रत्नमाला हि एक खेडवळ मुलगी.... उंच, धिप्पाड, तेल लावून केसाची वेणी घातलेली असायची.... तिचा बाप एक पैलवान होता... ती हि खेळात अत्यंत हुशार होती.... ती शाळेमध्ये असताना गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक ह्या स्पर्धांमध्ये अव्वल नेहमीच असायची... तसेच तिच्या वडिलांनी तिला हि थोडे पैलवानकीचे धडे दिले होते.... शाळेत ती नेहमीच सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्यायची... तिचे वडील शिवभक्त असल्याने त्यांनी तिला तलवारबाजी, दांडपट्टा, लाट्याकाठ्या ह्यांसारखेही खेळ हि शिकवले होते... गावातील प्रत्येक कार्यक्रमात नेहमी ती ह्या गोष्टी करून दाखवायची म्हणून गावातील लोक तिचे खूप कौतुक करायचे... शाळेत अभ्यासातही बऱ्यापैकी हुशार असल्याने तिच्या वडिलांनी तिला दहावी नंतरच्या शिक्षणासाठी शहरात पाठवले होते....
शहरात आल्यानंतर ती एका रूमवर राहू लागली.... पण खेडवळ असल्यामुळे तिला कोण आपल्या ग्रुप मध्ये घेईनात सतत तिची चेष्टा मस्करी करत असायचे.... तेथील मुलीही तिच्याबरोबर जास्त बोलत नसायच्या.... कारण गावंढळ बोलणे, केसांना जास्तीचे तेल लावणे, उगाचच मोठमोठ्याने खिदळणे, नट्टापट्टा न करणे.... त्यामुळे मुले मुली मिळून तिची खूप खिल्ली उडवत असायचे.... पण तिला ह्याचे काहीच वाटायचे नाही... म्हणजे तिला कळतच नव्हते कि, ती लोक आपली खिल्ली उडवतात ते... ती सर्व गोष्टी हसण्यावारी न्यायची.... ती ज्या रूम मध्ये रहात होती, त्या रूममध्ये माधुरी, शिल्पा आणि अनघा ह्याही राहत होत्या.... त्या एकदमच शहरी वातावरणात मिसळलेल्या होत्या.... पार्टीला जाणे, वेळाने रूमवर येणे, ड्रिंक्स घेणे हे नित्याचेच.... रत्नमाला सर्वांना सांगायची कि इतक्या वेळ मुलींनी बाहेर राहणे योग्य नाही... पण तिचे म्हणणे कोणीच ऐकायचे नाही.... त्या सर्व गोष्टी हसण्यावारी घ्यायच्या.... व तिलाच काहीबाही बोलून गप्प करायच्या.... त्यांची रूमही जरा शहराबाहेर होती.... म्हणजे लोकवस्ती होती पण घरे जरा लांब लांब होती.... ह्यांच्या रूमसमोर दाट झाडी होती... आणि तिथून आसपास एक किलोमीटर अंतरावर काही बांधकामे चालू होती.... तिथं थोडे लोक असायचे....
एके दिवशी मात्र रात्रीचे १२. ३० वाजून गेले तरी रूमवर ह्या तिघींचाही पत्ताच नव्हता... रत्नमालाला आता चिंता वाटू लागली.... बऱ्याच वेळ तिनं वाट बघितली.... फोनही करून झाले पण फोन कोणीच उचलत नव्हते.... तोपर्यंत माधुरी आणि शिल्पा ह्या दोघी रूमवर आल्या.... खूप ड्रिंक्स घेतले होते त्यांनी... त्यांच्याबरोबर सोडायला त्यांचा एक मित्रही आला होता.... त्याने सांगितलं कि पार्टीमध्ये तिघीनींही खूप ड्रिंक्स घेतले होते व तिघीनांही व्यवस्थित चालताही येत नव्हते.... म्हणून तो सोडायला आला.... पण पार्टीत अनघा मात्र त्याला नंतर दिसली नाही असे त्याने सांगितले.... व तो निघून गेला.... आता तिने अनाघाबद्दल दोघींनाही विचारायला सुरुवात केली.... पण दोघींचाही सूर कधीच हरपलेला होता.... दोघीही नशेमध्ये होत्या.... रत्नमालाला त्या मित्रावर विश्वास नव्हता... तिने त्याचा माग काढायचे ठरवले.... ती चालत बाहेर पडली.... तो मुलगाही दिसेनासा झाला... रस्त्यावर कोणीच नव्हते...
बाहेर पुढे गेल्यानंतर गर्द झाडी होती.... त्या झाडीतून कुणाचातरी आवाज येत होता.... ती थोडी घाबरली पण पुढे चालत राहिली.... जवळ गेल्यानंतर वाचावा... मला कोणीतरी वाचावा... असे कोणीतरी ओरडत होते... तो आवाज तिला ओळखीचा वाटला.... अरे हा तर अनघाचा आवाज आहे... हळूहळू ती पुढे चालू लागली तर पुढे तिला तो माधुरी आणि शिल्पाला सोडायला आलेला मित्र आणि आणखी एक मुलगा अनघाचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करीत होता... आता काय करावे? असा तिला प्रश्न पडला... तिला तिच्या खेळाची आठवण झाली आणि गोळाफेकीप्रमाणे दिसेल तो दगड फेकायला चालू केले.... तसेही त्यामध्ये तिचे प्राविण्य होते.... ते दगड बरोबर त्या मुलांच्या डोक्यात बसले... दोघांचाही डोक्यातून घळाघळा रक्त वाहू लागले.... शेजारी पडलेल्या काठीने तिने त्यांना मारायला सुरुवात केली.... शेवटी पैलवानांची मुलगी म्हंटल्यावर तिने थोडी कुस्तीची प्रात्यक्षिकेही त्यांच्यावर आजमावली.... ह्या सर्व झटापटीत तिलाही खूप लागले होते.... पण आपल्यामुळे एका मुलीची इज्जत वाचत आहे ह्या विचारामुळे ती रणरागिणी प्रमाणे लढा देत होती.... आज अनघाने थोडी कमी ड्रिंक्स घेतल्यामुळे तिचे डोके थोडेफार चालत होते.... तिने पोलीस हेल्पलाईनचा नंबर कसातरी लावला... व घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.... तसेही पोलीस स्टेशन तेथून एक किलोमीटर अंतरावर होते.... पोलीस लगेच घटनास्थळी आले.... त्या दोघांनाही पोलिसांनी पकडले.... व रत्नमालाला लागले असल्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये भरती केले.... सकाळी माधुरी आणि शिल्पा शुद्धीवर आल्यानंतर त्यांना रत्नमाला व अनघा दोघेही दिसेनात... इतक्यात अनघा रूमवर आली आणि तिने रात्री घडलेली सर्व हकीकत सांगितली... त्यावेळी त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला कि रत्नमाला आपल्याला रोज सांगत होती कि सातच्या आत घरात यावं ते अगदी बरोबर होते.... आपणच तिची खिल्ली उडवायचो उगीचच.... आज रत्नमाला नसती तर आपल्यावर काय वेळ आली असती ह्या विचारानेच अनघाला कससंच झाले... त्या तिघीनींही एक फुलांचा गुच्छ घेतला व रत्नमालालाला भेटायला गेल्या.... त्यांनी तिला सॉरी म्हणून तिचे आभार मानले....

इकडे रत्नमालाचा फोटो पेपरमध्ये आला.... गावामध्ये, कॉलेजमध्ये सगळीकडे कौतुक झाले.... आणि रत्नमालाला रणरागिणी असे नाव मिळाले....
(टीप :- हा लेख पूर्णतः काल्पनिक असून, ह्यामधील कुठल्याही पात्राशी कुणाचाही संबंध नाही. तसे असल्यास तो केवळ योगायोग समजावा. तसेच ह्यातील ओळी जशाच्या तशा कोणी त्यांच्या लेखात कॉपी पेस्ट केल्यास कॉपीराईट होऊ शकते. धन्यवाद!!!)

लेखिका - सौ. अनुष्का हणमसागर
© Anu Swapn Blog 2020-2021
© Anu Swapn Blog 2020-2021

Nice
ReplyDeleteThanks
Deleteछान
ReplyDeleteChan
ReplyDelete