ANU SWAPN BLOG
  • Home
  • Home
  • Articles
  • Poems
  • Image Quotes
  • Tech and Educational
  • About Us

History of cycle/सायकलचा इतिहास

 May 29, 2020     article     No comments   

सायकलचा इतिहास 


सायकलीबद्दलची माहिती 


३ जुन हा दिवस जागतिक सायकल दिन  म्हणून साजरा केला जातो. आजच्या लेखात आपण सायकल चा इतिहास पाहणार आहोत. सायकल हे एक असं वाहन आहे कि तिला इंधनाची गरज नाही. सध्याच्या काळात सायकलिंग एक व्यायाम प्रकार म्हणून जास्त वापरला जातो. आधुनिक जीवनशैलीमध्ये सायकल हि आरोग्यदायिनी आहे. सायकल चालवल्याने प्रदूषणही कमी होते. त्यामुळे सायकल हि पर्यावरण आणि आरोग्य दोन्ही गोष्टींना स्वच्छ आणि समृद्ध ठेवण्यास मदत करते. सायकल हे एक असे साधन आहे कि ते लहानग्यांपासून ते म्हाताऱ्या लोकांपर्यंत सर्वजण वापरू शकतात. आज डॉक्टरही आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी सायकल चालवण्याचा सल्ला देतात. पण सायकल चा शोध कसा लागला हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच असते. तर मग जाणून घेऊयात सायकलीचा इतिहास.... 

सायकलीचा इतिहास 


असे मानले जाते कि सायकलीचा शोध १८ व्या शतकात लागला. सण १८१७ मध्ये जर्मनीच्या बैरन फॉन ड्रेवीस यांना सायकलीच्या डिझाईनची कल्पना सुचली व त्यांनी लाकडाची सायकल तयार केली. त्या सायकलीला ''ड्रेसियन'' असेही म्हंटले जायचे.  या सायकलीचा वेग हा १५ किलोमीटर प्रतितास असा होता. सण १८३० ते १८४२ या सायकलीचा उपयोग थोड्याफार प्रमाणात केला गेला. 

परंतु १८३९ साली या सायकलीला पूर्णत्व हे स्कॉटलँडचे किर्कपेट्रिक मैकमिलन यांनी दिले. त्यांनी पायाने ढकलाव्या लागणाऱ्या सायकलला पँडल लावायचे काम केले आणि हि सायकल लोकांना चालवायला सोयीस्कर झाली. 

परत सायकल मध्ये कालपरत्वे बदल होतच गेले. १९२० साली लहान मुलांना चालवता येईल अशी सायकल तयार झाली. पहिली सायकलची रेस हि दस्तावेजानुसार ३१ मे, १८६८ रोजी १२०० मीटरची शर्यत होती. हि शर्यत पॅरिसमधील सेंट क्लाउड पार्क येथे भरविण्यात आली. तसेच अमेरिकेतील सेंट लुई सायकलिंग क्लब हा सर्वात जुना सायकलिंग क्लब आहे. भारतामध्ये पंजाब, हरियाणा हि राज्ये सायकल उत्पादनात पुढे आहेत. 

सायकल चालविण्याचे फायदे 



  • नियमित सायकल चालवल्यामुळे हृदयरोगाचा धोका हा ५० टक्क्यांपेक्षा कमी होतो. सायकलिंग केल्याने रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत होते. 
  • नियमित सायकल चालवल्याने स्नायूंना मजबुती येते. तसेच लठ्ठपणा कमी होतो. 
  • ज्या लोकांना झोपेचा प्रॉब्लेम आहे अशा लोकांनी रोज सायकल चालवायला हवी. शरीरातील निद्रानाशासंबधी वाढलेली कार्डिसोल हार्मोन्सची मात्रा सायकलिंग केल्यामुळे कमी होते. 
  • ३० मिनिटे सायकलिंग केल्यास कॅन्सर संबंधित सर्व आजारांचे प्रमाण घटते
वरील माहिती आवडल्यास नक्कीच शेअर करा.. कंमेंट करा... लायक करा... धन्यवाद 
फोटो सौजन्य : गुगल क्रोम 

© AnuSwapn Blog 2020-2021


Read More
  • Share This:  

#रणरागिणी# Ranragini

 May 24, 2020     article     4 comments   




रणरागिणी 


रत्नमाला हि एक खेडवळ मुलगी....  उंच, धिप्पाड, तेल लावून केसाची वेणी घातलेली असायची....  तिचा बाप एक पैलवान होता... ती हि खेळात अत्यंत हुशार होती.... ती शाळेमध्ये असताना गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक ह्या स्पर्धांमध्ये अव्वल नेहमीच असायची... तसेच तिच्या वडिलांनी तिला हि थोडे पैलवानकीचे धडे दिले होते.... शाळेत ती नेहमीच सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्यायची... तिचे वडील शिवभक्त असल्याने त्यांनी तिला तलवारबाजी, दांडपट्टा, लाट्याकाठ्या ह्यांसारखेही खेळ हि शिकवले होते... गावातील प्रत्येक कार्यक्रमात नेहमी ती ह्या गोष्टी करून दाखवायची म्हणून गावातील लोक तिचे खूप कौतुक करायचे... शाळेत अभ्यासातही बऱ्यापैकी हुशार असल्याने तिच्या वडिलांनी तिला दहावी नंतरच्या शिक्षणासाठी शहरात पाठवले होते....

शहरात आल्यानंतर ती एका रूमवर राहू लागली.... पण खेडवळ असल्यामुळे तिला कोण आपल्या ग्रुप मध्ये घेईनात सतत तिची चेष्टा मस्करी करत असायचे.... तेथील मुलीही तिच्याबरोबर जास्त बोलत नसायच्या.... कारण  गावंढळ बोलणे, केसांना जास्तीचे तेल लावणे, उगाचच मोठमोठ्याने खिदळणे, नट्टापट्टा न करणे.... त्यामुळे मुले मुली मिळून तिची खूप खिल्ली उडवत असायचे.... पण तिला ह्याचे काहीच वाटायचे नाही... म्हणजे तिला कळतच नव्हते कि, ती लोक आपली खिल्ली उडवतात ते... ती सर्व गोष्टी हसण्यावारी न्यायची.... ती ज्या रूम मध्ये रहात होती, त्या रूममध्ये माधुरी, शिल्पा आणि अनघा ह्याही राहत होत्या.... त्या एकदमच शहरी वातावरणात मिसळलेल्या होत्या.... पार्टीला जाणे, वेळाने रूमवर येणे, ड्रिंक्स घेणे हे नित्याचेच.... रत्नमाला सर्वांना सांगायची कि इतक्या वेळ मुलींनी बाहेर राहणे योग्य नाही... पण तिचे म्हणणे कोणीच ऐकायचे नाही.... त्या सर्व गोष्टी हसण्यावारी घ्यायच्या....  व तिलाच काहीबाही बोलून गप्प करायच्या....  त्यांची रूमही जरा शहराबाहेर होती.... म्हणजे लोकवस्ती होती पण घरे जरा लांब लांब होती.... ह्यांच्या रूमसमोर दाट झाडी होती... आणि तिथून आसपास एक किलोमीटर अंतरावर काही बांधकामे चालू होती.... तिथं थोडे लोक असायचे....  

एके दिवशी मात्र रात्रीचे १२. ३० वाजून गेले तरी रूमवर ह्या तिघींचाही पत्ताच नव्हता... रत्नमालाला आता चिंता वाटू लागली.... बऱ्याच वेळ तिनं वाट बघितली.... फोनही करून झाले पण फोन कोणीच उचलत नव्हते....  तोपर्यंत माधुरी आणि शिल्पा ह्या दोघी रूमवर आल्या.... खूप ड्रिंक्स घेतले होते त्यांनी... त्यांच्याबरोबर सोडायला त्यांचा एक मित्रही आला होता.... त्याने सांगितलं कि पार्टीमध्ये तिघीनींही खूप ड्रिंक्स घेतले होते व तिघीनांही व्यवस्थित चालताही येत नव्हते.... म्हणून तो सोडायला आला.... पण पार्टीत अनघा मात्र त्याला नंतर दिसली नाही असे त्याने सांगितले.... व तो निघून गेला.... आता तिने अनाघाबद्दल दोघींनाही विचारायला सुरुवात केली.... पण दोघींचाही सूर कधीच हरपलेला होता.... दोघीही नशेमध्ये होत्या....   रत्नमालाला त्या मित्रावर विश्वास नव्हता... तिने त्याचा माग काढायचे ठरवले.... ती चालत बाहेर पडली....  तो मुलगाही दिसेनासा झाला... रस्त्यावर कोणीच नव्हते... 

बाहेर पुढे गेल्यानंतर गर्द झाडी होती.... त्या झाडीतून कुणाचातरी आवाज येत होता.... ती थोडी घाबरली पण पुढे चालत राहिली.... जवळ गेल्यानंतर वाचावा... मला कोणीतरी वाचावा... असे कोणीतरी ओरडत होते... तो आवाज तिला ओळखीचा वाटला.... अरे हा तर अनघाचा आवाज आहे... हळूहळू ती पुढे चालू लागली तर पुढे तिला तो माधुरी आणि शिल्पाला सोडायला आलेला मित्र आणि आणखी एक मुलगा अनघाचा  विनयभंग करण्याचा प्रयत्न करीत होता... आता काय करावे? असा तिला प्रश्न पडला... तिला तिच्या खेळाची आठवण झाली आणि गोळाफेकीप्रमाणे दिसेल तो दगड फेकायला चालू केले.... तसेही त्यामध्ये तिचे प्राविण्य होते.... ते दगड बरोबर त्या मुलांच्या डोक्यात बसले... दोघांचाही डोक्यातून घळाघळा रक्त वाहू लागले.... शेजारी पडलेल्या काठीने तिने त्यांना मारायला सुरुवात केली.... शेवटी पैलवानांची मुलगी म्हंटल्यावर तिने थोडी कुस्तीची प्रात्यक्षिकेही त्यांच्यावर आजमावली.... ह्या सर्व झटापटीत तिलाही खूप लागले होते.... पण आपल्यामुळे एका मुलीची इज्जत वाचत आहे ह्या विचारामुळे ती रणरागिणी प्रमाणे लढा देत होती.... आज अनघाने थोडी कमी ड्रिंक्स घेतल्यामुळे तिचे डोके थोडेफार चालत होते.... तिने पोलीस हेल्पलाईनचा नंबर कसातरी लावला... व घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.... तसेही पोलीस स्टेशन तेथून एक किलोमीटर अंतरावर होते.... पोलीस लगेच घटनास्थळी आले.... त्या दोघांनाही पोलिसांनी पकडले.... व रत्नमालाला लागले असल्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये भरती केले.... सकाळी माधुरी आणि शिल्पा शुद्धीवर आल्यानंतर त्यांना रत्नमाला व अनघा दोघेही दिसेनात... इतक्यात अनघा रूमवर आली आणि तिने रात्री घडलेली सर्व हकीकत सांगितली... त्यावेळी त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला कि रत्नमाला आपल्याला रोज सांगत होती कि सातच्या आत घरात यावं  ते अगदी बरोबर होते....  आपणच तिची खिल्ली उडवायचो उगीचच.... आज रत्नमाला नसती तर आपल्यावर काय वेळ आली असती ह्या विचारानेच अनघाला कससंच झाले... त्या तिघीनींही एक फुलांचा गुच्छ घेतला व रत्नमालालाला भेटायला गेल्या.... त्यांनी तिला सॉरी म्हणून तिचे आभार मानले.... 

इकडे रत्नमालाचा फोटो पेपरमध्ये आला.... गावामध्ये, कॉलेजमध्ये सगळीकडे कौतुक झाले.... आणि रत्नमालाला रणरागिणी असे नाव मिळाले....

(टीप :- हा लेख पूर्णतः काल्पनिक असून, ह्यामधील कुठल्याही पात्राशी कुणाचाही संबंध नाही. तसे असल्यास तो केवळ योगायोग समजावा. तसेच ह्यातील ओळी जशाच्या तशा कोणी त्यांच्या लेखात कॉपी पेस्ट केल्यास कॉपीराईट होऊ शकते. धन्यवाद!!!)


लेखिका - सौ. अनुष्का हणमसागर 
© Anu Swapn Blog 2020-2021



Read More
  • Share This:  

# शब्दांविना कळले सारे #

 May 16, 2020     article     3 comments   



शब्दांविना कळले सारे 



कल्पना हि एक सुंदर आणि सालस मुलगी. एका मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या हुद्द्यावर काम करणारी एक कॉर्पोरेट स्त्री. मीटिंग जरा जास्त वेळ चालल्यामुळे घरी जायला खूपच उशीर झाला होता. घरी आल्यानंतर सासूबाईंनी तोंड सोडले, "आम्हीही नोकरीला होतो म्हंटल, आम्हालाही काम असायची, पण आम्हाला इतका वेळ कधीच नाही व्हायचा...." आणि आजची पिढी बघा ऑफिसच्या नावाखाली नुसतं शॉपिंग करत बसायचं आणि काय... त्यांचे तोंड चालूच होते... सासूने साध ऑफिस मध्ये काही खाल्लस कि नाही, असे सुद्धा नाही विचारले, आणि गेल्या निघून शेजारी मैत्रिणींबरोबर गप्पा करायला... डोकं दुखत असल्याने कल्पना स्वतःच गेली चहा करायला.... बाहेर पाऊस पडत होता... चहा घेत बसली गॅलरीमध्ये.... तिला असे प्रश्न येऊ लागले कि आपण इतके शिकलो ते हे सर्व ऐकून घ्यायला??  ह्यांना काय माहित कि शिक्षण घेताना मला कोणकोणत्या गोष्टींना तोंड द्यावे लागले आहे?? मी आणि माझ्या आईने ह्यासाठी काय काय सहन केले आहे???  पावसाकडे पाहून तिला जुन्या दिवसांची आठवण झाली...

कल्पनाचे माहेर म्हणजे अगदी मागासलेले गाव... वडिलांची दोन तीन एकर शेती होती... पण वडील मात्र दारूच्या व्यसनात बुडालेला... शेती असून सुद्धा दुष्काळ पाचवीलाच पुजलेला असल्याने ती तशीच पडीक पडलेली होती... आई चार पाच घरची धुनी भांडी करायची व पोटाची खळगी भरायची.... बाप मात्र काही असेल नसेल ते जाऊन विकायचा घरातलं....  पण कल्पनाच्या आईची एक इच्छा होती कि मुलीने शिकावं आणि आपलं नाव मोठं करावं.... पण बाप मात्र अगदी शिक्षणाच्या विरुद्ध त्याच्या डोक्यात एकच चाललेलं असायचं कि, कल्पना वयात आली कि लगेच तीच लग्न करावं... कल्पनालाहि खूप शिकायचं होत पण बाप मात्र शिकुन देत नव्हता.... एके दिवशी कल्पनाने  आपल्या आईला सांगितलं कि आई मला शिकायचं आहे... तसा आईला खूप आनंद झाला.. तिनं लागलीच नवऱ्यापासून लपवलेल्या पैशातून तिला वही, पेन, पाठी, पेन्सिल, पुस्तकं  आणून दिले  आणि शाळेत जाऊन तीच नाव देखील घातलं.... पण बापाला कळल्यावर बापानं दोघींना खूप मारले....  एक दिवस कल्पनाच्या आईने आपली खंत ती ज्या शाळेच्या बाईंकडे धून भांडी करायला जायची त्यांना बोलून दाखवली... त्यांनी एक आयडिया सांगितली कि कल्पनाला रोज दोन तास त्यांचा घरी घेऊन यायचे.. त्या रोज तिला फुकटात शिकवणी देऊ लागल्या.... बाईंनी परस्पर शाळेत कल्पनाचे नावही घातले... त्यात त्यांना असं कळालं कि कल्पना खूपच बुद्धिमान आहे... आणि हिला खूप शिकवायला हवं... तसहि बाईंना मुलबाळ नव्हतं त्यामुळे त्यांनी तिचा पुढच्या शिक्षणाचा खर्च करायचं ठरवले आणि तिच्या आईलाही सांगितलं व कल्पनाच्या वडिलांना ह्यातील काही कळणार नाही असे वचन दिल... असंच दिवस जात होते.... आता कल्पनाला NTSE च्या परीक्षेला बसवायचे असे बाईंनी ठरविले ... परीक्षेला जाताना बापाला कल्पनाची आजोळची आज्जी आजारी आहे असे सांगून त्या मायलेकी बाहेर पडल्या... कल्पनाने परीक्षा दिली आणि ती परीक्षेत चमकली.... पेपरमध्ये फोटो आला.... घरी मान्यवर लोक आले तिचे कौतुक करायला... बापालाही आधी राग आला होता पण मुलीची प्रगती आणि गावातला आपला मान वाढल्याचं बघून त्यानेही पुढे तिच्या शिक्षणाला विरोध नाही केला.... दहावी, बारावीत पण तिने खूप चांगले मार्क्स मिळवले....  बापानेही पुढे तिला शिकवायचं ठरविले व इंजिनीरिंगला घातले.... त्यातही तिनं गोल्ड मेडल मिळवले...

आता मुलगी लग्नाची झाली आणि कल्पनाच्या वधुपरीक्षा चालू झाल्या.... पुढे बाईंच्याच नात्यातले एक स्थळ आले.... मुलाची आई हि महानगरपालिकेत नोकरीला होती, आणि आता रिटायर्ड होती.... त्यांच्या मुलाचे नाव सौरभ, एकुलता एक मुलगा ... तोही मुंबईत चांगल्या हुद्द्यावर नोकरीला होता... गावाकडे त्यांची दहा एकर शेती होती.. त्यामुळे त्यांच्या स्थळामध्ये नाही म्हणण्यासारखे काही नव्हते.... कल्पनाच्या आईने लग्नासाठी एक अट घातली कि कल्पना नोकरी करणार म्हणून... त्यांनीही ती अट मान्य केली... लग्न झाले. कल्पना हि आता मुंबईत रुळली... नंतर तिने ठरवले कि आता आपण नोकरी करायची... तिनं मनातलं सौरभला सांगितलं तोही तयार झाला.... तिनं तिच्या सासूबाईंना ह्याबद्दल सांगितलं आणि आता त्या नोकरीसाठी टाळाटाळ करू लागल्या.... मात्र सौरभच्या हट्टासमोर त्याच्या आईला काही नाही बोलता आले.... कल्पनाच्या मुलाखतीचा दिवस उजाडला एका मोठ्या कंपनीमध्ये चांगल्या हुद्द्यावर ती जॉईन झाली..... तशी घरात धून भांडी करायला बाई होती.... पण घरातला स्वयंपाक हा घरातल्या सुनेनेच करावा हा सासूबाईंचा शिरस्ता होता आणि कल्पनाही तो मान्य होता.... घरातलं नाश्ता, स्वयंपाक करून कल्पना जॉबला जायची... पण कल्पनाच्या सासूला कल्पनाच्या नोकरी लागण्याच्या आधी जसे  सर्व हातात मिळत होते ते आता मिळायचे बंद झाले, त्यामुळे इतर गोष्टींना त्यांना वेळ देता येईना आणि रोज कुरकुर चालू झाली.... रोजची भांडण घरात कारण नसताना चालू झाली.... पण कल्पना अगदी समंजसअसल्याने ती सहसा नवऱ्याला ह्यातले काहीच सांगत नसे .....

सौरभला तिने आधीच फोन करून सांगितले होते कि आज यायला उशीर होईल, पण त्या दोघींचे भांडण चालू असताना सौरभ बाहेर होता आणि नेहमीप्रमाणे ह्यातले त्याला काही माहित नव्हते.... तो जेव्हा घरी आला, तेव्हा कल्पना बाल्कनीमध्ये बसली होती चहा घेत.... तिच्यापाशी गेल्यानंतर तिच्या डोळ्यातून ओघळणाऱ्या आसवांनी त्याला सगळे उमगले... त्याला पण आज का कोण जाणे, तिने न सांगताच हि गोष्ट जाणवली कि आज काहीतरी बिनसलंय ....  त्यालाही आठवले कि, आईला कामावरून यायला थोडा उशीर झाला कि, बाबा आईला घरकामात मदत करायचे... ते करायचे तर मी का नाही करू शकत??.... त्याला समजले कि कल्पना आज खूपच दमली आहे.... त्याने लगेच किचनचा ताबा घेतला आणि स्वयंपाक चालू केला...  कारण पूर्वी आई नोकरीला असल्याने तो बऱ्यापैकी स्वयंपाक शिकलेला होता.... त्याने कणिक मळली, चपात्या केल्या, भाजी, कोशिंबीर केली.... आणि भाताचा कुकर लावला..... कुकरच्या शिटीने कल्पना आठवणीतून भानावर आली... आणि लगेच किचनमधे पळाली....  बघते तो काय नवऱ्याने सर्व स्वयंपाक तयार केला होता....  आणि कल्पनाला कळले कि, कोणीही आपल्याला विचारले नाही तरी आपल्यावर प्रेम करणारा आपला सखासोबती इथं आहे... इकडे आईलाही कळलं नाही कि, आपल्या मुलाने स्वयंपाक केला आहे कारण ती बाहेर गेली होती मैत्रिणीबरोबर गप्पा मारायला... आणि कल्पनालाही त्या दिवसाचा सर्व क्षीण घालवायला मदत झाली... तिने हलकेच ओझरत्या नजरेनं नवऱ्याकडे पहिले आणि आपले प्रेम व्यक्त केलं.... त्यावेळी तिच्या ओठांवर एकच गाणे आले  कि, शब्दांविना कळल्या साऱ्या , माझ्या मनीच्या भावना ...   

मित्र मैत्रिणींनो आपल्याही आजूबाजूला अशा गोष्टी थोड्याफार प्रमाणात घडत असतील ना?????  कंमेंट करून कळवा.. मी लेख पहिल्यांदाच लिहिला आहे... काही चूक असली तर समजून घ्या...

(टीप :- हा लेख पूर्णतः काल्पनिक असून, ह्यामधील कुठल्याही पात्राशी कुणाचाही संबंध नाही. तसे असल्यास तो केवळ योगायोग समजावा. तसेच ह्यातील ओळी जशाच्या तशा कोणी त्यांच्या लेखात कॉपी पेस्ट केल्यास कॉपीराईट होऊ शकते. धन्यवाद!!!)


                                                                                                             लेखिका  -  सौ. अनुष्का हणमसागर
                                                                                                          © Anu Swapn Blog 2020-2021



                        
Read More
  • Share This:  

तू परत येशील का ??? Love Poem

 May 14, 2020     poem, Quote     No comments   


Love Quote
Love Quote




तू परत येशील का ???

ओल्या पापण्यांच्या कवेत 
तू मला घेशील का??

ऐकुनी आर्ट साद,
माझी तू येशील का?

माझ्या मनातील आठवणींचे पाणी,
डोळ्यांमध्ये भरशील का?

सोबत घालवलेल्या क्षणांची,
आठवण तू ठेवशील का?

तुझ्या हृदयातील माझ्या श्वासाला,
जीव तू देशील का?

ओठांत राहिलेल्या शब्दांचा,
आवाज तू होशील का?

आठवणींच्या खोल दरीमध्ये पडताना,
तू मला सावरशील का?

माझ्या जीवनाचा सोबती व्हायला,
तू परत येशील का?


लेखिका - सौ. अनुष्का हणमसागर 
© Anu Swapn Blog


Read More
  • Share This:  

Life Quote 2

 May 11, 2020     Quote     3 comments   

Life Quote

आयुष्य 

आयुष्य हे फुलाप्रमाणे असावं 
सर्वांना जगण्याचा सुगंध द्यावा 
आणि सुकून जावं.... 

आयुष्य हे सूर्याप्रमाणे असावं
सर्वांना विश्वासाचा प्रकाश द्यावा 
आणि सरुनी जावं.... 

आयुष्य हे वृक्षाच्या पानाप्रमाणे असावं 
सर्वांना मायेची सावली द्यावी 
आणि गाळून जावं.... 

आयुष्य हे बर्फाप्रमाणे असावं 
सर्वांना प्रेमाचा गारवा द्यावा 
आणि विरघळुनी जावं.... 

लेखिका - सौ. अनुष्का हणमसागर 
© Anu Swapn Blog

Read More
  • Share This:  

Mother Day Quote1

 May 10, 2020     Quote     4 comments   

Mother Day quote 

Read More
  • Share This:  

FARMER POEM एका शेतकऱ्याचे मनोगत

 May 07, 2020     poem     3 comments   


एका शेतकऱ्याचे मनोगत 

नमस्कार दोस्तांनो मी तुमचा शेतकरी दादा, म्हणतात मला "लाखांचा पोशिंदा".... 
वाचून माझ्या सुख दुःखांची कहाणी, येईल तुमच्या डोळ्यातून पाणी.... 

अस्मान कोपेल सारं, अंकुर रुजलेलं खुंटलं.... 
आशेचा किरण बघताना, पाणी डोळ्यात आटलं.... 

कष्टानं देह झिजला सारा, ह्या देहाच्या आता यातना सोसना.... 
जरी जगाचं काम थांबलं, तरी माझं राबणं थांबेना.... 

दुकाळात पीक सारं गेलं करपून.... 
 जिवाभावाची रोपटी गेली डोळ्यासमोर वाळून.... 

धरणीमातेच्या कोपाच्या साऱ्या, सोसल्या मी झळा.... 
काटा रुतला पायात, जखम वाहे भळाभळा.... 

आलं विनाशाचं वादळ, शेतात पडला उभ्या पिकांचा सडा.... 
शेत पुन्हा उभाराया, नाही खिशात दमडा.... 

आटलेली विहीर माई, कोरडा पडला पाट.... 
आता डोक्यावर मिरवतो आहे सावकारचे सावट.... 

मनात येते आता करूया मृत्यूशैयेशीच गाठ.... 
उपाशी मायलेकरं बघून शोधतो जगण्याची वाट.... 

येतात फोड पायाला, दुकाळात पाण्यासाठी वणवण.... 
सरकाराकडून सुटतात नुसतं आश्वासनांचे बाण .... 

त्या बाणांनी घायाळ, होतो उभा देह माझा.... 
देवाला म्हणतो मी, हि का माझ्या कष्टाचीच सजा ....

जेव्हा संगत नसते कोणी, ढवळ्या पवळ्याची सोबत.... 
त्यांच्या कष्टाला नाही परिसीमा, उपकारांची परतफेड मी नाही करू शकत.... 

असला कसला मी शेतकरी राजा, जीवनाला माझ्या दुःखाची झालर.... 
पण जनतेचा दुवा घ्याया, मी सदैव लढ़नार.... 

इतकीच इच्छा माझी, माझ्या कष्टाचा करा मोलभावं.... 
पोट भरूदे माझ्या मायलेकरांचं, नाही बाकी काही हाव.... 

मी तुमचा अन्नदाता, फक्त पाठिंबा द्या लढाया  .... 
कंबर कसूनी परत, लागतो शिवार पेराया.... 

रीती राहिली माझी, मेहनतीची ओंजळ.... 
इतकंच मागतो धरणीमय, दे मला लढण्याचं बळ.... 

इतकेसे मनोगत माझे, माझ्या संसाराचं सारं.... 
आता विदा घेतो दोस्तांनो, नेसवायचा आहे धरणीमातेला शालू हिरवागार.... 

धन्यवाद .... 

कवियत्री - सौ. अनुष्का हणमसागर 
 © Anu Swapn Blog 2020-2021








  







Read More
  • Share This:  

MAZA MAHARASHTRA माझा महाराष्ट्र

 May 01, 2020     poem     4 comments   



ANU SWAPN BLOG




।। माझा महाराष्ट्र ।।

संतांच्या अभंग वाणीचा झरा अंगावर 
घेऊनि हृदयाची तृष्णा शमविणारा 
असा माझा "अमृतमय महाराष्ट्र"

सह्याद्रीच्या कुशीत गडकिल्ल्यांच्या,लेण्यांच्या 
कातळ माणिकमाळा घालुनी नेत्रांचे पल्लव सुखविणारा  
असा माझा "सुंदर महाराष्ट्र"

छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पताका रोवली 
तिथे अभिमानाचा भगवा झेंडा फडकावणारा
असा माझा "गर्जा महाराष्ट्र"

स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची पर्वा न करता 
आपल्या मावळ्यांनी दिलेल्या बलिदानाचा गौरव करणारा 
असा माझा "कणखर महाराष्ट्र"

बळीराजाच्या घामाच्या थेंबातुन धान्य पिकवूनि 
सर्व जनतेच्या पोटाची खळगी भरणारा
असा माझा "कष्टकरी महाराष्ट्र"

सर्व धर्म समभाव असणारा
 मराठी भाषेचा साज मिरवणारा
असा माझा "एकात्मक महाराष्ट्र"

निरक्षर अंधारातून प्रकाशाकडे नेताना 
न अडकळता ज्ञानाची ज्योती सदैव तेवत ठेवणारा 
असा माझा "साक्षर महाराष्ट्र"

- सौ. अनुष्का हणमसागर 






Read More
  • Share This:  
Newer Posts Older Posts Home

Popular Posts

  • FARMER POEM एका शेतकऱ्याचे मनोगत
  • Sad love quote / विरह
  • BEST BLOGGING NICHE 2021
  • # मधुमिता - एक भयकथा - अंतिम भाग# - horror stories in marathi
ANU SWAPN BLOG

Translate

Categories

  • article
  • International women's day 2021
  • Love Quotes in Marathi
  • poem
  • Quote
  • Tech & Educational

Blog Archive

  • May 2022 (1)
  • March 2022 (1)
  • April 2021 (1)
  • March 2021 (3)
  • February 2021 (1)
  • November 2020 (1)
  • September 2020 (5)
  • August 2020 (5)
  • July 2020 (5)
  • June 2020 (2)
  • May 2020 (8)
  • April 2020 (3)

Anu Swapn blog

This blog is created for only entertainment and knowledge purpose.
Disclaimer | Contact us | Privacy Policy | Terms of us

Copyright © ANU SWAPN BLOG | Powered by Blogger