
सोबती
नदीच्या किनारी तुझी
वाट पाहत थांबायचंय....
भावनांची होडी होऊन
तुझ्या किनारी डुंबायचंय....
प्रेमाची आस होऊन
तुझ्या गाली खुलायचंय....
स्वप्नांचे पंख होऊन
तुझ्या आकाशी उडायचंय....
संगीतातले सूर होऊन
तुझे गीत बनायचंय....
अश्रुंचे पाणी होऊन
तुझ्या गाली ओघळायचंय....
उनाड पाऊस होऊन
तुझ्या प्रेमात कोसळायचंय....
मनाच्या किनाऱ्यावर तुझ्या
मला माझे गाव वसवायचंय....
तुझ्या यशाच्या पंखांना
मला बळ द्यायचंय....
जीवनाच्या वाटेवरती मला
तुझे सुख दुःख वाटून घ्यायचंय....
आयुष्यातील तुझ्या प्रत्येक क्षणात
मला तुझा सोबती व्हायचंय....
मला तुझा सोबती व्हायचंय....
कवियत्री - सौ. अनुष्का हणमसागर
© Anu Swapn Blog
छान
ReplyDeleteThanks
DeleteMast..👌🏽
ReplyDelete👫
ReplyDeleteमस्त
ReplyDelete