Chinese Application Alternatives V/S Other Applications
भारताच्या सार्वभौमत्वाला आणि अखंडतेला धोका असलेल्या ५९ चायनीज ऍप्लिकेशन्स वापरण्यावरवर भारताने बंदी घातलेली आहे. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने गोपनीयतेची चिंता व्यक्त करत ह्या ऍप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. भारत सरकारने मोबाइल आणि बिगर मोबाइल ह्या दोन्ही उपकरणांत वापरण्यात येणाऱ्या चायनीज ऍप्स नाकारल्या आहेत. त्यात सर्वात लोकप्रिय असलेल्या टिक टॉक वर बंदी घातल्याने वापरकर्ते जरा नाराजच आहे. पण सध्याची परिस्थिती पाहता भारताच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चायनीज ऍप्सवर बंदी घालणे हे सरकारचे मोठे पाऊलच म्हणावे लागेल.
तर कोणकोणत्या चायनीज ऍप्लिकेशन बंद झाल्या आहेत त्याची यादी खालीलप्रमाणे:
१. टिक टॉक (Tik Tok ),
२. शेअर ईट (Shareit),
३. क्वाई (Kwai),
४. यू सी ब्राउझर (UC Browser),
५. बैदु मॅप (Baidu map),
६. शी इन (Shein),
७. क्लॅश ऑफ किंग्स (Clash of Kings),
८. डीयू बॅटरी सेव्हर (DU battery saver),
९. हॅलो (Helo),
१०. लायकी (Likee),
११. युकॅम मेकअप (YouCam makeup),
१२. एम आई कम्युनिटी (Mi Community),
१३. सी एम ब्राउझर (CM Browers ),
१४. व्हायरस क्लिनर (Virus Cleaner),
१५. एपीयुएस ब्राउझर (APUS Browser),
१६. रॉमवे (ROMWE),
१७. क्लब फॅक्टरी (Club Factory),
१८. न्यूजडॉग (Newsdog),
१९. ब्यूट्री प्लस (Beutry Plus),
२०. वी चॅट (WeChat),
२१. यू सी न्यूज (UC News),
२२. क्यू क्यू मेल (QQ Mail),
२३. वेईबो (Weibo),
२४.झेंडर (Xender),
२५. क्यू क्यू म्युझिक (QQ Music),
२६. क्यू क्यू न्यूज फीड (QQ Newsfeed),
२७. बिगो लाईव्ह (Bigo Live),
२८. सेल्फी सिटी (SelfieCity),
२९. मेल मास्टर (Mail Master),
३०. पॅरलल स्पेस (Parallel Space),
३१. एम आई व्हिडिओ कॉल - शोऊमी ( Mi Video Call – Xiaomi),
३२. वीसिंक (WeSync),
३३. ई एस फाईल एक्सप्लोरर (ES File Explorer),
३४. व्हिवा व्हिडीओ - क्यू यू व्हिडिओ (Viva Video – QU Video Inc),
३५. मिटू (Meitu),
३६. वीगो व्हिडिओ (Vigo Video),
३७.न्यू व्हिडिओ स्टेटस ( New Video Status),
३८. डी यू रेकॉर्डर ( DU Recorder),
३९. व्हॉल्ट-हाईड (Vault- Hide),
४०. कॅच क्लिनर डी यू एप स्टुडिओ (Cache Cleaner DU App studio),
४१. डी यू क्लिनर (DU Cleaner),
४२. डी यू ब्राउझर (DU Browser),
४३. हागो प्ले विथ न्यू फ्रेंड (Hago Play With New Friends),
४४. कॅम स्कॅनर (Cam Scanner),
४५. क्लीन मास्टर - चिता मोबाईल (Clean Master – Cheetah Mobile),
४६. वंडर कॅमेरा ( Wonder Camera),
४७.फोटो वंडर ( Photo Wonder),
४८. क्यू क्यू प्लेअर (QQ Player),
४९. वी मीट ( We Meet),
५०. स्वीट सेल्फी( Sweet Selfie),
५१. बैदु ट्रान्सलेट (Baidu Translate),
५२. व्ही मेट (Vmate),
५३. क्यू क्यू इंटरनॅशनल (QQ International),
५४. क्यू क्यू सेक्युरिटी सेंटर ( QQ Security Center),
५५. क्यू क्यू लाँन्चर (QQ Launcher),
५६. यू व्हिडिओ (U Video),
५७. व्ही फ्लाय स्टेटस व्हिडिओ( V fly Status Video),
५८. मोबाइल लिजंड्स (Mobile Legends),
५९. डी यू प्रायव्हसी (DU Privacy), इत्यादी.
तर ह्यातील बऱ्याच एप्लिकेशन्स भारतात मोठ्या प्रमाणात दैनंदिन जीवनात वापरल्या जात असायच्या. (उदा. मॅप्ससाठी, गेम खेळण्यासाठी, चॅटिंगसाठी, भाषा ट्रान्सलेट करण्यासाठी)आता भारतात ह्या एप्लिकेशन्सवर बंदी घातल्यामुळे लोकांची थोडीफार गैरसोय होत आहे. मात्र भारतात आणि इतर देशांमध्ये ह्या एप्लिकेशन्सना तोडीस तोड एप्स तयार झाल्या आहेत. त्या एप्लिकेशनची माहिती खालीलप्रमाणे आहे. त्याला पर्याय देखील भरपूर आहेत.
- टिक टॉक (Tik Tok ), हॅलो (Helo), बिगो लाईव्ह (Bigo Live), वीगो व्हिडिओ (Vigo Video), यू व्हिडिओ (U Video), क्वाई (Kwai), हे शॉर्ट व्हिडिओ मनोरंजनावर आधारित प्लॅटफॉर्म आहेत. ह्या एप्लिकेशन्स साठी पर्याय खालीलप्रमाणे:
१. मित्रो (Mitron)
२. बोलो इंडिया (Bolo Indya)
३. रोपोसो (Roposo)
४. डबस्मॅश (Dubsmash )
५. चिंगारी (chingari)
६. ट्रिलर (Triller)
- बैदु ट्रान्सलेट (Baidu Translate) हे एका भाषेचे रूपांतर इतर भाषांमध्ये करण्यासाठी वापरले जात होते. ह्या एप्लिकेशन्स साठी पर्याय खालीलप्रमाणे:
१. गुगल ट्रान्सलेट (Google Translate )
२. हाय ट्रान्सलेट (Hi Translate )
- वी चॅट (WeChat), वी मीट (We Meet) हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत. ह्या एप्लिकेशन्स साठी पर्याय खालीलप्रमाणे:
१. फेसबुक (Facebook)
२. इंस्टाग्राम (Instagram)
३. व्हाट्सअप (whats up)
- हागो प्ले विथ न्यू फ्रेंड (Hago Play With New Friends) हे एक गेमिंग आणि चॅटींग एप्लिकेशन आहे. ह्या एप्लिकेशन्स साठी पर्याय खालीलप्रमाणे:
१.हाऊस पार्टी (Houseparty)
- शेअर ईट (Shareit), .झेंडर (Xender), ई एस फाईल एक्सप्लोरर (ES File Explorer), हे एप्लिकेशन्स फाईल ट्रान्सफर करण्यासाठी तसेच आपल्या डीवाईस वरील ऍप्स ट्रान्सफर करण्यासाठी वापरतात. ह्या एप्लिकेशन्स साठी पर्याय खालीलप्रमाणे:
१.फाईल्स गो (Files Go),
२. गुगल ड्राईव्ह (Google Drive)
३. शेअर ऑल(Share All)
४. जिओ स्वीचं (Jio Switch)
५. स्मार्ट शेअर(Smart Share)
६. सेंड एनीव्हेअर (Send Anywhere)
- यू सी ब्राउझर (UC Browser), सी एम ब्राउझर (CM Browers), एपीयुएस ब्राउझर (APUS Browser), झेंडर (Xender), डी यू ब्राउझर (DU Browser), हे एप्लिकेशन्स सर्च इंजिन आहेत. ते माहिती सर्च करण्यासाठी वापरतात. ह्या एप्लिकेशन्स साठी पर्याय खालीलप्रमाणे:
१. गुगल क्रोम (Google Chrome )
२. जिओ ब्राउझर (Jio browser)
३. ऑपेरा (Opera)
४. मायक्रोसॉफ्ट एज (Microsoft Edge)
५. मोझीला फायरफॉक्स (Mozilla Firefox),
- मोबाईल लिजंड्स (Mobile Legends) हे गेमिंग एप्लिकेशन्स आहे. ह्या एप्लिकेशन्स साठी पर्याय खालीलप्रमाणे:
१. फोर्टनायट बॅटल रॉयल (Fortnite Battle Royal )
२. लिजंड्स ऑफ लिजंड्स(Legends of Legends)
- बैदु मॅप (Baidu map) हे एप्लिकेशन्स आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणाचा नकाशा स्क्रीन वर दाखवत. ह्या एप्लिकेशन्स साठी पर्याय खालीलप्रमाणे:
१. गुगल मॅप्स (Google Maps)
२. ऍपल मॅप्स (Apple Maps)
- शी इन (Shein), रॉमवे (ROMWE), क्लब फॅक्टरी (Club Factory) हे एप्लिकेशन्स ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म आहेत. ह्या एप्लिकेशन्स साठी पर्याय खालीलप्रमाणे:
१. मिन्त्रा (Myntra),
२. अमेझॉन (Amazon)
३. फ्लिपकार्ट (Flipkart)
४. अजिओ (Ajio)
- कॅम स्कॅनर (Cam Scanner) हे एप्लिकेशन्स डॉक्युमेंट स्कॅनींग करण्यासाठी तसेच डिजिटल कॉपीज तयार करण्यासाठी वापरतात. ह्या एप्लिकेशन्स साठी पर्याय खालीलप्रमाणे:
१. ऍडोब स्कॅन (Adobe Scan)
२. फोटो स्कॅन (Photo Scan )
३. मायक्रोसॉफ्ट ऑफिस लेन्स (Microsoft Office Lens)
- युकॅम मेकअप (YouCam makeup), सेल्फी सिटी (SelfieCity), स्वीट सेल्फी(Sweet Selfie), मिटू (Meitu) ही एप्लिकेशन्स सेल्फी घेण्यासाठी तसेच फोटोज एडिट करण्यासाठी वापरतात. ह्या एप्लिकेशन्स साठी पर्याय खालीलप्रमाणे:
१. बी६१२ ब्युटी अँड फिल्टर कॅमेरा ( B६१२ Beauty And Filter Camera)
- न्यूजडॉग (Newsdog), क्यू क्यू न्यूज फीड (QQ Newsfeed), यू सी न्यूज (UC News) ही एप्लिकेशन्स न्यूज वाचण्यासाठी वापरतात. ह्या एप्लिकेशन्स साठी पर्याय खालीलप्रमाणे:
१. गुगल न्युज (Google News)
२. ऍपल न्युज (Apple News)
आपल्या भारतातील आर्थिक सुबत्ता वाढवण्यासाठी जास्तीत जास्त भारतीय एप्लिकेशन्स डाउनलोड करा. आणि चीनचे प्रॉडक्ट्स खरेदी करू नका. हि विनंती. भारतात असणाऱ्या डेव्हलपर्स नी हि आता नवीन एप्लिकेशन्स तसेच भारतातील मॅनुफॅक्चर कंपन्यानी बाकी देशांच्या सर्व प्रॉडक्ट्सना तोडीस तोड असे प्रॉडक्ट्स तथा एप्लिकेशन्स तयार करण्याचा मनसुबा ठेवायला हवा.
धन्यवाद!!!!
( टीप - हा लेख मला ह्या विषयावर जितके माहिती आहे. माझे जितके वाचन आहे त्या आधारे लिहिला आहे. )
© Anu Swapn Blog 2020-2021


0 Comments:
Post a Comment