
शिक्षक दिन - Teachers Day, Teachers Day Quote, Teachers Day Poem, Teachers Day Speech
दरवर्षी ५ सप्टेंबर या दिवशी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने भारतामध्ये शिक्षक दिन साजरा केला जातो... डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे दिल्ली विद्यापीठाचे कुलपती होते... त्यांनी मे १९६२, ला राष्ट्रपतीपदाची सूत्रे आपल्या हाती घेतली.... त्यांच्या अंगी असलेल्या शिक्षकी गुणांमुळे त्यांनी भारताची धुरा योग्यरितीने सांभाळली... ते एक आदर्श शिक्षक होते....ह्या दिवशी शिक्षकांच्या प्रति विध्यार्थ्यांच्या मनात असलेला सन्मान व्यक्त केला जातो... या दिवशी अनेक शाळांमध्ये शिक्षकांबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात... आदर्श शिक्षकांना "आदर्श शिक्षक पुरस्कार" देऊन गौरविले जाते....
गुरु म्हणजे काय???
“गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरः
गुरुः साक्षात्परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः”
गुरु म्हणजे एक ऊर्जा जी सतत आपल्या विध्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यात पुढे जाण्यासाठी बळ देत असते... गुरु म्हणजे एक असे शिल्पकार आहेत कि जे कठीणातल्या कठीण कातळाला आकार देऊन उज्वल भविष्य घडविण्यास हातभार लावतात.... जसा एखादा कलाकार दगडापासून सुंदर मूर्ती घडविण्यासाठी झटत असतो त्याप्रमाणे गुरुही आपले विध्यार्थी भावी आयुष्यात यशस्वी व्हावेत यासाठी सदैव झटत असतात.... ते शिष्यांना शिक्षणाचे धडे देऊन एक उत्तम नागरिक बनविण्याचा प्रयत्न करतात.... विद्यार्थी चुकले कि त्यांना समजावून योग्य दिशा दाखवण्याचे सामर्थ्य हे गुरुंच्याच अंगी असते.... जशी आई आपल्या मुलांना काय योग्य किंवा काय अयोग्य आहे हे शिकवत असते तसे गुरुही आपल्या शिष्यांना एखाद्या वस्तू, व्यक्ती, स्थळ आणि वेळ यामधील योग्यतेची आणि अयोग्यतेची जाणीव करून देतात म्हणून अध्यात्मिक भाषेत त्यांना "गुरुमाय" म्हणतात.... गुरु म्हणजे एक सुलभ मार्ग दाखवणारे मार्गदर्शक आहेत कि ज्यांमुळे विद्यार्थ्यांच्या बिकट वाटेवर आलेल्या काट्यांची सुद्धा फुले होतात.... गुरु म्हणजे सूर्याप्रमाणे प्रकाशमय असतात त्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघालेले विध्यार्थी हे आयुष्यात डॉक्टर्स, इंजिनीअर्स, सायंटिस्ट, पोलीस, सैनिक आणि सर्वात महत्वाचे म्हणजे उत्तम नागरिक बनतात... गुरु हे परिसाप्रमाणे निर्मळ आहेत. त्यांच्या शाबासकीची थाप ज्या शिष्याच्या पाठीवरती पडते त्या शिष्याच्या आयष्याचे सोने झाल्याशिवाय राहत नाही....
गुरू (शिक्षक कविता)
0 Comments:
Post a Comment