"कोरोना" महामारी आली दाराशी ....
लॉकडाऊन झाले शहर - खेडयांपाशी....
उपासमार चालू झाली स्थलांतर करणाऱ्यांची ....
जगण्यासाठी धडपड चालली सगळ्यांची ....
सर्वजण घरात झाले बंदी....
पण रस्त्यांवर काहीजण फिरतात स्वछंदी....
वाटतं त्यांना काही नाही होत आपल्याला....
पण कोरोना आहे जीवावर टपलेला....
आता ऑफिसेस, बीजनेसेस आहेत काही दिवसांसाठी बंद....
वर्क फ्रॉम होम करून, जोपासुया छंद....
पोलीस, डॉक्टर, सायंटिस्ट करतात देशसेवेचे कार्य....
देशहितासाठी करूया आपणही त्यांना सहकार्य....
सोडूनि आपले वैयक्तिक स्वार्थ...
यातुनच शिकूया आणि शोधूया जगण्याचा अर्थ ....
इतकंच लक्षात ठेवा आपल्याला जगायचंय....
प्रयत्नांची पराकाष्ठा करून कोरोनाला हरवायचंय....
भारताची एकात्मतेची ताकद सर्वांना दाखवायची आहे....
आणि आपल्या भारतभूमीला परत "महाभारत" बनवायचाय...
लेखिका - सौ. अनुष्का हणमसागर
© Anu Swapn Blog 2020-2021
लेखिका - सौ. अनुष्का हणमसागर
© Anu Swapn Blog 2020-2021

छान आहे. 👍👍👍👍
ReplyDeleteThanks... follow pan kara
DeleteUinity is most important. Mast madam
ReplyDeleteThanks
DeleteEkdam bhariii...sister...❤
ReplyDeleteThanks... follow
Delete