ANU SWAPN BLOG
  • Home
  • Home
  • Articles
  • Poems
  • Image Quotes
  • Tech and Educational
  • About Us

# शब्दांविना कळले सारे #

 May 16, 2020     article     3 comments   



शब्दांविना कळले सारे 



कल्पना हि एक सुंदर आणि सालस मुलगी. एका मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या हुद्द्यावर काम करणारी एक कॉर्पोरेट स्त्री. मीटिंग जरा जास्त वेळ चालल्यामुळे घरी जायला खूपच उशीर झाला होता. घरी आल्यानंतर सासूबाईंनी तोंड सोडले, "आम्हीही नोकरीला होतो म्हंटल, आम्हालाही काम असायची, पण आम्हाला इतका वेळ कधीच नाही व्हायचा...." आणि आजची पिढी बघा ऑफिसच्या नावाखाली नुसतं शॉपिंग करत बसायचं आणि काय... त्यांचे तोंड चालूच होते... सासूने साध ऑफिस मध्ये काही खाल्लस कि नाही, असे सुद्धा नाही विचारले, आणि गेल्या निघून शेजारी मैत्रिणींबरोबर गप्पा करायला... डोकं दुखत असल्याने कल्पना स्वतःच गेली चहा करायला.... बाहेर पाऊस पडत होता... चहा घेत बसली गॅलरीमध्ये.... तिला असे प्रश्न येऊ लागले कि आपण इतके शिकलो ते हे सर्व ऐकून घ्यायला??  ह्यांना काय माहित कि शिक्षण घेताना मला कोणकोणत्या गोष्टींना तोंड द्यावे लागले आहे?? मी आणि माझ्या आईने ह्यासाठी काय काय सहन केले आहे???  पावसाकडे पाहून तिला जुन्या दिवसांची आठवण झाली...

कल्पनाचे माहेर म्हणजे अगदी मागासलेले गाव... वडिलांची दोन तीन एकर शेती होती... पण वडील मात्र दारूच्या व्यसनात बुडालेला... शेती असून सुद्धा दुष्काळ पाचवीलाच पुजलेला असल्याने ती तशीच पडीक पडलेली होती... आई चार पाच घरची धुनी भांडी करायची व पोटाची खळगी भरायची.... बाप मात्र काही असेल नसेल ते जाऊन विकायचा घरातलं....  पण कल्पनाच्या आईची एक इच्छा होती कि मुलीने शिकावं आणि आपलं नाव मोठं करावं.... पण बाप मात्र अगदी शिक्षणाच्या विरुद्ध त्याच्या डोक्यात एकच चाललेलं असायचं कि, कल्पना वयात आली कि लगेच तीच लग्न करावं... कल्पनालाहि खूप शिकायचं होत पण बाप मात्र शिकुन देत नव्हता.... एके दिवशी कल्पनाने  आपल्या आईला सांगितलं कि आई मला शिकायचं आहे... तसा आईला खूप आनंद झाला.. तिनं लागलीच नवऱ्यापासून लपवलेल्या पैशातून तिला वही, पेन, पाठी, पेन्सिल, पुस्तकं  आणून दिले  आणि शाळेत जाऊन तीच नाव देखील घातलं.... पण बापाला कळल्यावर बापानं दोघींना खूप मारले....  एक दिवस कल्पनाच्या आईने आपली खंत ती ज्या शाळेच्या बाईंकडे धून भांडी करायला जायची त्यांना बोलून दाखवली... त्यांनी एक आयडिया सांगितली कि कल्पनाला रोज दोन तास त्यांचा घरी घेऊन यायचे.. त्या रोज तिला फुकटात शिकवणी देऊ लागल्या.... बाईंनी परस्पर शाळेत कल्पनाचे नावही घातले... त्यात त्यांना असं कळालं कि कल्पना खूपच बुद्धिमान आहे... आणि हिला खूप शिकवायला हवं... तसहि बाईंना मुलबाळ नव्हतं त्यामुळे त्यांनी तिचा पुढच्या शिक्षणाचा खर्च करायचं ठरवले आणि तिच्या आईलाही सांगितलं व कल्पनाच्या वडिलांना ह्यातील काही कळणार नाही असे वचन दिल... असंच दिवस जात होते.... आता कल्पनाला NTSE च्या परीक्षेला बसवायचे असे बाईंनी ठरविले ... परीक्षेला जाताना बापाला कल्पनाची आजोळची आज्जी आजारी आहे असे सांगून त्या मायलेकी बाहेर पडल्या... कल्पनाने परीक्षा दिली आणि ती परीक्षेत चमकली.... पेपरमध्ये फोटो आला.... घरी मान्यवर लोक आले तिचे कौतुक करायला... बापालाही आधी राग आला होता पण मुलीची प्रगती आणि गावातला आपला मान वाढल्याचं बघून त्यानेही पुढे तिच्या शिक्षणाला विरोध नाही केला.... दहावी, बारावीत पण तिने खूप चांगले मार्क्स मिळवले....  बापानेही पुढे तिला शिकवायचं ठरविले व इंजिनीरिंगला घातले.... त्यातही तिनं गोल्ड मेडल मिळवले...

आता मुलगी लग्नाची झाली आणि कल्पनाच्या वधुपरीक्षा चालू झाल्या.... पुढे बाईंच्याच नात्यातले एक स्थळ आले.... मुलाची आई हि महानगरपालिकेत नोकरीला होती, आणि आता रिटायर्ड होती.... त्यांच्या मुलाचे नाव सौरभ, एकुलता एक मुलगा ... तोही मुंबईत चांगल्या हुद्द्यावर नोकरीला होता... गावाकडे त्यांची दहा एकर शेती होती.. त्यामुळे त्यांच्या स्थळामध्ये नाही म्हणण्यासारखे काही नव्हते.... कल्पनाच्या आईने लग्नासाठी एक अट घातली कि कल्पना नोकरी करणार म्हणून... त्यांनीही ती अट मान्य केली... लग्न झाले. कल्पना हि आता मुंबईत रुळली... नंतर तिने ठरवले कि आता आपण नोकरी करायची... तिनं मनातलं सौरभला सांगितलं तोही तयार झाला.... तिनं तिच्या सासूबाईंना ह्याबद्दल सांगितलं आणि आता त्या नोकरीसाठी टाळाटाळ करू लागल्या.... मात्र सौरभच्या हट्टासमोर त्याच्या आईला काही नाही बोलता आले.... कल्पनाच्या मुलाखतीचा दिवस उजाडला एका मोठ्या कंपनीमध्ये चांगल्या हुद्द्यावर ती जॉईन झाली..... तशी घरात धून भांडी करायला बाई होती.... पण घरातला स्वयंपाक हा घरातल्या सुनेनेच करावा हा सासूबाईंचा शिरस्ता होता आणि कल्पनाही तो मान्य होता.... घरातलं नाश्ता, स्वयंपाक करून कल्पना जॉबला जायची... पण कल्पनाच्या सासूला कल्पनाच्या नोकरी लागण्याच्या आधी जसे  सर्व हातात मिळत होते ते आता मिळायचे बंद झाले, त्यामुळे इतर गोष्टींना त्यांना वेळ देता येईना आणि रोज कुरकुर चालू झाली.... रोजची भांडण घरात कारण नसताना चालू झाली.... पण कल्पना अगदी समंजसअसल्याने ती सहसा नवऱ्याला ह्यातले काहीच सांगत नसे .....

सौरभला तिने आधीच फोन करून सांगितले होते कि आज यायला उशीर होईल, पण त्या दोघींचे भांडण चालू असताना सौरभ बाहेर होता आणि नेहमीप्रमाणे ह्यातले त्याला काही माहित नव्हते.... तो जेव्हा घरी आला, तेव्हा कल्पना बाल्कनीमध्ये बसली होती चहा घेत.... तिच्यापाशी गेल्यानंतर तिच्या डोळ्यातून ओघळणाऱ्या आसवांनी त्याला सगळे उमगले... त्याला पण आज का कोण जाणे, तिने न सांगताच हि गोष्ट जाणवली कि आज काहीतरी बिनसलंय ....  त्यालाही आठवले कि, आईला कामावरून यायला थोडा उशीर झाला कि, बाबा आईला घरकामात मदत करायचे... ते करायचे तर मी का नाही करू शकत??.... त्याला समजले कि कल्पना आज खूपच दमली आहे.... त्याने लगेच किचनचा ताबा घेतला आणि स्वयंपाक चालू केला...  कारण पूर्वी आई नोकरीला असल्याने तो बऱ्यापैकी स्वयंपाक शिकलेला होता.... त्याने कणिक मळली, चपात्या केल्या, भाजी, कोशिंबीर केली.... आणि भाताचा कुकर लावला..... कुकरच्या शिटीने कल्पना आठवणीतून भानावर आली... आणि लगेच किचनमधे पळाली....  बघते तो काय नवऱ्याने सर्व स्वयंपाक तयार केला होता....  आणि कल्पनाला कळले कि, कोणीही आपल्याला विचारले नाही तरी आपल्यावर प्रेम करणारा आपला सखासोबती इथं आहे... इकडे आईलाही कळलं नाही कि, आपल्या मुलाने स्वयंपाक केला आहे कारण ती बाहेर गेली होती मैत्रिणीबरोबर गप्पा मारायला... आणि कल्पनालाही त्या दिवसाचा सर्व क्षीण घालवायला मदत झाली... तिने हलकेच ओझरत्या नजरेनं नवऱ्याकडे पहिले आणि आपले प्रेम व्यक्त केलं.... त्यावेळी तिच्या ओठांवर एकच गाणे आले  कि, शब्दांविना कळल्या साऱ्या , माझ्या मनीच्या भावना ...   

मित्र मैत्रिणींनो आपल्याही आजूबाजूला अशा गोष्टी थोड्याफार प्रमाणात घडत असतील ना?????  कंमेंट करून कळवा.. मी लेख पहिल्यांदाच लिहिला आहे... काही चूक असली तर समजून घ्या...

(टीप :- हा लेख पूर्णतः काल्पनिक असून, ह्यामधील कुठल्याही पात्राशी कुणाचाही संबंध नाही. तसे असल्यास तो केवळ योगायोग समजावा. तसेच ह्यातील ओळी जशाच्या तशा कोणी त्यांच्या लेखात कॉपी पेस्ट केल्यास कॉपीराईट होऊ शकते. धन्यवाद!!!)


                                                                                                             लेखिका  -  सौ. अनुष्का हणमसागर
                                                                                                          © Anu Swapn Blog 2020-2021



                        
  • Share This:  
Email ThisBlogThis!Share to XShare to Facebook
Newer Post Older Post Home

3 comments:

  1. MayuriMay 16, 2020 at 11:10 PM

    Mast👌👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. ANU SWAPN BLOGMay 16, 2020 at 11:35 PM

      Thanks

      Delete
      Replies
        Reply
    2. Reply
  2. UnknownJune 9, 2020 at 2:01 PM

    Khoopach chan 👌

    ReplyDelete
    Replies
      Reply
Add comment
Load more...

Popular Posts

  • FARMER POEM एका शेतकऱ्याचे मनोगत
  • Sad love quote / विरह
  • BEST BLOGGING NICHE 2021
  • # मधुमिता - एक भयकथा - अंतिम भाग# - horror stories in marathi
ANU SWAPN BLOG

Translate

Categories

  • article
  • International women's day 2021
  • Love Quotes in Marathi
  • poem
  • Quote
  • Tech & Educational

Blog Archive

  • May 2022 (1)
  • March 2022 (1)
  • April 2021 (1)
  • March 2021 (3)
  • February 2021 (1)
  • November 2020 (1)
  • September 2020 (5)
  • August 2020 (5)
  • July 2020 (5)
  • June 2020 (2)
  • May 2020 (8)
  • April 2020 (3)

Anu Swapn blog

This blog is created for only entertainment and knowledge purpose.
Disclaimer | Contact us | Privacy Policy | Terms of us

Copyright © ANU SWAPN BLOG | Powered by Blogger