ANU SWAPN BLOG
  • Home
  • Home
  • Articles
  • Poems
  • Image Quotes
  • Tech and Educational
  • About Us

# मधुमिता - एक भयकथा - भाग 3#

 July 29, 2020     article     2 comments   



Anu Swapn Blog

मधुमिता - एक भयकथा - भाग 3



मधुमिता भाग १ साठी खालील लिंकवर क्लिक करा 👇
 https://anuswap.blogspot.com/2020/07/MADHUMITA-PART1.html

मधुमिता भाग २ साठी खालील लिंकवर क्लिक करा 👇  
https://anuswap.blogspot.com/2020/07/Madhumita-Part2.html


आता सीमा घाबरली.... पण तिला वाटले कि हे सर्वजण मला भीती घालण्यासाठीच असे करत आहे... तिच्या जवळ मोबाइल होता तिने मोबाईलची टॉर्च लावली... आणि ती पुढे चालू लागली.... पण मागून सतत कोणीतरी येत आहे, असा तिला सतत भास होत होता... ती म्हणाली, " जगदीश, अविनाश तुम्हीच आहात ... मला माहित आहे तुम्ही मला भीती घालण्यासाठी हे सर्व करत आहात... " पण मागून काहीच रिस्पॉन्स आला नाही तरीही तशी ती पुढे चालताच राहिली.... तिला असे वाटत होते कि, मागे ह्यातीलच कोणीतरी येत असेल.... ती बाथरूमपाशी गेली, आणि तिने मागे वळून पहिले पण कोणीच नव्हते.... परत गेले असतील, म्हणून तिने हा विचार डोक्यातून काढून टाकला.... बाथरूममध्ये गेल्यानंतर ती फ्रेश झाली व अंधारातच तिला कसला तरी मागून आवाज येऊ लागला... 

आता मात्र ती पूर्णपणे घाबरली होती... कारण बाथरूमचा दरवाजा लावल्यामुळे आत कोणीच येऊ शकत नव्हते... तिला सतत मागून कोणीतरी खुसपुसतंय, मोठ्याने श्वास घेतय असे वाटत होते.... पण एका हातात मोबाईलची टॉर्च चालूच तिने जरा धीराने वॉश बेसिनमधील आरशात पहिले कि मागे कोण आहे का... आणि तेवढ्यात एक भयानक अर्धवट जळालेला विद्रुप असा चेहरा तिला त्यात दिसला.... ती जोरात ओरडली आणि बाथरूममधून पळत सुटली... कशीबशी दरवाजाची कडी उघडून  बाहेर पडली व पळू लागली... तिला जाणवले कि तिचा पाय कोणीतरी खेचत आहे तो स्पर्श एकदम थंड होता... ती खाली पडली... आणि ओरडू लागली, " वाचवा, मला कोणीतरी वाचावा"... तिचा आवाज ऐकून सर्वजण हातातल्या मोबाईलची टॉर्च लावून बाहेर पडले.... तर हि विहिरीजवळ खाली पडली होती... सर्वजण धावत गेले तिच्याजवळ पण त्यांना तिथे कोणीच दिसले नाही.... पूर्वाने तिला उठवले आणि काय झाले म्हणून विचारले.... 

👇for more details about this product click on below image



सीमा म्हणाली, "बाथरूममध्ये कोणीतरी आहे"

जगदीश, अविनाश आणि अद्वैत्य तिथे गेले पण पण त्यांना बाथरूममध्ये कोणीच आढळले नाही... 

जगदीश म्हणाला, " तिथे कोणीच नाही, तुला भास झाला असेल..."

सीमा म्हणाली, " तिथे कोणीतरी होते, मी पळत असताना माझे पाय पण ओढत होते... अगदी थंड स्पर्श जाणवला मला... 

अविनाश म्हणाला, " सीमा एखाद्या सापावर पाय पडला असेल, त्यामुळे तुला थंड काहीतरी जाणवलं असेल..."

सीमा म्हणाली, " पण ते मला खेचत होत..."

सायली म्हणाली, "एखाद्या वेलीत पाय अडकला असेल तुझा..."

सीमाचे कोणीच ऐकत नव्हते... ती पडल्यामुळे तिला जरा लागले होते... तिला त्यांनी आत आणले... सायलीने आणलेला फर्स्ट एड बॉक्स काढला आणि तिच्या पायाच्या जखमा साफ करू लागली.... तिने पायाकडे पाहिलं असता... सीमाच्या पायाला कोणीतरी ओरबाडलंय असच वाटत होत... पण काही धारदार वेलीत वैगेरे पाय अडकला असेल असा तिने विचार केला.... त्यानंतर सर्वजण झोपी गेले.... मात्र सीमाला काही केल्या झोप येत नव्हती... तिच्यासमोर तो चेहरा सारखा सारखा येत होता.... 

दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण उठले... सीमाला थोडा ताप आल्यामुळे, ती झोपली होती... मग आता डॉक्युमेंट्री करण्यासाठी परत सर्वांना गावात जायचे होते.... सायलीला सीमाच्या जवळ बसवून बाकी सर्वजण निघून गेले... तेवढ्यात मनोहर काका आले... स्वयंपाक आणि साफसफाई करण्यासाठी... त्यावेळी त्यांना फार्महाऊस उघडे दिसले... ते आत आले, त्यांनी सायलीला विचारले काय झाले सीमाला?? सायलीने काल रात्री घडलेला सर्व प्रकार सांगितला.... मनोहर काकांनी मीठ, मोहरी, मिरच्या घेऊन सीमाची दृष्ट काढली....

सायली म्हणाली, " काका आम्ही नाही मानत हे सर्व"

मनोहर काका म्हणाले, " तुम्ही मानत नसला तरी आम्ही मानतो हे सर्व..."

जेवायच्या वेळेपर्यंत गावात जाऊन सर्वजण आले... येताना सीमासाठी औषध घेऊन आले.... आता सीमालाही थोडेफार बरे वाटत होते... मग सर्वांनी मिळून दुपारचे जेवण घेतले... परत सर्वांनी आपले काम करायला चालू केले... व त्यानंतर थोडीफार विश्रांती घेतली... परत रात्रीची वेळ आली... बाकी सर्वजण मस्तपैकी पत्ते खेळण्यात गुंग होते... पण पूर्वाला पत्ते खेळायला आवडत नसे.... त्यामुळे पूर्वा अविनाशला म्हणाली, " मी पुस्तक वाचत इथे बाहेर बसते..." पूर्वाला रात्री पुस्तके वाचण्याचा छंद होता... ती बाहेर व्हरांड्यात लाकडी आराम खुर्चीवर बसून पुस्तक वाचत होती... तिच्या समोरच जुना लाकडी झोपाळा होता.... ती पुस्तक वाचण्यात एकदम गुंग झाली होती आणि तिच्या कानावर "कर्रर्रर्र... कर्रर्रर्र" असा आवाज आला... तिला वाटले कि असेल मनाचा खेळ.. जाऊ दे... परत तोच आवाज तिच्या कानावर आला, " तिने समोर पहिले, तर झोका आपोआप हालत होता... बरोबर वाऱ्याचा काही लवलेशही नव्हता.. आणि झोपाळा पुढे मागे हालत होता... तिने परत त्याकडे दुर्लक्ष केले आणि पुस्तक वाचू लागली... परत झोपाळा हलू लागला... आता मात्र तिची पाचावर धारण बसली कारण  तिने निरखून पहिले एक पुसटशी आकृती झोक्यावर बसली होती, आणि झोका घेत होती... ती जोरात ओरडू लागली... अविनाश तिथे आला, त्याने काय झालं म्हणून विचारलं.... त्यावेळी तिने त्या झोक्यावर कोणीतरी बसलं आहे म्हणून सांगितलं... अविनाशने बघितलं तर तिथे कोणीच नव्हतं... पण झोपला मात्र हालतोय हे त्याच्या लक्षात आलं... 

अविनाश म्हणाला, " असुदे, चल आता आत जाऊ... खूपच काळोख आहे बाहेर... त्यामुळे तुला चित्रविचित्र भास होत असतील..." मग दोघेही आत गेले.... रात्री अविनाश जागा होता.... बाकी सर्वजण झोपी गेले होते.... साधारण रात्रीचे १२ वाजले होते.... तो विचार करत होता कि, इथे सर्वांबरोबर हे काय घडत आहे????... रोज काहीना काही विचित्र प्रसंग येत आहेत... ह्यामागे काय कारण असेल...  हा विचार करत असतानाच तो खिडकीतून बाहेर पाहत होता... मागील बाजूला एक बल्ब त्यांनी चालूच ठेवला होता.... पण तो सतत चालू बंद होत होता... त्या पुसटश्या उजेडात  त्याला बाथरूमजवळ काहीतरी भयानक आकृती दिसली.... ती त्याला बाहेर बोलावत होती... ते पाहून अविनाश घामाघूम झाला... व कोण आहे तिकडे म्हणून विचारू लागला.... इतक्यात तिथे अदवैत्य तिथे आला आणि त्याने त्याला थांबवले.... 

क्रमश..... 

लेखिका - सौ. अनुष्का हणमसागर 
© Anu Swapn Blog
 

पुढे ह्या सर्वांसोबत काय काय घटना घडतात हे वाचण्यासाठी मधुमिता - एक भयकथा - भाग 4 साठी कंमेंट करा... लाईक करा...

(टीप - वरील लेखाचे सर्व अधिकार हे लेखिकेकडे अबाधित आहेत.... जर कोणी हे लिखाण आपल्या लेखनात जसेच्या तसे वापरले तर कॉपी राईट होऊ शकते.... वरील लेखन हे कोणतीही अंधश्रद्धा पसरविण्यासाठी केले नाही... हि एक मनोरंजन कथा आहे... जरी लेखन शेअर करावयाचे असल्यास वेबसाईट लिंक सहित शेअर करावेत... ह्यातील व्यक्ती आणि कथा काल्पनिक आहेत आणि जरी ह्या कोणाच्या आयुष्याशी मिळत्या जुळत्या असतील तर तो केवळ योगायोग समजावा... धन्यवाद)

वरील मधुमिता - एक भयकथा - भाग 3 आवडल्यास भाग 4 साठी नक्कीच कंमेंट करा.... कंमेंट केल्यास लवकरात लवकर चौथा भाग प्रकाशित करेन






  • Share This:  
Email ThisBlogThis!Share to XShare to Facebook
Newer Post Older Post Home

2 comments:

  1. SnehalJuly 30, 2020 at 11:46 AM

    👍

    ReplyDelete
    Replies
      Reply
  2. डॉ.मनिषा मोरेAugust 4, 2020 at 10:04 PM

    छान लिहिले नम्रता👍👍

    ReplyDelete
    Replies
      Reply
Add comment
Load more...

Popular Posts

  • FARMER POEM एका शेतकऱ्याचे मनोगत
  • Sad love quote / विरह
  • BEST BLOGGING NICHE 2021
  • # मधुमिता - एक भयकथा - अंतिम भाग# - horror stories in marathi
ANU SWAPN BLOG

Translate

Categories

  • article
  • International women's day 2021
  • Love Quotes in Marathi
  • poem
  • Quote
  • Tech & Educational

Blog Archive

  • May 2022 (1)
  • March 2022 (1)
  • April 2021 (1)
  • March 2021 (3)
  • February 2021 (1)
  • November 2020 (1)
  • September 2020 (5)
  • August 2020 (5)
  • July 2020 (5)
  • June 2020 (2)
  • May 2020 (8)
  • April 2020 (3)

Anu Swapn blog

This blog is created for only entertainment and knowledge purpose.
Disclaimer | Contact us | Privacy Policy | Terms of us

Copyright © ANU SWAPN BLOG | Powered by Blogger