ANU SWAPN BLOG
  • Home
  • Home
  • Articles
  • Poems
  • Image Quotes
  • Tech and Educational
  • About Us

गुगलचा इतिहास आणि गुगलचा शोध कोणी लावला History of Google and Founder of Google, Google History and Information of Google

 May 11, 2022     Tech & Educational     No comments   

         


Google History
Google History
        

        आपण प्रत्येक गोष्टींची माहिती घेण्यासाठी फारच उत्सुक असतो. जगातील सर्वच लोक हे प्रत्येक गोष्टीची माहिती मिळविण्याकरिता इंटरनेटचा वापर करत असतात. नवनवीन विषयांची माहिती मिळावी यासाठीण सर्वजण फारच उत्सुक असतात. रेसिपीज्, हेल्थ, ट्रॅव्हलींग, इलेक्ट्रीकल उपकरणे, इलेक्ट्राॅनिक्स उपकरणे, एज्युकेशनल माहिती, इ. या विषयांची माहिती मिळविण्यासाठी जेव्हा आपण इंटरनेट इक्सप्लोरर उघडतो आणि त्याच्यामध्ये address बार मध्ये www.google.com हि वेबसाईट टाईप करतो. तेव्हा गुगलचे सर्च इंजिन उघडते आणि त्यामध्ये आपण आपणाला हवी असणा-या माहिती मिळविण्यासाठी key word टाकले तर google search engine आपणास हवी ती माहिती देते. एखादे उपकरण दुरूस्त करण्यापासून ते शैक्षणिक संस्थाच्या माहितीपर्यंत सर्वच गोष्टींची माहिती आपणास Google वरून मिळते. हया लेखात आपण गुगलचा इतिहास पाहणार आहोत. 

गुगलचा लाॅन्ग फाॅर्म

 Google = Global Organization Of Oriented Group Language Of Earth 

गुगलचा इतिहास आणि गुगलचा शोध कोणी लावला 

History of Google and Founder of Google/ Google History

      गुगलची सुरूवात 1996 मध्ये Larry Page आणि sergey Brin यांनी संशोधन करताना केली. Larry Page आणि sergey Brin हे California Stanford University मध्ये Phd चे विद्यार्थी होते. त्यांनी Phd करताना त्यांच्या research मध्ये नवीन काहीतरी करायचे ठरवले व त्यांनी त्यांच्या प्रयत्नातुन एक सर्च इंजिन तयार केले व त्याचे नाव “Backrub” असे ठेवले. त्यांनी Search engine ची निर्मिती करत असताना त्यांचे सहकारी Scott Hassan आणि Alan Steremberg या दोघांचीही मदत मदत घेतली. 

             आता संपुर्ण जगात गुगलचे सर्च इंजिन हे पहिल्या नंबरचे सर्च इंजिन आहे. Google हा शब्द Googol हया शब्दाचे चुकीचे स्पेलिंग आहे. Googol हा एक Mathematical शब्द आहे. त्याचा अर्थ एकावर शंभर शुन्य असा होतो.

              सुरूवातीला Google हे Google.Stanford.edu नावाच्या वेबसाईट अंतर्गत चालत होते. त्यानंतर Google ने 1997 साली स्वतःचे domain रजिस्टर केले. आता Google हे www.google.com या वेबसाईट अंतर्गत चालते. Google चे मुख्यालय हे अमेरिकेतील California राज्यात Mountain View मध्ये आहे. त्यास Googleplex या नावानेही ओळखले जाते. Google ची स्थापना ही 4 सप्टेंबर 1998 रोजी झाली आणि Google चा वाढदिवस (Google Birthday) हा 27 सप्टेंबर रोजी केला जातो.

              1996 मध्ये गुगलने पहिले Doodle Homepage बनवले होते. त्यानंतर गुगलने वेगवेगळे Doodles तयार करण्यास सुरूवात केली. जेव्हा आपण Google चे Webpage ओपन करतो तेव्हा त्यावर आपणास वेगवेगळे Doodles पाहायला मिळतात.

                  Google आपणास Artificial Intelligence, Advertising, Cloud Computing, Computer Software, Computer Hardware, Internet यांसारख्या सेवा पुरविते. 

 गुगल कंपनीचे एकुण चार प्रमुख व्यक्ती आहेत. (Keypeople of Google Compony)

1 सुंदर पिचाई (Sundar Pichai (CEO)) जे गुगल कंपनीचे सीईओ आहेत.

2 रूथ पोराट (Ruth Porat (CFO)) हे गुगल कंपनीचे सी एफ ओ आहेत.

3 थाँमस कुरियन (Thomas Kurian (CEO, Google Cloud Platrform))हे गुगल क्लाऊड प्लँटफाँर्मचे सीईओ आहेत.

4 प्रभाकर राघवन Prabhakar Raghavan (SVP, search, ads, and e-commerce) हे गुगल कंपनीच्या जाहीरात तसेच ई काँमर्स क्षेत्राचे एसवीपी आहेत.

 

गुगलचा वापर करण्याचे फायदे कोणकोणते आहेत (Uses of Google, Profit of Google, Features of Google )

1.जगातील कोणतीही आणि कुठलीही माहीती आपण गुगल सर्च इंजिनचा वापर करून प्राप्त करू शकतो.

2.गुगल मँपचा वापर करून आपण कोणत्याही ठिकाणाच्या दिशेची माहिती घेवू शकतो.

3.आपल्या बिझनेसला जगभरात पोहचवण्यासाठी त्यावर गुगलच्या अँड लावू शकतो.

4.ब्लाँगर,युटयुबर तसेच मोबाईल अँप डेव्हलपर द्वारे आपण लोकांपर्यंत माहिती पोहोचवू शकतो तसेच गुगल अँडसेन्सद्वारे पैसे कमावू शकतात.

5.आपल्याला हव्या असलेल्या प्रश्नांची उत्तरे प्राप्त करू शकतो.

6.जगभरातील कुठलीही माहीती आपण गुगलद्वारे सेकंदात प्राप्त करू शकतो.

7.वेगवान सेवा हे सुदधा गुगलचे आणखी एक वैशिष्टय आहे.

8.मोफत सेवा हे गुगलचे तिसरे वैशिष्टय आहे ज्यात आपल्याला माहीती मिळविण्यासाठी कुठलाही चार्ज भरावा लागत नसतो.

Google Products and Service गुगलचे कंपनीचे प्रोडक्टस आणि सर्विसेस खालीलप्रमाणे आहेत:- 

1) Android (अँड्रॉईड) :-

    Android हि Mobile साठी गुगल कंपनीने विकसित केलेली एक Operating System आहे. ही Operating System हि Linux Software व Open Source software वर आधारित आहेत. हिचा उपयोग Touch Screen Mobile उपकरणांमध्ये केला जातो. नोव्हेंबर 2007 साली याचे अनावरण झाले आणि पहिल्या Android डिव्हाईससह HTC Dream सप्टेंबर 2008 मध्ये लाॅन्च केले गेले. 

2) Google Chrome (गुगल क्रोम) :-

      Google Chrome (गुगल क्रोम) हे सन 2008 मध्ये रिलीज करण्यात आले. Google Chrome हा Google ने विकसित केलेला Cross Platform Web Browser आहे. Apple Web Kit आणि Mozilla Firefox च्या Software Component सह तयार केला आहे. त्यानंतर तो Linux, macOS, ioS आणि Android वर पोर्ट केला आहे. 

3) Gmail (जीमेल) :-

      सन 2004 मध्ये गुगलने स्वतःची Email सेवा लाॅन्च केली त्यास Gmail म्हणतात. Gmail चा लाॅन्ग फाॅर्म Google Mail आहे. Gmail चा data store करण्यासाठी गुगलने त्यामध्ये space उप्लब्ध करून दिली आहे. 

4) Google AdSense (गुगल ऍडसेन्स ) :-

      Google AdSense (गुगल ऍडसेन्स ) हा एक गुगलचा Advertising Platform आहे. हे Bloggers आणि Publishers ना पैसे कमावण्यासाठी मदत करते. हा एक पैसे कमावण्याचा योग्य व उत्तम मार्ग आहे. जे लोक योग्यप्रकारे Content लिहू शकतात ते Blogger, WordPress यांसारख्या साईटवर आपले लेख लिहून Publish करू शकतात आणि Google AdSense (गुगल ऍडसेन्स ) द्वारे जाहीराती दाखवून पैसे कमवू शकतात. 

5) Google Lens (गुगल लेन्स) :-

    Google Lens हे गूगल चे एक फीचर आहे, ज्याचा वापर करून आपण कोणत्याही फोटो मधील वस्तू, ठिकाण ओळखू शकतो. 

6) Google AdWord (गुगल ऍडवर्ड) :-

      Google AdWord (गुगल ऍडवर्ड) हा एक गुगलचा Advertising Platform आहे. हे Advertisers ना त्यांची जाहिरात प्रकाशित करण्यासाठी असते. याचा उपयोग करून Advertisers आपल्या Services बद्दल Advertising करू शकतात. Brief Advertising, Product Listings हे Videos बनवून ते प्रदर्शित करण्यासाठी बोली लावू शकतात. 

7) Youtube (युटयुब)  :-

    Youtube (युटयुब)हे एक गुगलचे Online Video Sharing Platform आहे. याद्वारे  Youtubers  हे वेगवेगळया प्रकारचे व्हिडीओज बनवून publish करतात. Travels, Funny, Health, Personal Blogs, Arts, Crafts, Educational, Technical यांसारखे व्हिडीओ बनवून ते Adsense आणि Sponsorship द्वारे पैसे कमावू शकतात. Youtube (युटयुब) हे फेब्रुवारी 2005 पासून विकसित व्हायला सुरूवात झाले आणि Google ने Youtube ला 2006 साली विकत घेतले. 

8) Google Docs (गुगल डाॅक्स)  :-

    Google Docs (गुगल डाॅक्स) हे इंटरनेटवर उप्लब्ध असलेले Web Based Application  आहे. याचा उपयोग वेगवेगळया प्रकारच्या Documents आणि Spreadsheets बनवण्यासाठी व Store करण्यासाठी केला जातो.

9) Google Alerts (गुगल अलर्ट)  :-

    Google Alerts (गुगल अलर्ट) हे Naga Kataru यांनी विकसित केले. Google Alerts (गुगल अलर्ट) हे गुगलची Notification and Detection सेवा आहे. जेव्हा एखादा युजर Google वर काही Search करत असेल तेव्हा Google Alert हे त्या search संबंधी जुळणारी माहिती ही Webpages, New papers, Blogs, Articles यांच्या स्वरूपात Email द्वारे पाठवते. 

10) Google Map (गुगल मॅप) :-

    Google Map (गुगल मॅप) हे Web Mapping Platform आणि Consumer Application सेवा आहे. जेव्हा युजर्सना एखाद्या ठिकाणाचे लोकेशन हवे असेल तर Google Map हे वापरकत्र्याला सोईस्कररित्या शोधून देते. ते आपणास रस्त्यावरील Real Time Traffic ची परिस्थिती दाखवते तसेच Street Maps, Aerial Photography, Satellite Images पुरविते.   

11) Google Photos (गुगल फोटोज)  :-

    Google Photos (गुगल फोटोज) हे गुगलचे Application आपणास Photo Sharing आणि Photo Storage हि सेवा पुरवते.

12) Google Images (गुगल इमेजेस):-

    Google Images (गुगल इमेजेस) हे गुगलच्या मालकीचे search Engine आहे.  जे वापरकत्र्यांना World Wide Web वर images शोधण्यासाठी मदत करते. जेव्हा वापरकर्ता त्याच्या आवडीच्या images शोधतो तेव्हा त्याच्या शोधाशी संबंधीत सर्व Thumbnails हे Google Images वापरकत्र्याला पुरविते. जेव्हा वापरकर्ता त्या image वर क्लिक करतो तेव्हा Main image ओपन होते आणि त्या संबंधीच्या Website वर क्लिक करून वापरकर्ता त्याला हवी ती image पाहू शकतो अथवा download करू शकतो.

13) Google Drive (गुगल ड्राईव्ह्)  :-

    Google Drive (गुगल ड्राईव्ह्) हे 24 एप्रिल 2012 रोजी लाॅन्च झाले. गुगलने विकसित केलेले हे File Storage आणि Synchronization service आहे.  जे वापरकत्र्यांना Google cloud म्हणजेच गुगलच्या मेन सव्र्हरवर Files Store करण्यास अनुमती देते.

 13) Google News (गुगल न्युज)  :-

    Google News (गुगल न्युज) हे गुगलने विकसित केलेली हे News Aggregator Service आहे. ती हजारो लेखांच्या व मासिकांच्या लिंकस वापरकत्र्यांना पुरविते. 

14) Google Keybord (गुगल किबोर्ड)  :-

    Google Keybord (गुगल किबोर्ड) हे गुगलने विकसित केलेले हे Virtual Keyboard Application आहे. याला Gboard असेही म्हणतात. हे Android आणि iOS device यामध्ये वापरले जाते. 

15) Blogger Application (ब्लाॅगर एप्लिकेशन ) :-

    Blogger Application (ब्लाॅगर एप्लिकेशन) ही गुगलची American Online Management System आहे. यामध्ये Blogspot.com सबडोमेन आहे. यामध्ये Online Content Management केले जाते. यावर प्रत्येक Blogger हा आपले Blogs आणि content पोस्ट करू शकतो आणि ऍडवर्डटाईजमधून पैसे कमावू शकतो. 

16) Google Translate (गुगल ट्रान्सलेट) :-

    Google Translate (गुगल ट्रान्सलेट) ही गुगलने विकसित केलेली Multilingual neural Machine Translation Service आहे. हे Text, Documents आणि Website चे एका भाषेतून वापरकर्त्यांना हव्या असणा-या दुस-या भाषेत रूपांतर करते. 

17) Google Duo (गुगल डयुओ) :-

    Google Duo (गुगल डयुओ) ही गुगलने विकसित केलेले Chat Mobile App आहे. जे Android आणि iOS सिस्टीमवर उप्लब्ध आहे. आता Web Browser द्वारे Desktop आणि Laptop वर सुद्धा उप्लब्ध आहे. 

      वरीलप्रमाणे गुगलने वापरकर्त्यांसाठी अनेक Services व Products उप्लब्ध केले आहेत. त्यामध्ये Google Chrome Cast (गुगल क्रोम कास्ट),  Google Books(गुगल बुक्स), Google Analytics (गुगल अॅनॅलॅटिक्स), Google Calendar (गुगल कॅलेंडर), Google Assistant (गुगल असिस्टंट), Google Earth(गुगल अर्थ),  Google Wifi (गुगल वाय फाय),  Google My Business (गुगल माय बिझनेस), Google Input Tools (गुगल इनपुट टुल्स), Google Plus (गुगल प्लस), इ.

      वरील लेख आपणास कसा वाटला हे कमेंट करून सांगणे.

Read More
  • Share This:  

मराठी भाषा गौरव दिन - Marathi Bhasha Din

 March 13, 2022     article     No comments   

Marathi Rajbhasha din
Marathi Rajbhasha din shubhechha

 मराठी भाषा दिन निबंध


महाराष्ट्रात मराठीची उपेक्षा होत आहे का? कारणे, जबाबदारी आणि उपाय

         आपली मातृभाषा "मराठी"आहे. ती आपल्यासाठी अतिवंदनीय आणि प्राणप्रिय आहे. मराठी भाषा ही समुद्रासारखी विशाल आहे. वेलांटी, उकारांचा साज, काना मात्रांची सुवर्ण वस्त्रे आणि अनुस्वार, विसर्गांचे सोनेरी मुकूट परिधान करून मराठी भाषा ही प्रत्येक मराठी माणसाच्या मुखावर आणि मनावर अधिराज्य करत आहे. अमृताहूनी गोड असलेली मराठी भाषा ही महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीचा अभिमान आहे. मराठी भाषेचे माधूर्य हे इत्तर भाषांपेक्षा अधिक आहे. मराठी भाषेची निर्मिती ही संस्कृतपासून आलेल्या प्राकृत व अपभ्रंश या भाषांपासून झाली आहे. ती अतिशय प्राचीन असून संत ज्ञानेशरांपासून ते कविवर्य कुसुमाग्रंजांपर्यंत अनेक साहित्यीकांनी मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी प्रयत्न केला आहे.

         मराठीचे वर्णन करताना संत ज्ञानेश्वर म्हणतात की,

माझ्या मराठीची बोलू कौतुके।

परी अमृतातेही पैजा जिंके।

ऐसी अक्षरे रसिके।मेळवीन।।

         अर्थात, माझ्या मराठीचा बोल मला कौतुकाचा वाटतो. अमृताशी जरी पैज लावली तरी माझ्या मराठीची अक्षरे ती पैज जिंकतील.

         तर कवी सुरेश भट यांनी नी मराठी असण्याचा अभिमान व्यक्त करताना आपल्या कवितेत खुप सुंदर शब्दांचा उपयोग केला आहे. ते लिहितात

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी।

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी।

धर्म, पंथ जात एक जाणतो मराठी।

एवढया जगात माय मानतो मराठी।।

         अशी ही आपली मराठी भाषा म्हणजे विविध साहित्यांमध्ये वेगवेगळया शब्दांनी सजलेली आहे. ती घाटी, नागपूरी, कोल्हापूरी, सोलापूरी, पुणेरी अशा विविध प्रांतात विविध स्वरूपात मराठी भाषिकांच्या मुखात उच्चारण्यासाठी सज्ज असते.

महाराष्ट्रात मराठीची उपेक्षा होण्याची कारण 

         आज महाराष्ट्रातच मराठी भाषेची उपेक्षा होत आहे कारण मराठी भाषेची अवस्था ही ‘‘माय मरो आणि मावशी उरो अशी झाली आहे. इंग्रज लोक भारतात आले आणि जाताना इंग्रजी भाषेचे पिल्लू भारतात सोडून गेले. त्यामुळेच काही अंशी आपल्या महाराष्ट्रातही इंग्रजी भाषेचा अंमल राहीला. परिवर्तनाचा नियम हा प्रकृतीप्रमाणे भाषेलाही लागू पडतो.

         हल्ली मराठी भाषेच्या पेहरावाला जागोजागी इत्तर भाषांची ठिगळे लावली जातात. मराठी भाषा बोलताना त्यात हिंदी, उर्दु आणि इंग्रजी शब्दांचा उपयोग जास्त झालेला दिसतो. बोलताना सर्व भाषांची भेळमिसळ आज महाराष्ट्रात पहायला मिळते. मराठी भाषा बोलताना हिंदी व इंग्रजी शब्दांचा वापर इतका केला जातो आहे की, मराठी भाषेचे मुळ स्वरूप पालटले आहे.

         मराठीत असलेले वाक्यप्रचार, म्हणी, ओव्या, उखाणे, मंगळागौरी जागरणाची गीते, भारूडे, गोंधळात गाण्यात येणारी गीतेही लोप पावत चालली आहेत. सध्या लग्न झाल्यानंतर गोंधळ घालण्याऐवजी केक कापला जातो आणि इंग्रजी गाण्यांवर दारू पिऊन नाच आणि धिंगाना करण्यात येतो. याला कुठेना कुठे तर मराठी माणूसच जबाबदार आहे.

         जागतिकीकरणामुळे महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील प्रत्येक तरूण हा इंग्रजी भाषेच्या अंमलाखाली आहे. तरूणांना लवकरात लवकर नोकरी मिळविण्यासाठी तसेच नोकरी धंदयाच्या दृष्टीने इंग्रजी भाषा आता जवळची वाटू लागली आहे. इंग्रजी भाषा सर्वज्ञात आणि ज्ञानभाषा असल्यामुळे तिला शैक्षणिकदृष्टया अभ्यासक्र्मांत अग्रस्थान प्राप्त झाले आहे व मराठी भाषा ही अभ्यासक्रमांतून मागे पडत आहे.

         सध्या उच्च कुटुंबांमध्ये मराठीत बोलणे म्हणजे अप्रतिष्ठीचे लक्षण मानले जाते. तसेच महाराष्ट्रातील मोठमोठया संस्थांमध्ये मुलाखतीदरम्यान इंग्रजी भाषेचा वापर केला जातो. जर आपण महाराष्ट्रात संस्था स्थापन केली आहे आणि मराठी भाषा जाणतो तर मग इंग्रजीत मुलाखत घेणे योग्य आहे का? जर व्यावसायीक संस्थांचा व्यवहार हा महाराष्ट्रातील स्थानिक लोकांशी , शेतक-यांशी  होणार असेल तर इंग्रजीचा अट्टहास का करण्यात येतो? या मुद्दयांवरही विचार करणे गरजेचे आहे. क्वचित प्रसंगी इंग्रजी व इत्तर वेळी मराठी भाषा वापरली जावी अशी सक्ती महाराष्ट्रातील विविध संस्थांमध्ये का केली जात नाही?

         तसेच महाराष्ट्रातील बरेच पालक हे आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घालण्याचा अट्टाहास का करतात? यामध्ये मराठी शाळांचे खच्चीकरण होते व इंग्रजी शाळांना प्रोत्साहन दिले जाते. यामुळे मराठी शाळा हया बंद पडायच्या मार्गावर आहेत. परप्रांतीय लोक नोकरी धंदयाच्या निमित्ताने महाराष्ट्रात येतात व इथे येवून महाराष्ट्रातील लोकांना हिंदी भाषा बोलण्यास प्रवृत्त करत आहेत. खरे तर त्यांनी महाराष्ट्रात राहून मराठी भाषा शिकणे आवष्यक आहे. 

जबाबदारी आणि उपाय

         मराठी भाषा टिकविण्यासाठी व वाढविण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने प्रयत्न करणे आवश्यक आहे व प्रत्येकाची जबाबदारी आहे. प्रथमतः मराठी माणसाने आपण मराठी असण्याचा अभिमान बाळगावा व मराठी भाषेकडे सन्मानाने पहावे. स्वतःची मातृभाषा बोलताना कोणासही कमीपणा वाटायला नको. मराठी भाषेचा दैनंदिन जीवनात वापर वाढवावा. आपल्या महाराष्ट्रातील संत व महात्म्यांनी लिहिलेल्या साहित्याचे वाचन करणे आवश्यक आहे.

         घरामध्येही लहान मुलांवर संस्कार म्हणून त्यांच्याकडून मनाचे श्लोक , देवांची स्तोत्रे पाठ करून घ्यावीत. मराठीमधून लोककथा, महापुरूषांच्या चरित्रकथा सांगाव्यात. भगवद्गीता, रामायणासारखे ग्रंथ त्यांच्यापुढे मोठयाने वाचावेत जेणेकरून लहान मुलांना मराठी व संस्कृत भाषेचे ज्ञान होईल कारण आजकाल मुल जन्मले की, तिस-याच वर्षी त्याला इंग्रजी अंगणवाडीत नेवून बसवण्यात येते. मग मुल तरी कसे मराठी लिहायला, वाचायला शिकेल? तसेच सर्वच तांत्रिक अभ्यासक्र्मांमध्ये एकतरी मराठी विषय शिकविण्यात यावा.

         राज्यात ग्रंथालयांची व वाचनालयांची स्थिती खराब आहे. ग्रंथालयात व वाचनालयात स्पर्धा परिक्षा देणारे विद्यार्थी सोडले तर बाकी सर्वजणांनी पाठ फिरवली आहे. शासनाने खेडयापाडयातही ग्रंथालयांची व वाचनालयांची संख्या वाढविण्याकडे भर दिला पाहिजे. मराठी पुस्तके व ग्रंथ आपल्या महाराष्ट्राची संपत्ती आहे तिचा -हास होता कामा नये. मराठी भाषेला वाचविण्यासाठी मराठी साहित्याचे वाचन करणे आवश्यक आहे.

         मराठी शाळा, महाविद्यालयात जो शिक्षणाचा दर्जा खालावत आहे सरकारने त्याकडेही लक्ष दिले पाहिजे. ज्याप्रमाणे इंग्रजी शाळांमध्ये मुलांसाठी सर्व सुखसोयी उप्लब्ध आहेत त्याप्रमाणे मराठी शाळांमध्येही व्हायला हव्यात. परदेशात नोकरी मिळविण्यासाठी किंवा विदेशी कंपन्यांबरोबर संवाद साधण्यासाठी इंग्रजी शिकण्यास काहीही हरकत नाही पण आपल्या मराठी भाषेचा मान कमी होता कामा नये. मराठी भाषेची जी सद्यस्थिती आहे त्याकडे सर्व समाजाने सकारात्मतेने बघण्याची आवश्यकता आहे.

         मराठी भाषा नुसती वाचता बोलता येवून उपयोग नाही तर मराठी भाषा ही शास्त्रशुद्ध पद्धतीने व्याकरणासह षिकता यायला हवी. आज विदेषी लोक महाराष्ट्रात येवून मराठी भाषा शिकुन घेत आहेत. तर आज आपण मराठीचा प्रचार करण्यास का कमी पडत आहोत? या प्रश्नावरही विचार होणे गरजेचे आहे.

         शासन मराठी भाषा संवर्धनासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, मराठी भाषेच्या संवर्धनाची जबाबदारी ही समाजाची व महाराष्ट्रातील प्रत्येक नागरीकाची आहे. मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करून मराठीला जागतीक दर्जा प्राप्त करून देणे ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य आहे. मराठी भाषेचा झेंडा अटकेपार नेवून महाराष्ट्राला एका उच्च स्तरावर जागा मिळवून द्यावी. हीच विनंती. म्हणूनच म्हणते मी

 

किती वर्णावी माझ्या मराठीची महती

वाजु दे डंका तिचा सा-या जगती

 

धन्यवाद

जय हिंद, जय महाराष्ट्र

सौ. अनुष्का हणमसागर 


Marathi Bhasha Din Nibandh, marathi bhasha din shubhechha, Marathi Bhasha din message, Marathi Rajbhasha Din Nibandh, Marathi Rajbhasha Din Bhashan


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

   

Read More
  • Share This:  
Older Posts Home

Popular Posts

  • FARMER POEM एका शेतकऱ्याचे मनोगत
  • Sad love quote / विरह
  • BEST BLOGGING NICHE 2021
  • # मधुमिता - एक भयकथा - अंतिम भाग# - horror stories in marathi
ANU SWAPN BLOG

Translate

Categories

  • article
  • International women's day 2021
  • Love Quotes in Marathi
  • poem
  • Quote
  • Tech & Educational

Blog Archive

  • May 2022 (1)
  • March 2022 (1)
  • April 2021 (1)
  • March 2021 (3)
  • February 2021 (1)
  • November 2020 (1)
  • September 2020 (5)
  • August 2020 (5)
  • July 2020 (5)
  • June 2020 (2)
  • May 2020 (8)
  • April 2020 (3)

Anu Swapn blog

This blog is created for only entertainment and knowledge purpose.
Disclaimer | Contact us | Privacy Policy | Terms of us

Copyright © ANU SWAPN BLOG | Powered by Blogger