तीन निरागस जीवांचा त्यांनी बळी घेतला आणि त्या मुलींचेही काय केले असेल????... 

सर्वांना त्यानंतर झोप नाही लागली.... सकाळी उजेड पडल्या पडल्याच सर्वजण विहिरीकडे पळाले आणि त्यांची कॅमेरा शोधण्याची मोहीम चालू झाली... ते सगळीकडे कॅमेरा शोधत होते पण त्यांना काही केल्या तो सापडतच नव्हता... आणि पूर्वाचे लक्ष विहिरीत आडव्या आलेल्या झाडाच्या फांदीकडे गेले.... तिथे कोणतीतरी वस्तू दोन फांद्यांच्या मध्ये लटकत होती.... खरंतर ती वस्तू दोन दिवसांपूर्वी तिथे दिसत नव्हती पण अचानकच ती आज दिसू लागली होती... सर्वांनी आत वाकून पहिले, जगदीशने आंबे काढायची मोठी अकडा काठी आणली आणि तो ती वस्तू बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागला... आणि पाहतो तो काय तो सुभाषचा कॅमेरा होता... त्यांनी तो चालू करण्याचा प्रयत्न केला पण तो चालू होत नव्हता... 

मग अदवैत्य म्हणाला, " हे बघा कोणीतरी शहरात जाऊन हा कॅमेरा दुरुस्त करून आणावयास हवा... आणि येताना माझ्या बाबांना घेऊन या... कारण ह्या दोघांच्या आत्म्यांना मुक्ती कशी द्यायची हे फक्त माझे बाबाच सांगू शकतात... "

जगदीश म्हणाला, " ठीक आहे... मी शहरात  जातो आणि कॅमेरा दुरुस्त होतो का हे पाहतो.... "

अविनाशने आपल्या पोलीस मित्राला फोन करून बोलावून घेतले.... अविनाशच्या पोलीस मित्र संजय त्या ठिकाणी आला... आणि त्याला अविनाशने  सर्व अहवाल सांगितला... त्याला कोणत्याच गोष्टीवर काही केल्या विश्वास बसत नव्हता तरी पण एक मित्र ह्या नात्याने त्याने त्यांच्या शोधकार्यात त्यांना मदत करायचे ठरवले.... पण तो म्हणाला मलाही मधुमिता ताईला बघायचे आहे आणि त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत... तिच्याशी बोलल्यानंतरच पुढचा सापळा रचू.... मला मुली गायब होतात हे माहिती होत... पण गावात आल्यानंतर एकही गाववाला मला योग्य उत्तर देत नव्हता... आणि त्यांच्या अशा वागण्यावरूनच मला कळले कि... इथे काहीतरी गडबड आहे... आणि मुलीना गायब करण्यात गावातील मोठी राजकारणी व्यक्तीचाच हात असणार... हे लोक त्यांना घाबरत असल्यामुळे ते ह्या प्रकरणाबद्दल कोणालाही काही सांगणार नाहीत याची मला खात्री होती.... 

अविनाश म्हणाला, " ठीक आहे आपण तिला इथे रात्री बोलावून घेऊ... "

क्रमश..... 

लेखिका - सौ. अनुष्का हणमसागर 
© Anu Swapn Blog
 

पुढे काय घडले हे वाचण्यासाठी मधुमिता - एक भयकथा - भाग 7 साठी कंमेंट करा... लाईक करा...

(टीप - वरील लेखाचे सर्व अधिकार हे लेखिकेकडे अबाधित आहेत.... जर कोणी हे लिखाण आपल्या लेखनात जसेच्या तसे वापरले तर कॉपी राईट होऊ शकते.... वरील लेखन हे कोणतीही अंधश्रद्धा पसरविण्यासाठी केले नाही... हि एक मनोरंजन कथा आहे... जरी लेखन शेअर करावयाचे असल्यास वेबसाईट लिंक सहित शेअर करावेत... ह्यातील व्यक्ती आणि कथा काल्पनिक आहेत आणि जरी ह्या कोणाच्या आयुष्याशी मिळत्या जुळत्या असतील तर तो केवळ योगायोग समजावा... धन्यवाद)







Read More
  • Share This:  

# मधुमिता - एक भयकथा - भाग 5# - horror stories in marathi

 August 08, 2020     article     1 comment   


Anu Swapn Blog

मधुमिता - एक भयकथा - भाग 5


horror stories in marathi

मधुमिता भाग १ साठी खालील लिंकवर क्लिक करा 👇
 https://anuswap.blogspot.com/2020/07/MADHUMITA-PART1.html

मधुमिता भाग २ साठी खालील लिंकवर क्लिक करा 👇  
https://anuswap.blogspot.com/2020/07/Madhumita-Part2.html

मधुमिता भाग 3 साठी खालील लिंकवर क्लिक करा 👇  
https://anuswap.blogspot.com/2020/07/Madhumita-HorrorStory-Part3.html

मधुमिता भाग 4 साठी खालील लिंकवर क्लिक करा 👇  
https://anuswap.blogspot.com/2020/08/Madhumita-horror-stories-in-marathi-part4.html


click below link image for buying this amazing products

अविनाशने परत अदवैत्यला प्लँचेट खेळायला चालू करायला सांगितलं.... परत सर्वांनी ग्लासवर बोट ठेवले.... परत विझलेल्या मेणबत्त्या पेटवल्या.... 

अदवैत्य म्हणाला, " आमच्या आजूबाजूला कोणी आत्मा असेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा... आम्हाला तुमचे नाव काय आहे ते सांगा ???"

आता परत ग्लास हलायला चालू झाला आणि तो "येस" पाशी येऊन थांबला... 

अविनाश म्हणाला, " तुमचे नाव आम्हाला सांगा... मला तुमचा चेहरा पहिल्यासारखा वाटतो...."

परत ग्लास हलू लागला पहिल्यांदा तो "m" अक्षरावर गेला.... परत "a", "d", "h", "u", "m", "i", "t" आणि शेवटी तो "a" वर येऊन थांबला.... सर्वांनी त्या अक्षरांची जुळवाजुळव केली आणि शेवटी त्यातून एक शब्द तयार झाला तो म्हणजे "madhumita" आणि मग मात्र अविनाशला कळाले कि तो आत्मा दुसरा तिसरा कोणी नसून मधुमिता ताईचा आहे.... त्याला धक्काच बसला.... अशी कशी मधुमिता ताई आपल्याला सोडून गेली.... 

जगदीशने अविनाशला विचारले, " तू मधुमिताला ओळखतॊस???"

अविनाश म्हणाला, " हो मी ओळखतो... मनोहर काकांची भाची आहे ती.... लहानपणी मी इकडे सुट्टीला यायचो तेव्हा मधुमिता ताईहि यायची, आम्ही एकत्रच खेळायचो.... ती मला आंबे आवडतात म्हणून दरवर्षी तिकडे शहरात पाठवून द्यायची.... मला माझ्या मोठ्या बहिणीसारखीच होती...." आणि अविनाशच्या डोळ्यातून अश्रू आले.... असे कसे झाले... त्याला आता हा प्रश्न शांत बसू देत नव्हता.... मनोहर काका तर म्हणत होते कि एक महिन्याभरापूर्वीच ती इथे आली होती तिच्या नवऱ्यासोबत आणि आता हे मी काय बघतोय तेच कळेना... 

अविनाशने अदवैत्यला विचारले, " आपण तिला प्रत्यक्ष बोलावून माझ्या मनातल्या प्रश्नांचा गुंता सोडवू शकतो का??"

अदवैत्य म्हणाला, " मी तुम्हाला आधीच सांगितले आहे कि, मी आत्मा बोलावू शकतो पण घालवू शकत नाही... आणि एकदा आत्म्याने आपल्याला त्याची ईच्छा बोलावून दाखवली कि, ती अपूर्ण ईच्छा पूर्ण केल्याशिवाय तो जात नाही... आता मी मंतरलेले पाणी टाकून एकदा तिला घालवला आहे... पण आता माझ्याकडील तेही पाणी संपलय... हे पुन्हा चेहरा दाखवायला सांगणं म्हणजे आपल्यासाठी रिस्की आहे... बघ बाबा काय करायचं ते.... 

सीमा म्हणाली, " ती अविनाशच्या बहिणीसारखी आहे आणि आपल्याला काही नाही करणार.... आणि तिच्यासोबत काय घडलय ते आपल्याला कळायलाच हवं..."

अदवैत्य म्हणाला, " ठीक आहे, मी बोलावतो तिला पण घाबरून कुणीही हात काढू नका ग्लासवरचा आणि त्या कुंकवाच्या रिंगणाबाहेरही जाऊ नका... "

परत अदवैत्य म्हणाला, " मधुमिताताई आम्हाला आपल्यासोबत काय घडलय ते सांगा... आम्हाला तुमचा चेहरा दाखवा... "

असे म्हटल्यानंतर लगेच परत खिडक्या उघडझाप करू लागल्या.... मोठमोठ्याने हसण्याचा आवाज येऊ लागला ... आत्मा म्हणू लागला का उठवलं मला परत गाढ झोपेतून.... आता मी माझी इच्छा तुम्ही पूर्ण केल्याशिवाय परत नाही जाऊ शकत.... माझा चेहरा दाखवायला तो व्यवस्थित असायला तरी हवा ना.... 

अविनाश म्हणाला, "असू दे आम्हाला तो पाहायचा आहे आणि तुझ्यासोबत काय घडलं आहे तेही ऐकायचं आहे"

मधुमिताचा आत्मा म्हणाला, " ठीक आहे, मी माझा चेहरा दाखवते...."

आणि इतक्यात प्लँचेट च्या मधोमध एक आकृती तयार झाली.... केस पूर्णतः जळालेले.... अर्धा चेहऱ्यावर मांस नव्हते.... अर्धे अंग भाजले होते... अंगावर नेसलेली साडी जळून अंगाला पूर्णपणे चिकटली होती.... इतके विद्रुप शरीर पाहून सर्वांचा थरकाप उडाला....  

मधुमिताचा आत्मा  म्हणाला , " अविनाश पाहिलास त्या लोकांनी माझे काय हाल केले आहेत ते... "

अविनाश म्हणाला,  "मधुमिता ताई काय घडलाय तुझ्यासोबत ते आम्हाला सांगशील काय??? आम्ही तुझी ईच्छा पूर्ण करण्यासाठी सर्व तोपरी प्रयत्न करू"

मधुमिताचा आत्मा सांगू लागला, " तर मग ऐक, तीन वर्षांपूर्वी मी एक कोर्स करण्यासाठी शहरात गेले होते... मला लहानमुलांची आणि सोशल वर्किंगची आवड असल्यामुळे अनाथ आश्रमात दर रविवारी जायचे... तिथे मला सुभाष नावाचा मुलगा भेटला... पत्रकार होता, स्वभावाने चांगला होता... तो एक अनाथ मुलगा होता... त्याला जन्मल्याजन्मल्याचं अनथालयाच्या पायरीवर त्याचे आई बाबा टाकून गेले होते...  आमची पहिल्यांदा चांगली मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचे प्रेमात कधी रूपांतर झाले हेच कळले नाही.... त्यानंतर जेव्हा मी शिक्षण पूर्ण करून घरी आले तेव्हा माझं लग्न करायचा विचार घरातले लोक करत होते... त्यांनी मला दोन तीन मुलंही बघून ठेवली होती.... मी हे सुभाषला फोन करून कळवले... सुभाष म्हणाला मी येऊन तुमच्या घरच्यांकडे तुझा हात मागतो.... तो इथे माझा हात मागायला आला...पण तो अनाथ असल्यामुळे आमच्या घरातल्यांनी त्याला नाकारले...  मग तो नको म्हणत असतानाही मी पळून जावून सुभाषबरोबर लग्न केले... यामध्ये मनोहर मामांनी आम्हाला मदत केली... त्यामुळे त्याच्याशी आमच्या आईने नाते तोडून टाकले.... 

आमच्या घरातल्यांनी आम्हाला घरात घेतलेच नाही.... मग आम्ही शहरात राहू लागलो तिथेच भाड्याने घर घेतले आणि आमचा संसार चालू झाला.... सर्व छान चालू होते पण लग्न होऊन तीन वर्ष झाली तरी मुलबाळ नव्हते.... सुभाषला लहान मुलांची खूप आवड होती.... पण एके दिवशी मला मी प्रेग्नन्ट असल्याचं कळलं आणि मला त्यावेळी अडीच महिने होऊन गेले होते... मग मी असे ठरवले कि मनोहर मामा आणि सुभाषला एकदम सरप्राइझ द्यायचे होते .... 

म्हणून मी त्याला घेऊन इकडे गावाकडे आले... मनोहर मामा दोन दिवस जरा शहरात जाणार होते... मग त्यांनी आम्हाला तुमच्या गेस्ट हाऊसची किल्ली दिली आणि ते शहरात निघून गेले.... फार्महाऊसमध्ये सर्व सोयी असल्यामुळे आम्हाला बाकी काही चिंता नव्हती.... सुभाष एक पत्रकार असल्याने त्याला गावातून मुली गायब होतात हे माहिती होत आणि त्या प्रकरणाचा शोध घ्यायच्या निमित्तानं का होईना त्याने आपला कॅमेरा सोबत घेतला होता.... मग आम्ही फार्महाऊसकडे गेलो... मनोहर मामाने आम्हाला आधीच सांगितले होते कि विजू काका रात्री तिथे झोपायला असतो... आणि तुम्ही गेस्ट हाऊस मध्येच राहा आणि शक्यतो त्याला दिसू नका... नाहीतर तुम्ही आल्याचं तो गावात सांगेल... त्यावेळी रात्री साधारण बारा साडेबाराच्या दरम्यान आम्ही गेस्ट हाऊसमध्ये झोपेत होतो आणि इतक्यात आम्हाला तुमच्या फार्महाऊसमध्ये मोठमोठ्याने हसण्याचे आवाज येऊ लागले.... आणि साधारण मुली रडत आहेत असे ऐकू आले.... मी हळूच सुभाषला उठवले आणि त्याला सांगितले कि फार्महाऊसेमध्ये काहीतरी गडबड चालू आहे.... 

क्रमश..... 

लेखिका - सौ. अनुष्का हणमसागर 
© Anu Swapn Blog
 

पुढे काय घडले हे वाचण्यासाठी मधुमिता - एक भयकथा - भाग 6 साठी कंमेंट करा... लाईक करा...

(टीप - वरील लेखाचे सर्व अधिकार हे लेखिकेकडे अबाधित आहेत.... जर कोणी हे लिखाण आपल्या लेखनात जसेच्या तसे वापरले तर कॉपी राईट होऊ शकते.... वरील लेखन हे कोणतीही अंधश्रद्धा पसरविण्यासाठी केले नाही... हि एक मनोरंजन कथा आहे... जरी लेखन शेअर करावयाचे असल्यास वेबसाईट लिंक सहित शेअर करावेत... ह्यातील व्यक्ती आणि कथा काल्पनिक आहेत आणि जरी ह्या कोणाच्या आयुष्याशी मिळत्या जुळत्या असतील तर तो केवळ योगायोग समजावा... धन्यवाद)







Read More
  • Share This:  

# मधुमिता - एक भयकथा - भाग 4# - horror stories in marathi

 August 04, 2020     article     1 comment   



ANU SWAPN BLOG

मधुमिता - एक भयकथा - भाग 4


horror stories in marathi

मधुमिता भाग १ साठी खालील लिंकवर क्लिक करा 👇
 https://anuswap.blogspot.com/2020/07/MADHUMITA-PART1.html

मधुमिता भाग २ साठी खालील लिंकवर क्लिक करा 👇  
https://anuswap.blogspot.com/2020/07/Madhumita-Part2.html

मधुमिता भाग 3 साठी खालील लिंकवर क्लिक करा 👇  
https://anuswap.blogspot.com/2020/07/Madhumita-HorrorStory-Part3.html


अदवैत्य अविनाशला घेऊन खिडकीपासून दूर झाला आणि अविनाशला सांगू लागला... अविनाश मी जेव्हा इथे फार्महाऊसवर आलो तेव्हाच मला जाणवले होते कि ह्याठिकाणी काहीतरी शक्ती राहत आहे.... मी माझ्या बाबांबरोबर कधीतरी तंत्र मंत्र करायला जायचो तेव्हा त्यांनी मला शिकवलं होत कि, एखाद्या ठिकाणी आत्मा आहे हे कसे ओळखावे.... 

Click on below image for best products 


अविनाश म्हणाला, " पण मला नाही हे पटत...."

अदवैत्य त्याला म्हणाला, " मग आत्ता बाथरूमच्या बाहेर बघितलास ते काय होते???"

अविनाशकडे त्याच्या ह्या प्रश्नाचे उत्तर नव्हते.... अदवैत्य त्याला म्हणाला, हे बघ मी तुला एक सांगतो... इथं आपण यायच्या आधीच असं काहीतरी घडलय कि ते सर्वांपासून लपून आहे.... उद्या अमावस्या आहे आणि आपल्याला हे सर्व कळायचे असेल तर आपल्याला तो आत्मा बोलवायलाच हवा... जाणून घ्यायला हव कि त्यासोबत ह्या ठिकाणी काय झालय ते.... मला माहिती आहे कि आपण हे चुकीचं करतोय पण तो आत्मा ह्याठिकाणी भटकतोय म्हंटल्यावर त्याची कोणतीतरी इच्छा अपूर्ण राहिली असावी.... 

अविनाश म्हणाला, " हे बघ अदवैत्य मला नाही ह्या गोष्टींवर विश्वास, पण तू सांगतोयस म्हणून एखादा प्रयोग करायला काही हरकत नाही... काय करणार आहेस तू????"

अदवैत्य त्याला म्हणाला, " मला त्यासाठी एक प्लँचेट बोर्ड बनवावा लागेल... सात मेणबत्त्या लागतील.... एक काचेचा ग्लास लागेल.... एक कोरा कागद आणि लाल स्केचपेन लागेल.... थोडं कुंकू लागेल.... 

अविनाश म्हणाला, "ठीक आहे...."

अदवैत्य म्हणाला, " पण मी जे करणार आहे त्यातील ज्ञान माझे पूर्ण नाही... मी आत्म्याला बोलावू शकतो... पण तो घालवण्यासाठी माझे बाबा लागतील.... कारण आत्मा आला कि जोपर्यंत त्याची ईच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तो जात नाही.... "

अविनाश म्हणाला, " काही रिस्क तर नाही ना ह्यात.... "

अदवैत्य त्याला म्हणाला, " मलाही माहित नाही... मी बाबांच्याशिवाय हे पहिल्यांदाच करतोय.... "

सकाळी सर्वजण उठले.... त्यानंतर अविनाशने सर्वांना प्लँचेट करण्याबद्दल सांगितले.... 

सायली म्हणाली, " ए मला खूप भीती वाटतीय... नको रे असल काही करायला... आपण घरी जाऊ...."

जगदीश म्हणाला, " करूया आपण... जर खरंच आपण कुणाचही वाईट नाही केलं आणि तो आत्मा आपल्याला काही नाही करणार... आणि हे सर्व अंधविश्वास आहे.... आत्मा वैगेरे काही नसतात मुळी...."

आता रात्र होतच आली होती.... आज तर अमावस्या असल्यामुळे फार्महाऊस मधून कुणीही एकटे बाहेर जायचे नाही असे ठरले होते... सर्वजण रात्रीचे १२.०० कधी वाजतात ह्याची वाट बघत होते... अविनाशने आणि अदवैत्यने प्लँचेट साठी लागणारे सर्व सामान गोळा करून आणून ठेवले होते... अदवैत्यने एक कोरा कागद घेतला आणि त्यावर लाल स्केचपेनने  एका बाजूला अर्धा चंद्र, एका बाजूला सूर्य, एका बाजूला 'येस' आणि एका बाजूला 'नो' , मग इंग्लिश कॅपिटल लेटर्स, त्याखाली अंक असे काढले.... त्यानंतर एक कुंकवाने रिंगण काढले... कागदावर मध्ये तो ग्लास उलटा करून ठेवला.... सात मेणबत्त्या ठेवल्या.... त्याने सर्वांना नियम सांगायला सुरुवात केली... ह्यामध्ये पहिल्यांदा सर्वांनी कुंकवाने काढलेल्या रिंगणात बसायचे, मेणबत्त्या पेटवायच्या, एकाने फार्महाऊसमधील सर्व लाईट्स घालवायच्या, सर्वांनी कागदावरील ग्लासवर आपल्या एका हाताचं बोट ठेवायचं आणि काही झालं तरी आपलं बोट त्यावरून काढायचं नाही.... किंवा कोणीतरी हाक मारतय आस वाटल्यास कुंकवाने काढलेल्या रिंगणाबाहेर जायचं नाही... सर्वांनी नियम ऐकून घेतले... आणि तयार झाले.... रात्री १२.०० चा अलार्म वाजला आणि सर्वजण रिंगणात बसले... ठरल्याप्रमाणे पहिल्यांदा मेणबत्त्या पेटवल्या... आणि अविनाशने मोबाइलची टॉर्च हातात घेऊन फार्महाऊसमधील दिवे मालवले आणि तो रिंगणात येऊन बसला.... परत सर्वांनी काचेच्या ग्लासवर एका हाताचे बोट ठेवले.... 

अदवैत्यने म्हणायला चालू केले, " ह्या घरात किंवा आजूबाजूला कोणी आत्मा असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि आम्हाला आपले दुःख सांगा..." तरी काहीच होत नव्हते... परत त्याने दुसऱ्यांदा हेच वाक्य म्हंटले पण तरीही रिस्पॉन्स नाही मिळाला... 

अविनाश म्हणाला, " बघ मी म्हणालो नव्हतो असं काही नसत म्हणून.... " आणि इतक्यात ग्लास अचानक सरकू लागला....

सायली अदवैत्यला म्हणाली, "अदवैत्य, तूच हे सर्व करत आहेस ना मला माहिती आहे..."

अदवैत्य म्हणाला, " नाही मी नाही करत आहे, ग्लास आपोआपच हालत आहे... "

आणि खरंच ग्लास आपोआपच सरकत सरकत 'येस' कडे गेला आणि त्यावर जाऊन थांबला... 

आता मात्र सर्वजणच घाबरले होते... कारण तिथे असलेल्या शक्तीने त्यांना तिच्या अस्तित्वाची झलक दाखवली होती... परत अदवैत्य म्हणू लागला, " कि ह्याठिकाणी असलेल्या आत्म्याने आम्हाला काहीतरी करून दाखवावे कि जेणेकरून खरंच आम्हाला ह्या गोष्टीवर विश्वास बसेल.... आणि इतक्यात बाहेर वारे नसतानाही फार्महाऊसमधील पूर्ण बंद असलेल्या खिडक्या आपोआपच उघडझाप करू लागल्या.... बंद पडलेल्या घड्याळाचा काटा अचानकच फिरू लागला....  कोणीतरी आजूबाजूला कुजबुजतंय असे सर्वांना वाटू लागली.....  आणि मोठी गगनाला भिडेल अशी किंकाळी ऐकू आली.... आता मात्र सर्वांची भीतीने गाळण उडाली.... सर्वजण घामाघूम झाले होते... 

सीमा म्हणाली, " बास, आता हा खेळ बंद करूया... मला खूप भीती वाटत आहे. "

अदवैत्य म्हणाला, " असा खेळ नाही बंद करता येत, कारण आपण त्या आत्म्याला त्याला काय प्रॉब्लेम आहे हे विचारण्यासाठी बोलावलं आहे आणि ते कारण सांगितल्याशिवाय तो आत्मा जात नाही.... आपण जरी त्याला बोलावले असले तरी जायचे आत्माच ठरवतो... कुणीही काही झालं तरी ग्लासवरून हात काढू नका आणि रिंगणाच्या बाहेर जाऊ नका.... 

अदवैत्य नंतर म्हणू लागला, " तुम्हाला आमचा इथे असण्याचा त्रास होतो आहे का???
परत ग्लास हलू लागला आणि पुन्हा तो 'नो' कडे गेला... 

अदवैत्य म्हणाला, " तुम्हाला काही आम्हाला सांगायचे आहे का???"
परत ग्लास हलू लागला आणि पुन्हा तो 'येस' कडे गेला... 

शेवटी अदवैत्यने प्रश्न विचारला, "तुमचा चेहरा आम्हाला बघायला मिळेल का???"

आणि इतक्या अंधारात मेणबत्तीच्या उजेडात सायलीच्या मागे एक अर्धवट जळालेला चेहरा सर्वांना दिसला... तो दिसल्यावर सर्वांनी ग्लास वरील हात काढले आणि वाट दिसेल तिकडे पळू लागले... अदवैत्य म्हणाला, "का हात काढला सगळ्यांनी, अरे पळू नका, आता मी काही झालं तरी ह्या आत्म्याला नाही घालवू शकत...." पण त्याच्याकडे एक मंतरलेले पाणी होते त्याने सायलीच्या बाजूला टाकले आणि तो थोड्या वेळा करीता का होईना गायब झाला...."

अविनाशला मात्र सतत तो कोणाचा तरी ओळखीचा चेहरा वाटत होता.... अविनाशने पुन्हा सगळ्यांना ओढून आणून त्या रिंगणात बसविले आणि अदवैत्यला पुन्हा खेळ चालू करायला लावला.... कारण त्याला उत्सुकता लागली होती कि ती व्यक्ती कोण आहे हे पाहण्यासाठीची....  

क्रमश..... 

लेखिका - सौ. अनुष्का हणमसागर 
© Anu Swapn Blog
 

पुढे ती व्यक्ती कोण होती... अविनाश कसा काय तिला ओळखत होता... तिच्यासोबत काय घडले हे वाचण्यासाठी मधुमिता - एक भयकथा - भाग 5 साठी कंमेंट करा... लाईक करा...

(टीप - वरील लेखाचे सर्व अधिकार हे लेखिकेकडे अबाधित आहेत.... जर कोणी हे लिखाण आपल्या लेखनात जसेच्या तसे वापरले तर कॉपी राईट होऊ शकते.... वरील लेखन हे कोणतीही अंधश्रद्धा पसरविण्यासाठी केले नाही... हि एक मनोरंजन कथा आहे... जरी लेखन शेअर करावयाचे असल्यास वेबसाईट लिंक सहित शेअर करावेत... ह्यातील व्यक्ती आणि कथा काल्पनिक आहेत आणि जरी ह्या कोणाच्या आयुष्याशी मिळत्या जुळत्या असतील तर तो केवळ योगायोग समजावा... धन्यवाद)

वरील मधुमिता - एक भयकथा - भाग 4 आवडल्यास भाग 5 साठी नक्कीच कंमेंट करा.... कंमेंट केल्यास लवकरात लवकर चौथा भाग प्रकाशित करेन









Read More
  • Share This:  
Newer Posts Older Posts Home

Popular Posts

  • FARMER POEM एका शेतकऱ्याचे मनोगत
  • Sad love quote / विरह
  • BEST BLOGGING NICHE 2021
  • # मधुमिता - एक भयकथा - अंतिम भाग# - horror stories in marathi
ANU SWAPN BLOG

Translate

Categories

  • article
  • International women's day 2021
  • Love Quotes in Marathi
  • poem
  • Quote
  • Tech & Educational

Blog Archive

  • May 2022 (1)
  • March 2022 (1)
  • April 2021 (1)
  • March 2021 (3)
  • February 2021 (1)
  • November 2020 (1)
  • September 2020 (5)
  • August 2020 (5)
  • July 2020 (5)
  • June 2020 (2)
  • May 2020 (8)
  • April 2020 (3)

Anu Swapn blog

This blog is created for only entertainment and knowledge purpose.
Disclaimer | Contact us | Privacy Policy | Terms of us

Copyright © ANU SWAPN BLOG | Powered by Blogger