सायकलचा इतिहास
सायकलीबद्दलची माहिती
३ जुन हा दिवस जागतिक सायकल दिन म्हणून साजरा केला जातो. आजच्या लेखात आपण सायकल चा इतिहास पाहणार आहोत. सायकल हे एक असं वाहन आहे कि तिला इंधनाची गरज नाही. सध्याच्या काळात सायकलिंग एक व्यायाम प्रकार म्हणून जास्त वापरला जातो. आधुनिक जीवनशैलीमध्ये सायकल हि आरोग्यदायिनी आहे. सायकल चालवल्याने प्रदूषणही कमी होते. त्यामुळे सायकल हि पर्यावरण आणि आरोग्य दोन्ही गोष्टींना स्वच्छ आणि समृद्ध ठेवण्यास मदत करते. सायकल हे एक असे साधन आहे कि ते लहानग्यांपासून ते म्हाताऱ्या लोकांपर्यंत सर्वजण वापरू शकतात. आज डॉक्टरही आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी सायकल चालवण्याचा सल्ला देतात. पण सायकल चा शोध कसा लागला हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच असते. तर मग जाणून घेऊयात सायकलीचा इतिहास....
सायकलीचा इतिहास
असे मानले जाते कि सायकलीचा शोध १८ व्या शतकात लागला. सण १८१७ मध्ये जर्मनीच्या बैरन फॉन ड्रेवीस यांना सायकलीच्या डिझाईनची कल्पना सुचली व त्यांनी लाकडाची सायकल तयार केली. त्या सायकलीला ''ड्रेसियन'' असेही म्हंटले जायचे. या सायकलीचा वेग हा १५ किलोमीटर प्रतितास असा होता. सण १८३० ते १८४२ या सायकलीचा उपयोग थोड्याफार प्रमाणात केला गेला.
परंतु १८३९ साली या सायकलीला पूर्णत्व हे स्कॉटलँडचे किर्कपेट्रिक मैकमिलन यांनी दिले. त्यांनी पायाने ढकलाव्या लागणाऱ्या सायकलला पँडल लावायचे काम केले आणि हि सायकल लोकांना चालवायला सोयीस्कर झाली.
परत सायकल मध्ये कालपरत्वे बदल होतच गेले. १९२० साली लहान मुलांना चालवता येईल अशी सायकल तयार झाली. पहिली सायकलची रेस हि दस्तावेजानुसार ३१ मे, १८६८ रोजी १२०० मीटरची शर्यत होती. हि शर्यत पॅरिसमधील सेंट क्लाउड पार्क येथे भरविण्यात आली. तसेच अमेरिकेतील सेंट लुई सायकलिंग क्लब हा सर्वात जुना सायकलिंग क्लब आहे. भारतामध्ये पंजाब, हरियाणा हि राज्ये सायकल उत्पादनात पुढे आहेत.
सायकल चालविण्याचे फायदे
- नियमित सायकल चालवल्यामुळे हृदयरोगाचा धोका हा ५० टक्क्यांपेक्षा कमी होतो. सायकलिंग केल्याने रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत होते.
- नियमित सायकल चालवल्याने स्नायूंना मजबुती येते. तसेच लठ्ठपणा कमी होतो.
- ज्या लोकांना झोपेचा प्रॉब्लेम आहे अशा लोकांनी रोज सायकल चालवायला हवी. शरीरातील निद्रानाशासंबधी वाढलेली कार्डिसोल हार्मोन्सची मात्रा सायकलिंग केल्यामुळे कमी होते.
- ३० मिनिटे सायकलिंग केल्यास कॅन्सर संबंधित सर्व आजारांचे प्रमाण घटते
वरील माहिती आवडल्यास नक्कीच शेअर करा.. कंमेंट करा... लायक करा... धन्यवाद
फोटो सौजन्य : गुगल क्रोम
© AnuSwapn Blog 2020-2021


0 Comments:
Post a Comment