ANU SWAPN BLOG
  • Home
  • Home
  • Articles
  • Poems
  • Image Quotes
  • Tech and Educational
  • About Us

# मधुमिता - एक भयकथा - भाग 3#

 July 29, 2020     article     2 comments   



Anu Swapn Blog

मधुमिता - एक भयकथा - भाग 3



मधुमिता भाग १ साठी खालील लिंकवर क्लिक करा 👇
 https://anuswap.blogspot.com/2020/07/MADHUMITA-PART1.html

मधुमिता भाग २ साठी खालील लिंकवर क्लिक करा 👇  
https://anuswap.blogspot.com/2020/07/Madhumita-Part2.html


आता सीमा घाबरली.... पण तिला वाटले कि हे सर्वजण मला भीती घालण्यासाठीच असे करत आहे... तिच्या जवळ मोबाइल होता तिने मोबाईलची टॉर्च लावली... आणि ती पुढे चालू लागली.... पण मागून सतत कोणीतरी येत आहे, असा तिला सतत भास होत होता... ती म्हणाली, " जगदीश, अविनाश तुम्हीच आहात ... मला माहित आहे तुम्ही मला भीती घालण्यासाठी हे सर्व करत आहात... " पण मागून काहीच रिस्पॉन्स आला नाही तरीही तशी ती पुढे चालताच राहिली.... तिला असे वाटत होते कि, मागे ह्यातीलच कोणीतरी येत असेल.... ती बाथरूमपाशी गेली, आणि तिने मागे वळून पहिले पण कोणीच नव्हते.... परत गेले असतील, म्हणून तिने हा विचार डोक्यातून काढून टाकला.... बाथरूममध्ये गेल्यानंतर ती फ्रेश झाली व अंधारातच तिला कसला तरी मागून आवाज येऊ लागला... 

आता मात्र ती पूर्णपणे घाबरली होती... कारण बाथरूमचा दरवाजा लावल्यामुळे आत कोणीच येऊ शकत नव्हते... तिला सतत मागून कोणीतरी खुसपुसतंय, मोठ्याने श्वास घेतय असे वाटत होते.... पण एका हातात मोबाईलची टॉर्च चालूच तिने जरा धीराने वॉश बेसिनमधील आरशात पहिले कि मागे कोण आहे का... आणि तेवढ्यात एक भयानक अर्धवट जळालेला विद्रुप असा चेहरा तिला त्यात दिसला.... ती जोरात ओरडली आणि बाथरूममधून पळत सुटली... कशीबशी दरवाजाची कडी उघडून  बाहेर पडली व पळू लागली... तिला जाणवले कि तिचा पाय कोणीतरी खेचत आहे तो स्पर्श एकदम थंड होता... ती खाली पडली... आणि ओरडू लागली, " वाचवा, मला कोणीतरी वाचावा"... तिचा आवाज ऐकून सर्वजण हातातल्या मोबाईलची टॉर्च लावून बाहेर पडले.... तर हि विहिरीजवळ खाली पडली होती... सर्वजण धावत गेले तिच्याजवळ पण त्यांना तिथे कोणीच दिसले नाही.... पूर्वाने तिला उठवले आणि काय झाले म्हणून विचारले.... 

👇for more details about this product click on below image



सीमा म्हणाली, "बाथरूममध्ये कोणीतरी आहे"

जगदीश, अविनाश आणि अद्वैत्य तिथे गेले पण पण त्यांना बाथरूममध्ये कोणीच आढळले नाही... 

जगदीश म्हणाला, " तिथे कोणीच नाही, तुला भास झाला असेल..."

सीमा म्हणाली, " तिथे कोणीतरी होते, मी पळत असताना माझे पाय पण ओढत होते... अगदी थंड स्पर्श जाणवला मला... 

अविनाश म्हणाला, " सीमा एखाद्या सापावर पाय पडला असेल, त्यामुळे तुला थंड काहीतरी जाणवलं असेल..."

सीमा म्हणाली, " पण ते मला खेचत होत..."

सायली म्हणाली, "एखाद्या वेलीत पाय अडकला असेल तुझा..."

सीमाचे कोणीच ऐकत नव्हते... ती पडल्यामुळे तिला जरा लागले होते... तिला त्यांनी आत आणले... सायलीने आणलेला फर्स्ट एड बॉक्स काढला आणि तिच्या पायाच्या जखमा साफ करू लागली.... तिने पायाकडे पाहिलं असता... सीमाच्या पायाला कोणीतरी ओरबाडलंय असच वाटत होत... पण काही धारदार वेलीत वैगेरे पाय अडकला असेल असा तिने विचार केला.... त्यानंतर सर्वजण झोपी गेले.... मात्र सीमाला काही केल्या झोप येत नव्हती... तिच्यासमोर तो चेहरा सारखा सारखा येत होता.... 

दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण उठले... सीमाला थोडा ताप आल्यामुळे, ती झोपली होती... मग आता डॉक्युमेंट्री करण्यासाठी परत सर्वांना गावात जायचे होते.... सायलीला सीमाच्या जवळ बसवून बाकी सर्वजण निघून गेले... तेवढ्यात मनोहर काका आले... स्वयंपाक आणि साफसफाई करण्यासाठी... त्यावेळी त्यांना फार्महाऊस उघडे दिसले... ते आत आले, त्यांनी सायलीला विचारले काय झाले सीमाला?? सायलीने काल रात्री घडलेला सर्व प्रकार सांगितला.... मनोहर काकांनी मीठ, मोहरी, मिरच्या घेऊन सीमाची दृष्ट काढली....

सायली म्हणाली, " काका आम्ही नाही मानत हे सर्व"

मनोहर काका म्हणाले, " तुम्ही मानत नसला तरी आम्ही मानतो हे सर्व..."

जेवायच्या वेळेपर्यंत गावात जाऊन सर्वजण आले... येताना सीमासाठी औषध घेऊन आले.... आता सीमालाही थोडेफार बरे वाटत होते... मग सर्वांनी मिळून दुपारचे जेवण घेतले... परत सर्वांनी आपले काम करायला चालू केले... व त्यानंतर थोडीफार विश्रांती घेतली... परत रात्रीची वेळ आली... बाकी सर्वजण मस्तपैकी पत्ते खेळण्यात गुंग होते... पण पूर्वाला पत्ते खेळायला आवडत नसे.... त्यामुळे पूर्वा अविनाशला म्हणाली, " मी पुस्तक वाचत इथे बाहेर बसते..." पूर्वाला रात्री पुस्तके वाचण्याचा छंद होता... ती बाहेर व्हरांड्यात लाकडी आराम खुर्चीवर बसून पुस्तक वाचत होती... तिच्या समोरच जुना लाकडी झोपाळा होता.... ती पुस्तक वाचण्यात एकदम गुंग झाली होती आणि तिच्या कानावर "कर्रर्रर्र... कर्रर्रर्र" असा आवाज आला... तिला वाटले कि असेल मनाचा खेळ.. जाऊ दे... परत तोच आवाज तिच्या कानावर आला, " तिने समोर पहिले, तर झोका आपोआप हालत होता... बरोबर वाऱ्याचा काही लवलेशही नव्हता.. आणि झोपाळा पुढे मागे हालत होता... तिने परत त्याकडे दुर्लक्ष केले आणि पुस्तक वाचू लागली... परत झोपाळा हलू लागला... आता मात्र तिची पाचावर धारण बसली कारण  तिने निरखून पहिले एक पुसटशी आकृती झोक्यावर बसली होती, आणि झोका घेत होती... ती जोरात ओरडू लागली... अविनाश तिथे आला, त्याने काय झालं म्हणून विचारलं.... त्यावेळी तिने त्या झोक्यावर कोणीतरी बसलं आहे म्हणून सांगितलं... अविनाशने बघितलं तर तिथे कोणीच नव्हतं... पण झोपला मात्र हालतोय हे त्याच्या लक्षात आलं... 

अविनाश म्हणाला, " असुदे, चल आता आत जाऊ... खूपच काळोख आहे बाहेर... त्यामुळे तुला चित्रविचित्र भास होत असतील..." मग दोघेही आत गेले.... रात्री अविनाश जागा होता.... बाकी सर्वजण झोपी गेले होते.... साधारण रात्रीचे १२ वाजले होते.... तो विचार करत होता कि, इथे सर्वांबरोबर हे काय घडत आहे????... रोज काहीना काही विचित्र प्रसंग येत आहेत... ह्यामागे काय कारण असेल...  हा विचार करत असतानाच तो खिडकीतून बाहेर पाहत होता... मागील बाजूला एक बल्ब त्यांनी चालूच ठेवला होता.... पण तो सतत चालू बंद होत होता... त्या पुसटश्या उजेडात  त्याला बाथरूमजवळ काहीतरी भयानक आकृती दिसली.... ती त्याला बाहेर बोलावत होती... ते पाहून अविनाश घामाघूम झाला... व कोण आहे तिकडे म्हणून विचारू लागला.... इतक्यात तिथे अदवैत्य तिथे आला आणि त्याने त्याला थांबवले.... 

क्रमश..... 

लेखिका - सौ. अनुष्का हणमसागर 
© Anu Swapn Blog
 

पुढे ह्या सर्वांसोबत काय काय घटना घडतात हे वाचण्यासाठी मधुमिता - एक भयकथा - भाग 4 साठी कंमेंट करा... लाईक करा...

(टीप - वरील लेखाचे सर्व अधिकार हे लेखिकेकडे अबाधित आहेत.... जर कोणी हे लिखाण आपल्या लेखनात जसेच्या तसे वापरले तर कॉपी राईट होऊ शकते.... वरील लेखन हे कोणतीही अंधश्रद्धा पसरविण्यासाठी केले नाही... हि एक मनोरंजन कथा आहे... जरी लेखन शेअर करावयाचे असल्यास वेबसाईट लिंक सहित शेअर करावेत... ह्यातील व्यक्ती आणि कथा काल्पनिक आहेत आणि जरी ह्या कोणाच्या आयुष्याशी मिळत्या जुळत्या असतील तर तो केवळ योगायोग समजावा... धन्यवाद)

वरील मधुमिता - एक भयकथा - भाग 3 आवडल्यास भाग 4 साठी नक्कीच कंमेंट करा.... कंमेंट केल्यास लवकरात लवकर चौथा भाग प्रकाशित करेन






Read More
  • Share This:  

# मधुमिता - एक भयकथा - भाग 2 #

 July 25, 2020     article     1 comment   

Madhumita Bhag 2


मधुमिता - एक भयकथा - भाग 2


मनोहर काकांनी सर्वांचे सामान आत नेले... सर्वजण बाहेरून फार्महाऊस बघण्यात गुंग होते... 

पूर्वा अविनाशला म्हणाली, " काय सुंदर आहे रे तुझे फार्महाऊस..."

अविनाश पूर्वाला म्हणाला, " तुला आवडले ना, मग बस झाले..."

फार्महाऊसमध्ये जुन्या काळातील बसायला लाकडी झोपाळाही होता.... तर समोर छान जुन्या काळातील आरामदायी लाकडी खुर्चीही होती.... सर्वजण आत निघाले, इतक्यात एक भलीमोठी पाल सीमाच्या अंगावर पडली.... आणि ती घाबरून जोरात किंचाळली... 

अविनाश सीमाला म्हणाला, " घाबरटच आहे कुठली, इतक्याशा पालीला पाहून कोण घाबरत होय..."

 तिचा केविलवाणा चेहरा पाहून सर्वजण हसायला लागले... आतूनही फार्महाऊस तितकेच सुंदर होते.... बऱ्यापैकी सर्व वस्तू ह्या लाकडी आणि जुन्या काळातीलच होत्या.... आतील बाजूस एक मोठा हॉल, एक मोठे स्वयंपाक घर, धान्य आणि बाकीचे सामान ठेवायला एक खोली, चार मोठ्या बेडरूम्स, लाकडी जिना होता.... आणि जरा दूर मागील बाजूस बाथरूम्स आणि टॉयलेट्स होते.... त्याला लागूनच आलेल्या पाहुण्यांना राहायला दोन खोल्या होत्या....  एक विहीर होती... फार्महाऊस आणि त्यामध्ये अंतर जरा जास्तच होते... आजूबाजूला झुडपे उगवली होती.... पिंपळाचे आणि कढीपत्त्याची झाडे होती.... 

मनोहर काकांनी सर्वांना फ्रेश व्हायला सांगितले.... अविनाशने सर्वांना बाथरूम्स आणि टॉयलेट्स दाखविले... इतक्यात मनोहर काकांनी सर्वांना चहा टाकला.... पहिल्यांदा अविनाश बाथरूम मध्ये काही साप वैगेरे आहे का हे पाहण्यासाठी गेला, कारण आजूबाजूला शेती असल्यामुळे तिथे त्यांचा वावर असायचा... तो जसा आतमध्ये गेला, तसा त्याला एक बदल जाणवला.... बाथरूमच्या फरश्या, भिंतीवरील टाईल्स, नळ हे सर्व बदलले होते.... त्याने बाहेर आल्यानंतर ह्याबद्दल मनोहर काकांना विचारले.... 

👇CLICK THE BELOW PRODUCT FOR ORDER👇


मनोहर काका अविनाशला  म्हणाले, " मला ह्यातील जास्त काही माहिती नाही कारण मी त्यावेळी दोन दिवस शहरात कामासाठी गेलो होतो... त्यावेळी ह्या बदलल्या गेल्या आहेत....  तुझ्या काकांचे सेक्रेटरी विजूने बदलल्या आहेत... मी त्याला विचारलं तर तो म्हणाला चोकअप झाले होते, म्हणून बाथरूम फोडायला लागले... पण मला एक कळत नाही कि कोणीच तिकडे जात नाही तर चोकअप कसे काय होऊ शकते... मी सकाळी असतो आणि हा रात्री असतो... आणि परत मी त्याला विचारणार होतो, पण पंचवीस तीस दिवस झाले, मला तो गावात दिसलाच नाही.... तुम्ही यायच्या आधी रात्री त्याच्या घरी किल्ली द्यायला गेलो होतो पण तो नव्हताच... त्याची बायको होती, ती म्हणाली कि कसलं तरी त्याच मुंबईत काम आहे म्हणून तो मुंबईला गेला आहे...."

अविनाशनेहि तो विषय डोक्यातून काढून टाकला.... काही तरी कारण असल्याशिवाय विजू काका असे बदल करणार नाही.... सर्वजण फ्रेश होऊन आले.... मनोहर काकांनी सर्वांना चहा दिला.... सर्वांनाही प्रवासाचा क्षीण आला होता... तरी पण सर्वांना डॉक्युमेंटरीची तयारी करायची होती... त्यांची चर्चा चालू झाली कि, उद्या काय काय करायचे, कुठे कुठे जायचे, वैगेरे.... ह्यामध्ये त्यांचा बराच वेळ गेला.... अजून रात्रीचे ८:३० च होत होते पण इतक्यातच बारा वाजल्यासारखे वाटत होते.... कारण बाहेर एकदम भयाण शांतता होती... रातकिड्यांचा आवाज येत होता.... अविनाशने घड्याळाकडे पाहिलं तर १:३० वाजला होता त्यात.... पण मोबाईलमध्ये पाहिलं तर अजून रात्रीचे ८:३० च झाले होते.... त्याने मनोहर काकांना विचारले घड्याळ बंद पडले आहे का????

मनोहर काका म्हणाले, " हो रे आता दहा बारा दिवस असेच चालू आहे, मी सेल घालतो आणून आणि रोज ते १:३० वाजेपर्यंत येते आणि पुन्हा बंद पडते... कदाचित आतच काहीतरी खराबी झाली असेल.... चला आता जेवून घ्या.... आणि झोप बरं"

मनोहर काकांनी जेवणाचा बेतही फक्कड केला होता... भाकऱ्या, गावरान मसाला वांग, पापड, खर्डा, बरोबर तोंडी लावायला आंब्याचं लोणचं, पातीचा कांदा, तळलेल्या मिरच्या आणि जेवण झाल्यानंतर ताक.... ह्या मुलांनाही बर्गर, पिझ्झा खाऊन कंटाळा आला होता... आणि अशा वातावरणात इतकं सुंदर जेवण मिळाल्यामुळे सर्वजण जेवणावर तुटून पडले.... सर्वजण कंटाळा आल्यामुळे झोपायला गेले... मनोहर काकांनी मुलांना एक आणि मुलींना एक अशा दोन रूम्स तयार करून दिल्या.... गाद्या घातल्या.... सर्वजण पडल्या पडल्याचं झोपी गेले.... सकाळी उठून सर्वजण परत घाटात आले, मस्त धबधब्याचा आनंद घेतला, सेल्फीज काढल्या.... गावात गावाची माहिती घ्यायला गेले.... व्हिडिओज घेतले... पण अजूनही अविनाशला गावात काहीतरी विचित्रच चाललंय असं वाटत होत.... कारण खरंच गावात जास्त मुलीचं नव्हत्या.... त्यानं तसं लोकांना विचारलंही पण लोकही सरळ उत्तर देत नव्हती... ह्या सर्वांचे गावात दोन तीन दिवस असेच गेले.... आता अमावास्याही जवळ आली होती.... त्यामुळे मनोहर काकांनी सर्वांना सूचना दिली.... कि आता रात्रीचे बाहेर पडायचं नाही.... अमावस्या जवळ आली आहे.... 

अविनाश म्हणाला, " काहीही काका, आम्ही असले काही मानत नाही.... आणि आताच्या युगात असे बोलणे म्हणजे मूर्खपणाचे लक्षण मानले जाते...."

मनोहर काका म्हणाले, " असू दे... पण गावाकडील लोक ह्या गोष्टी मानतात.... आणि तुमची माझ्यावर जबाबदारी आहे... त्यामुळे मी हे सर्व तुम्हाला सांगत आहे... 

अविनाश मनोहर काकांना म्हणाला, " ते जाऊदे सर्व पण मला सांगा आपली मधुमिता ताई कुठे असते??"

मनोहर काका म्हणाले, " तुझ्या मधुमिता ताईचे लग्न झाले... तीन वर्षांपूर्वीच.... ती तिच्या नवऱ्याच्या घरी असते...."

अविनाश म्हणाला, " काका तिचे लग्न झाले आणि मला कसे नाही बोलावले.... मलाही बहीण नाही... आणि मी तिला आपल्या बहिणीसारखेच मानत होतो...." 

मनोहर काका सांगू लागले, " अरे ती सोशल वर्किंग वरचा कसला तरी कोर्स करायला मुंबईला गेली होती... आणि तिथे तिला सुभाष नावाचा मुलगा भेटला... तो पत्रकार आहे... तिथेच तिचे प्रेमप्रकरण जुळले... पण सुभाष हा अनाथ होता... आणि त्याच्याबद्दल कुणालाच काही माहित नव्हते.... मधुमिताने हे सर्व आपल्या घरी सांगितले आणि घरच्यांनी ह्या सर्व प्रकरणाला विरोध केला... मग ह्या मुलीने परस्पर लग्न उरकून घेतले... आणि गावाची दारे तिच्यासाठी बंद झाली.... फक्त आता त्यांच्या संसाराच्या वेलीवर एक फुल फुलायला पाहिजे बघ... तीन वर्ष झाली अजून मुलबाळ काही नाही त्यांना... 

जगदीश म्हणाला, "असे का हे लोक प्रेमाला का विरोध करतात हेच कळत नाही..."

मनोहर काका म्हणाले, " गावाकडील साधी भोळी लोक हि, त्यांना आपली इज्जत जास्त महत्वाची असते... "

मात्र एक सांगू, सुभाष खरंच चांगला मुलगा आहे.... त्याला परिस्थितीची जाणीव आहे... खूप जपतो मधुमिताला.... आणि मलाही भेटायला येतो....  कधी शहरात काही काम असेल तर मदत करतो.... तो म्हणत असतो कि, एकदा तरी मधुमिताच्या आई बाबांनी आम्हाला घरात घ्यावं....  माझा स्वभाव बघावा... मलाही आई वडील नाहीत, मी त्यांची काळजी घेईन... ... पण हि झाली गावाची लोक त्यांना असले काही सांगितलेलं पटत नाही... जाऊ दे!!... अगदी छान चाललंय तीच शहरात.... एक महिन्यापूर्वी आले होते गावात इकडे मला भेटायला.... पण मी जाणार होतो माझ्या कामानिमित्त शहरात... अरे त्या वीजुनी बाथरूमच्या टाईल्स बदलल्या ना त्या वेळचीच गोष्ट... मधुमिता मला असे काही सरप्राईझ देणार होती कि ते सुभाषलाही अजून माहिती नव्हते.... त्या दोघांना गावात माझ्या घरात कसे ठेवायचे म्हणून आपल्या गेस्टहाऊसची किल्ली मी मधुमिताला दिली होती... पण मी जेव्हा शहरातून परत आलो तेव्हा हि दोघेही नव्हते  इथे आणि किल्लीही चुकून घेऊन गेलेत बरोबर.... मी परत फोन लावला त्यांना पण दोघांचेही फोन नाही लागत... मला वाटते कि सुभाषला काहीतरी अर्जंट काम आले असेल म्हणून परत गेली असतील शहरात... असो मी जातो आता अंधारही खूप पडायला लागला आहे आणि इकडे प्राण्यांची भीती आहे.... रात्रीचे जेवण तयार करून मनोहर काका निघून गेले.... 

रात्री आठच्या दरम्यान सर्वांनी जेवण केले... आणि नंतर डॉक्युमेंट्रीची तयारी करत होते... हे करता करता रात्रीचे अकरा वाजून गेल्याचेहि त्यांना नाही कळले... 

आता सीमाला वॉशरूमला जायचे होते... दोन तीन दिवस एकट्याला जायला काही वाटले नाही... पण मनोहर काकांच्या बोलण्यामुळे आता जायला भीती वाटू लागली होती....  बाथरूमही बाहेर असल्यामुळे आणखी जास्तच भीती बसलेली... पण सीमाची परवा सर्वांनी घाबरट म्हणून खिल्ली उडवली होती त्यामुळे तिने स्वतःला धीर दिला... आणि ती बाहेर पडली... ती बाहेर पडली आणि फार्महाऊसमधली लाईट गेली.... 

क्रमश..... 

लेखिका - सौ. अनुष्का हणमसागर 
© Anu Swapn Blog
 

पुढे ह्या सर्वांसोबत काय काय घटना घडतात हे वाचण्यासाठी मधुमिता - एक भयकथा - भाग ३ साठी कंमेंट करा... लाईक करा...

(टीप - वरील लेखाचे सर्व अधिकार हे लेखिकेकडे अबाधित आहेत.... जर कोणी हे लिखाण आपल्या लेखनात जसेच्या तसे वापरले तर कॉपी राईट होऊ शकते.... वरील लेखन हे कोणतीही अंधश्रद्धा पसरविण्यासाठी केले नाही... हि एक मनोरंजन कथा आहे... जरी लेखन शेअर करावयाचे असल्यास वेबसाईट लिंक सहित शेअर करावेत... ह्यातील व्यक्ती आणि कथा काल्पनिक आहेत आणि जरी ह्या कोणाच्या आयुष्याशी मिळत्या जुळत्या असतील तर तो केवळ योगायोग समजावा... धन्यवाद)

वरील मधुमिता - एक भयकथा - भाग 2 आवडल्यास भाग 3 साठी नक्कीच कंमेंट करा.... कंमेंट केल्यास लवकरात लवकर तिसरा भाग प्रकाशित करेन









Read More
  • Share This:  

# मधुमिता - एक भयकथा - भाग १ #

 July 20, 2020     article     5 comments   



मधुमिता - एक भयकथा - भाग १


अविनाश, रोहित, सायली, पूर्वा, जगदीश, सीमा आणि अद्वैत्य हे सातजण अगदी लहानपणासूनच मित्रमैत्रिणी.... अगदी "लंगोटी मित्रच" म्हणतात ना!!! अगदी तसेच.... शाळेत आणि कॉलेजमध्येही शिकायला एकत्रच होते.... एकाच कॉलनीत राहत असल्याने त्यांच्या दंग्याने सर्व आजूबाजूचा परिसर अगदी दणाणून निघायचा.... ह्यांची मैत्री म्हणजे अगदी गल्लीबोळात फेमस होती..... कधी ग्रुपमध्ये कोणावर काही प्रसंग ओढवला तरी ते सर्वजण एकमेकांच्या मदतीला धावणार.... तसेच गल्लीत गणपती उत्सव, नवरात्र उत्सव, इत्तर काही कार्यक्रम असले तर त्यात हे सर्वजण पुढे असायचे.... 

अविनाश हा अत्यंत श्रीमंत आणि राजकारणी घरात जन्मलेला... त्याचे बाबा आणि काकांचा मोठा बिझिनेस होता कपड्यांचा... ते कामानिमित्त स्वतःचे गाव सोडून शहरात येऊन वसलेले.... अविनाशचे आजोबा गावाचे माजी सरपंच तर... काकाही सोसायटीचे चेअरमन होते.... त्यांच्या आजूबाजूला लोकांची सतत गर्दी होती... त्यांचा दराराही गावात होता, त्यामुळे गावातले लोक त्यांना जरा घाबरूनच असायचे.... गावामध्ये त्यांचे जमीन, शेती, जुना वाडा, फार्म हाऊस त्याला लागूनच गेस्ट हाऊस अशी संपत्ती होती....   काकांचे सेक्रेटरी व मनोहर काका हे दोघे तेथील सर्व सांभाळत होते.... रोहितचे वडील प्राध्यापक होते.... सायलीचे वडील सरकारी हुद्द्यावर काम करायचे.... तर पूर्वा, सीमा आणि जगदीशच्या वडिलांचे छोटे मोठे उद्योगधंदे होते.... पण अद्वैत्यच्या वडिलांचा बिझिनेस काही निराळाच होता.... मांत्रिक असल्यासारखेच होते पण बाकी काही किरकोळ कामे करून घर चालवायचे.... मांत्रिक हा त्यांचा साईड बिझिनेस म्हणावा लागेल....

👇CLICK ON BELOW IMAGE FOR GETTING PRODUCTS

 
 आता नुकतेच कॉलेजला दिवाळीची सुट्टी चालू झाली होती.... सर्वांना कुठेतरी एकत्र फिरायला जायचे होते.... पण यंदा अविनाशच्या आई बाबांच्या लग्नाचा २५ वा वाढदिवस असल्याने, अविनाशला तो खूप मोठा सेलिब्रेट करायचा होता... म्हणजे अविनाशला त्यांच्या आईबाबांना एक सरप्राईझ पार्टी द्यायची होती.... त्याने हि गोष्ट सवंगड्यांना बोलून दाखवली.... सायलीच्या डोक्यात एक कल्पना आली कि, अविनाशच्या गावाकडे अविनाशच्या मोठे फार्महाऊस आहे.... तिथे आई बाबांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला तर??? .... 

सायली म्हणाली कि, " आपण आईबाबांच्या सर्व मित्र मैत्रिणींना तिकडे बोलावयाचे तिथे खूप मोठी पार्टी अरेंज करूया, तसेही आपल्याला सुट्टीमध्ये गावाकडील गोष्टी ह्या विषयावर डॉक्युमेंटरी करायलाच सांगितली आहे आणि अभ्यासाचा विषय आहे म्हंटल्यावर कोणी तिकडे जायला अडवणाराही नाही. आपल्याला वाढदिवसाची तयारी हि करता येईल आणि अभ्यासही होईल."  अविनाश आणि बाकी सर्वांना हि कल्पना आवडली... अजून वाढदिवसाला १ महिना अवकाश होता... सर्वांनी आपापल्या घरातील लोकांना गावाकडे अभ्यासासाठी जाणार आहेत असे सांगून घरातल्या लोकांची परवानगी मिळवली.... तिकडे जाण्यासाठी सामानाची जुळवा जुळव करायला चालू केले... कोणी टॉर्च घेतले, कोणी तिकडे सारखी लाईट जाते म्हणून मेणबत्त्या घेतल्या, कॅमेरा, मोबाइल चार्जर, अभ्यासासाठी लागणारे सर्व सामान घेतले..... अविनाशने सर्व मुलींना भडंग, चिवडा, चकली आणि टिकणारे पदार्थ घ्यायला सांगितले.... गाव जरा लहान असल्यामुळे तिथे काही मिळेल कि नाही हे सांगता येत नव्हते त्यामुळे सॉफ्ट ड्रिंक्स, वेफर्स वैगेरे घेतले.... फक्त लग्नाच्या वाढदिवशी ते बाहेरून केटरर्स, डेकोरेटर्स सांगणार होते.... 

आता गावाकडे जायचा दिवस उजाडला... सर्वजण आपल्या सामानासहित अगदी वेळेवर तयार होऊन बाहेर पडलेले.... अविनाशच्या स्वतःची चारचाकी गाडी होती, त्या गाडीनेच सर्वजण जाणार होते.... गाडी निघाली.... गाडी घाटातून जात होती.... नुकताच पावसाळा संपलेला होता.... धबधबे अजूनही छान पडत होते.... सर्वत्र हिरवळ पसरली होती.... मस्त मनाला लुभावणारे वातावरण होते.... हि सुट्टी अगदीच छान जाणार म्हणून मनातून सर्वजण सुखावले होते.... निसर्ग तर त्याच्या रूपाचे लावण्य दाखवत होता.... डोंगर, दऱ्यांनी हिरवाईचा साज पांघरलेला होता... निसर्गाची लोभस रूपे पाहून मुले भारावून गेली होती....

पूर्वा म्हणाली, " इतकं मस्त वातावरण बघून मला तर गाडीतून उतरून नाचावंसंच वाटतंय.... "

जगदीश म्हणाला, "खूप सुंदर वातावरण आहे रे इकडे आपण थोडे सेल्फीज, फोटोज काढूया इथे...."

अविनाश म्हणाला, " हो रे आपण आता महिनाभर इथेच आहोत, एखादा दिवस येऊ ह्या ठिकाणी फोटोशूट करायला... फोटो काढत बसला तर खूप वेळ होईल जायला....  "

गाडी जशी गावाच्या जवळ आली तशी जगदीशाला चेष्टा करण्याची लहर आली... तो अविनाशला म्हणाला, "अविनाश गावात काही हिरवळ नाही दिसत..." (म्हणजे त्याच्या म्हणण्याचा अर्थ होता कि गावात एकही त्यांच्या वयाची मुलगी नाही दिसत) 

सीमा म्हणाली, " अजून गावात आला नाही तोपर्यंत ह्याचे झाले चालू चेष्टा करायचे.... "

खरंच अविनाशने नजर टाकली, तर त्यांच्या वयाच्या मुलीचं दिसत न्हवत्या... तो विचार करू लागला कि आपण लहानपणी गावात यायचो तेव्हा आपल्या वयाच्या कितीतरी मुली आपल्यासोबत खेळायला यायच्या.... बहुतेक त्यांची लग्न झाली असतील... असे म्हणून त्याने मनातील विचार काढून टाकला.... 

फार्महाउस गावापासून ३ ते ४ किलोमीटर अंतरावर होते.... डोंगराखाली बांधलेले.... शेजारी फक्त अविनाशचीच शेती होती.... शेतीची आणि फार्महाऊसची देखरेख मनोहर काका करायचे.... कोणी नसेल तर रात्री ते आपल्या घरी गावात जायचे... रात्री जाताना फार्महाऊसची किल्ली ते काकांचे सेक्रेटरी विजू काकांकडे द्यायचे... मनोहर काकांना अविनाशच्या आईने आधीच फोन करून सांगितले होते कि, हे सातजण येणार आहेत राहायला, त्यांची महिन्याच्या खाणपिण्याची तयारी करून ठेवायला.... मनोहर काकांनी फार्महाऊस झाडून घेतले व स्वयंपाकाची तयारी करून ह्यांची वाट पाहू लागले.... 
 
गाडी जसजशी फार्महाऊसकडे वळाली तसतशी शांतता अगदीच गर्द होऊ लागली.... खूप सुंदर, घनदाट जंगलच होते तिथे पण चिटपाखरूही दिसत नव्हते.... नाही पक्ष्यांचा किलबिलाट, नाही प्राण्यांचा आवाज.... एकदम स्तब्ध शांतता होती तिकडे.... इतकी झाडे होती तिथे पण वातावरण जरा कोंदाटच होते तिथले.... बघता बघता फार्महाउस जवळ आले.... खरंतर तो एक जुना वाडा होता, त्यात थोडे बदल करून फार्महाऊस केले होते त्याचे.... फार्महाऊस अगदी छान, टुमदार होते.... समोर नारळाची बाग होती... चिक्कूची, आंब्यांची, चिंचांची झाडे होती... सुंदर फुलांची झाडे होती... समोर छोटे तुळशी वृंदावन होते.... तिन्ही बाजूला तुळशीची छान रोपे उगवली होती... तिच्या मंजुळांचा दरवळ अगदी वातावरणात मिसळला होता... फार्महाऊसच्या मागील बाजूला छोटासा झरा वाहत होता... तर तेथूनच थोडे दूर, महादेवाचे जुन्या काळातील मंदिर होते.... तिथे पिंडीवर गोमुखातून अखंड पाण्याच्या धारेचा अभिषेक चालू असायचा... ते पवित्र पाणी झऱ्यात मिसळायचे आणि वाहायचे.... 

गाडी फार्महाऊस जवळ पोहोचल्याचे मनोहर काकांना हॉर्नच्या आवाजावरून कळले व ते सामान घेण्यासाठी आतून बाहेर आले.... 

क्रमश..... 

लेखिका - सौ. अनुष्का हणमसागर 
© Anu Swapn Blog
 

पुढे ह्या सर्वांसोबत काय काय घटना घडतात हे वाचण्यासाठी मधुमिता - एक भयकथा - भाग २ साठी कंमेंट करा... लाईक करा...

(टीप - वरील लेखाचे सर्व अधिकार हे लेखिकेकडे अबाधित आहेत.... जर कोणी हे लिखाण आपल्या लेखनात जसेच्या तसे वापरले तर कॉपी राईट होऊ शकते.... वरील लेखन हे कोणतीही अंधश्रद्धा पसरविण्यासाठी केले नाही... हि एक मनोरंजन कथा आहे... जरी लेखन शेअर करावयाचे असल्यास वेबसाईट लिंक सहित शेअर करावेत... ह्यातील व्यक्ती आणि कथा काल्पनिक आहेत आणि जरी ह्या कोणाच्या आयुष्याशी मिळत्या जुळत्या असतील तर तो केवळ योगायोग समजावा... धन्यवाद)

वरील मधुमिता - एक भयकथा - भाग १ आवडल्यास भाग २ साठी नक्कीच कंमेंट करा.... कंमेंट केल्यास लवकरात लवकर दुसरा भाग प्रकाशित करेन

 




Read More
  • Share This:  

Chinese Applications Alternatives # चायनीज ऍप्लिकेशन्स पर्याय #

 July 08, 2020     Tech & Educational     No comments   


                    

Chinese Application Alternatives V/S Other Applications 
   
        भारताच्या सार्वभौमत्वाला आणि अखंडतेला धोका असलेल्या ५९ चायनीज ऍप्लिकेशन्स वापरण्यावरवर भारताने बंदी घातलेली आहे. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने गोपनीयतेची चिंता व्यक्त करत ह्या ऍप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. भारत सरकारने मोबाइल आणि बिगर मोबाइल ह्या दोन्ही उपकरणांत वापरण्यात येणाऱ्या चायनीज ऍप्स नाकारल्या आहेत. त्यात सर्वात लोकप्रिय असलेल्या टिक टॉक वर बंदी घातल्याने वापरकर्ते जरा नाराजच आहे. पण सध्याची परिस्थिती पाहता भारताच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चायनीज ऍप्सवर बंदी घालणे हे सरकारचे मोठे पाऊलच म्हणावे लागेल. 

तर कोणकोणत्या चायनीज ऍप्लिकेशन बंद झाल्या आहेत त्याची यादी खालीलप्रमाणे: 

१. टिक टॉक (Tik Tok ), 
२. शेअर ईट (Shareit), 
३. क्वाई (Kwai), 
४. यू सी ब्राउझर (UC Browser),
५. बैदु मॅप (Baidu map), 
६. शी इन (Shein), 
७. क्लॅश ऑफ किंग्स (Clash of Kings), 
८. डीयू बॅटरी सेव्हर (DU battery saver),
९. हॅलो (Helo),
१०. लायकी (Likee),
११. युकॅम मेकअप (YouCam makeup),
१२. एम आई कम्युनिटी (Mi Community),
१३. सी एम ब्राउझर (CM Browers ),
१४. व्हायरस क्लिनर (Virus Cleaner),
१५. एपीयुएस ब्राउझर (APUS Browser), 
१६. रॉमवे (ROMWE), 
१७. क्लब फॅक्टरी (Club Factory), 
१८. न्यूजडॉग (Newsdog), 
१९. ब्यूट्री प्लस (Beutry Plus), 
२०. वी चॅट (WeChat), 
२१. यू सी न्यूज (UC News), 
२२. क्यू क्यू मेल (QQ Mail), 
२३. वेईबो (Weibo), 
२४.झेंडर (Xender), 
२५. क्यू क्यू म्युझिक (QQ Music), 
२६. क्यू क्यू न्यूज फीड (QQ Newsfeed), 
२७. बिगो लाईव्ह (Bigo Live), 
२८. सेल्फी सिटी (SelfieCity), 
२९. मेल मास्टर (Mail Master), 
३०. पॅरलल स्पेस (Parallel Space), 
३१. एम आई व्हिडिओ कॉल - शोऊमी ( Mi Video Call – Xiaomi), 
३२. वीसिंक (WeSync), 
३३. ई एस फाईल एक्सप्लोरर (ES File Explorer), 
३४. व्हिवा व्हिडीओ - क्यू यू व्हिडिओ (Viva Video – QU Video Inc), 
३५. मिटू (Meitu), 
३६. वीगो व्हिडिओ (Vigo Video), 
३७.न्यू व्हिडिओ स्टेटस ( New Video Status), 
३८. डी यू रेकॉर्डर ( DU Recorder), 
३९. व्हॉल्ट-हाईड (Vault- Hide), 
४०. कॅच क्लिनर डी यू एप स्टुडिओ (Cache Cleaner DU App studio),
४१. डी यू क्लिनर (DU Cleaner), 
४२. डी यू ब्राउझर (DU Browser), 
४३. हागो प्ले विथ न्यू फ्रेंड (Hago Play With New Friends), 
४४. कॅम स्कॅनर (Cam Scanner), 
४५. क्लीन मास्टर - चिता मोबाईल (Clean Master – Cheetah Mobile), 
४६. वंडर कॅमेरा ( Wonder Camera), 
४७.फोटो वंडर ( Photo Wonder), 
४८. क्यू क्यू प्लेअर (QQ Player), 
४९. वी मीट ( We Meet), 
५०. स्वीट सेल्फी( Sweet Selfie), 
५१. बैदु ट्रान्सलेट (Baidu Translate), 
५२. व्ही मेट (Vmate), 
५३. क्यू क्यू इंटरनॅशनल (QQ International), 
५४. क्यू क्यू सेक्युरिटी सेंटर ( QQ Security Center), 
५५. क्यू क्यू लाँन्चर (QQ Launcher), 
५६. यू व्हिडिओ  (U Video), 
५७. व्ही फ्लाय स्टेटस व्हिडिओ( V fly Status Video), 
५८. मोबाइल लिजंड्स (Mobile Legends), 
५९. डी यू प्रायव्हसी (DU Privacy), इत्यादी. 

        तर ह्यातील बऱ्याच एप्लिकेशन्स भारतात मोठ्या प्रमाणात दैनंदिन जीवनात वापरल्या जात असायच्या. (उदा. मॅप्ससाठी, गेम खेळण्यासाठी, चॅटिंगसाठी, भाषा ट्रान्सलेट करण्यासाठी)आता भारतात ह्या एप्लिकेशन्सवर बंदी घातल्यामुळे लोकांची थोडीफार गैरसोय होत आहे. मात्र भारतात आणि इतर देशांमध्ये ह्या एप्लिकेशन्सना तोडीस तोड एप्स तयार झाल्या आहेत. त्या एप्लिकेशनची माहिती खालीलप्रमाणे आहे. त्याला पर्याय देखील भरपूर आहेत. 

चायनीज एप्लिकेशन्स  V/S  इतर देशांच्या एप्लिकेशन्स 




  • टिक टॉक (Tik Tok ),  हॅलो (Helo), बिगो लाईव्ह (Bigo Live), वीगो व्हिडिओ (Vigo Video),  यू व्हिडिओ  (U Video), क्वाई (Kwai), हे शॉर्ट व्हिडिओ मनोरंजनावर आधारित प्लॅटफॉर्म आहेत. ह्या एप्लिकेशन्स साठी पर्याय खालीलप्रमाणे:
        १. मित्रो (Mitron)
        २. बोलो इंडिया (Bolo Indya)
        ३. रोपोसो (Roposo)
        ४. डबस्मॅश (Dubsmash )
        ५. चिंगारी (chingari)
        ६. ट्रिलर (Triller)

  • बैदु ट्रान्सलेट (Baidu Translate) हे एका भाषेचे रूपांतर इतर भाषांमध्ये करण्यासाठी वापरले जात होते.  ह्या एप्लिकेशन्स साठी पर्याय खालीलप्रमाणे:
        १. गुगल ट्रान्सलेट (Google Translate )
        २. हाय ट्रान्सलेट (Hi Translate )

  • वी चॅट (WeChat),  वी मीट (We Meet) हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत.  ह्या एप्लिकेशन्स साठी पर्याय खालीलप्रमाणे:
        १. फेसबुक  (Facebook)
        २. इंस्टाग्राम (Instagram)
        ३. व्हाट्सअप (whats up)

  • हागो प्ले विथ न्यू फ्रेंड (Hago Play With New Friends) हे एक गेमिंग आणि चॅटींग एप्लिकेशन आहे.  ह्या एप्लिकेशन्स साठी पर्याय खालीलप्रमाणे:
        १.हाऊस पार्टी (Houseparty)

  • शेअर ईट (Shareit), .झेंडर (Xender),  ई एस फाईल एक्सप्लोरर (ES File Explorer), हे  एप्लिकेशन्स फाईल ट्रान्सफर करण्यासाठी तसेच आपल्या डीवाईस वरील ऍप्स ट्रान्सफर करण्यासाठी वापरतात. ह्या एप्लिकेशन्स साठी पर्याय खालीलप्रमाणे:
        १.फाईल्स गो  (Files Go),
        २. गुगल ड्राईव्ह (Google Drive)
        ३. शेअर ऑल(Share All)
        ४. जिओ स्वीचं (Jio Switch)
        ५. स्मार्ट शेअर(Smart Share)
        ६. सेंड एनीव्हेअर (Send Anywhere)

  • यू सी ब्राउझर (UC Browser), सी एम ब्राउझर (CM Browers), एपीयुएस ब्राउझर (APUS Browser), झेंडर (Xender),  डी यू ब्राउझर (DU Browser), हे  एप्लिकेशन्स सर्च इंजिन आहेत. ते माहिती सर्च करण्यासाठी वापरतात. ह्या एप्लिकेशन्स साठी पर्याय खालीलप्रमाणे:

        १. गुगल क्रोम (Google Chrome )
        २. जिओ ब्राउझर (Jio browser)
        ३. ऑपेरा (Opera)
        ४. मायक्रोसॉफ्ट एज  (Microsoft Edge)
        ५. मोझीला फायरफॉक्स (Mozilla Firefox),

  • मोबाईल लिजंड्स (Mobile Legends) हे गेमिंग एप्लिकेशन्स आहे.  ह्या एप्लिकेशन्स साठी पर्याय खालीलप्रमाणे:

        १. फोर्टनायट बॅटल रॉयल (Fortnite Battle Royal )
        २. लिजंड्स ऑफ लिजंड्स(Legends of Legends)

  • बैदु मॅप (Baidu map) हे एप्लिकेशन्स आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणाचा नकाशा स्क्रीन वर दाखवत.  ह्या एप्लिकेशन्स साठी पर्याय खालीलप्रमाणे:

        १. गुगल मॅप्स  (Google Maps)
        २. ऍपल मॅप्स  (Apple Maps)

  • शी इन (Shein), रॉमवे (ROMWE), क्लब फॅक्टरी (Club Factory) हे एप्लिकेशन्स ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म आहेत.  ह्या एप्लिकेशन्स साठी पर्याय खालीलप्रमाणे:

        १. मिन्त्रा (Myntra),
        २. अमेझॉन  (Amazon)
        ३. फ्लिपकार्ट (Flipkart)
        ४. अजिओ (Ajio)
    
  • कॅम स्कॅनर (Cam Scanner) हे एप्लिकेशन्स डॉक्युमेंट स्कॅनींग करण्यासाठी तसेच डिजिटल कॉपीज तयार करण्यासाठी वापरतात.  ह्या एप्लिकेशन्स साठी पर्याय खालीलप्रमाणे:

        १. ऍडोब स्कॅन (Adobe Scan)
        २. फोटो स्कॅन  (Photo Scan )
        ३. मायक्रोसॉफ्ट ऑफिस लेन्स (Microsoft Office Lens)


  • युकॅम मेकअप (YouCam makeup), सेल्फी सिटी (SelfieCity), स्वीट सेल्फी(Sweet Selfie), मिटू (Meitu) ही एप्लिकेशन्स सेल्फी घेण्यासाठी तसेच फोटोज एडिट करण्यासाठी वापरतात.  ह्या एप्लिकेशन्स साठी पर्याय खालीलप्रमाणे:

        १. बी६१२ ब्युटी अँड फिल्टर कॅमेरा ( B६१२ Beauty And Filter Camera)

   
  • न्यूजडॉग (Newsdog), क्यू क्यू न्यूज फीड (QQ Newsfeed), यू सी न्यूज (UC News) ही एप्लिकेशन्स न्यूज वाचण्यासाठी वापरतात. ह्या एप्लिकेशन्स साठी पर्याय खालीलप्रमाणे:

        १. गुगल न्युज (Google News)
        २. ऍपल न्युज (Apple News)

        आपल्या भारतातील आर्थिक सुबत्ता वाढवण्यासाठी जास्तीत जास्त भारतीय एप्लिकेशन्स डाउनलोड करा. आणि चीनचे प्रॉडक्ट्स खरेदी करू नका. हि विनंती. भारतात असणाऱ्या डेव्हलपर्स नी हि आता नवीन एप्लिकेशन्स तसेच भारतातील मॅनुफॅक्चर कंपन्यानी बाकी देशांच्या सर्व प्रॉडक्ट्सना तोडीस तोड असे प्रॉडक्ट्स तथा एप्लिकेशन्स तयार करण्याचा मनसुबा ठेवायला हवा. 

धन्यवाद!!!!


( टीप - हा लेख मला ह्या विषयावर जितके माहिती आहे. माझे जितके वाचन आहे त्या आधारे लिहिला आहे. )

© Anu Swapn Blog 2020-2021

   
   
       
        

        














Read More
  • Share This:  

Rain Poem #असा एक उनाड घन #

 July 04, 2020     poem     No comments   







असा एक उनाड घन 

अंबरात नभांचा समूह दाटला, 
धुंद वाऱ्याचा नाद सोबती झाला,
धुक्यासावे पाऊस मनाला बिलगला, 
प्रेमळ क्षणांचे पाणी ओंजळीत भरुनी गेला....  
असा एक उनाड घन आला,
प्रीतीच्या जलधारा बरसवूनि गेला....  

विजांच्या लखलखाट लेवूनी मेघ गरजला, 
स्वछंद गारांसवे मातीत विरघळला, 
श्वासात मातीचा सुगंध मिसळला, 
तहानलेल्या धरतीची तृष्णा क्षमवुनी गेला....  
असा एक उनाड घन आला,
प्रीतीच्या जलधारा बरसवूनि गेला....  

कृष्णछायेत मधुर नभ बरसला, 
व्याकुळलेल्या राधेला शाम सखा भासला, 
सात्विक प्रेमाचा नवा अर्थ उमगला, 
डोळ्यात साठलेल्या सुखस्वप्नांचे बांध तोडुनी गेला....  
असा एक उनाड घन आला,
प्रीतीच्या जलधारा बरसवूनि गेला....  

मनाला तृप्ती देऊनी पाऊस थांबला, 
ढगांआडूनी सूर्यनारायण डोकावला,
सोबत इंद्रधनूच्या रंग उधळला, 
भूमातेचे सुंदर रूप खुलवूनी गेला....  
असा एक उनाड घन आला,
प्रीतीच्या जलधारा बरसवूनि गेला.... 


कवियत्री - सौ. अनुष्का हणमसागर 
© Anu Swapn Blog 2020-2021





Read More
  • Share This:  
Newer Posts Older Posts Home

Popular Posts

  • FARMER POEM एका शेतकऱ्याचे मनोगत
  • Sad love quote / विरह
  • BEST BLOGGING NICHE 2021
  • # मधुमिता - एक भयकथा - अंतिम भाग# - horror stories in marathi
ANU SWAPN BLOG

Translate

Categories

  • article
  • International women's day 2021
  • Love Quotes in Marathi
  • poem
  • Quote
  • Tech & Educational

Blog Archive

  • May 2022 (1)
  • March 2022 (1)
  • April 2021 (1)
  • March 2021 (3)
  • February 2021 (1)
  • November 2020 (1)
  • September 2020 (5)
  • August 2020 (5)
  • July 2020 (5)
  • June 2020 (2)
  • May 2020 (8)
  • April 2020 (3)

Anu Swapn blog

This blog is created for only entertainment and knowledge purpose.
Disclaimer | Contact us | Privacy Policy | Terms of us

Copyright © ANU SWAPN BLOG | Powered by Blogger