
।। माझा महाराष्ट्र ।।
संतांच्या अभंग वाणीचा झरा अंगावर
घेऊनि हृदयाची तृष्णा शमविणारा
असा माझा "अमृतमय महाराष्ट्र"
सह्याद्रीच्या कुशीत गडकिल्ल्यांच्या,लेण्यांच्या
कातळ माणिकमाळा घालुनी नेत्रांचे पल्लव सुखविणारा
असा माझा "सुंदर महाराष्ट्र"
छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पताका रोवली
तिथे अभिमानाचा भगवा झेंडा फडकावणारा
असा माझा "गर्जा महाराष्ट्र"
स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची पर्वा न करता
आपल्या मावळ्यांनी दिलेल्या बलिदानाचा गौरव करणारा
असा माझा "कणखर महाराष्ट्र"
बळीराजाच्या घामाच्या थेंबातुन धान्य पिकवूनि
सर्व जनतेच्या पोटाची खळगी भरणारा
असा माझा "कष्टकरी महाराष्ट्र"
सर्व धर्म समभाव असणारा
मराठी भाषेचा साज मिरवणारा
असा माझा "एकात्मक महाराष्ट्र"
निरक्षर अंधारातून प्रकाशाकडे नेताना
न अडकळता ज्ञानाची ज्योती सदैव तेवत ठेवणारा
असा माझा "साक्षर महाराष्ट्र"
- सौ. अनुष्का हणमसागर
Sunder
ReplyDeleteThanks
DeleteMast...❤
ReplyDeleteMast
ReplyDelete