मधुमिता - एक भयकथा - भाग 4
horror stories in marathi
मधुमिता भाग १ साठी खालील लिंकवर क्लिक करा 👇
मधुमिता भाग २ साठी खालील लिंकवर क्लिक करा 👇
मधुमिता भाग 3 साठी खालील लिंकवर क्लिक करा 👇
Click on below image for best products
अविनाश म्हणाला, " पण मला नाही हे पटत...."
अदवैत्य त्याला म्हणाला, " मग आत्ता बाथरूमच्या बाहेर बघितलास ते काय होते???"
अविनाशकडे त्याच्या ह्या प्रश्नाचे उत्तर नव्हते.... अदवैत्य त्याला म्हणाला, हे बघ मी तुला एक सांगतो... इथं आपण यायच्या आधीच असं काहीतरी घडलय कि ते सर्वांपासून लपून आहे.... उद्या अमावस्या आहे आणि आपल्याला हे सर्व कळायचे असेल तर आपल्याला तो आत्मा बोलवायलाच हवा... जाणून घ्यायला हव कि त्यासोबत ह्या ठिकाणी काय झालय ते.... मला माहिती आहे कि आपण हे चुकीचं करतोय पण तो आत्मा ह्याठिकाणी भटकतोय म्हंटल्यावर त्याची कोणतीतरी इच्छा अपूर्ण राहिली असावी....
अविनाश म्हणाला, " हे बघ अदवैत्य मला नाही ह्या गोष्टींवर विश्वास, पण तू सांगतोयस म्हणून एखादा प्रयोग करायला काही हरकत नाही... काय करणार आहेस तू????"
अदवैत्य त्याला म्हणाला, " मला त्यासाठी एक प्लँचेट बोर्ड बनवावा लागेल... सात मेणबत्त्या लागतील.... एक काचेचा ग्लास लागेल.... एक कोरा कागद आणि लाल स्केचपेन लागेल.... थोडं कुंकू लागेल....
अविनाश म्हणाला, "ठीक आहे...."
अदवैत्य म्हणाला, " पण मी जे करणार आहे त्यातील ज्ञान माझे पूर्ण नाही... मी आत्म्याला बोलावू शकतो... पण तो घालवण्यासाठी माझे बाबा लागतील.... कारण आत्मा आला कि जोपर्यंत त्याची ईच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तो जात नाही.... "
अविनाश म्हणाला, " काही रिस्क तर नाही ना ह्यात.... "
अदवैत्य त्याला म्हणाला, " मलाही माहित नाही... मी बाबांच्याशिवाय हे पहिल्यांदाच करतोय.... "
सकाळी सर्वजण उठले.... त्यानंतर अविनाशने सर्वांना प्लँचेट करण्याबद्दल सांगितले....
सायली म्हणाली, " ए मला खूप भीती वाटतीय... नको रे असल काही करायला... आपण घरी जाऊ...."
जगदीश म्हणाला, " करूया आपण... जर खरंच आपण कुणाचही वाईट नाही केलं आणि तो आत्मा आपल्याला काही नाही करणार... आणि हे सर्व अंधविश्वास आहे.... आत्मा वैगेरे काही नसतात मुळी...."
आता रात्र होतच आली होती.... आज तर अमावस्या असल्यामुळे फार्महाऊस मधून कुणीही एकटे बाहेर जायचे नाही असे ठरले होते... सर्वजण रात्रीचे १२.०० कधी वाजतात ह्याची वाट बघत होते... अविनाशने आणि अदवैत्यने प्लँचेट साठी लागणारे सर्व सामान गोळा करून आणून ठेवले होते... अदवैत्यने एक कोरा कागद घेतला आणि त्यावर लाल स्केचपेनने एका बाजूला अर्धा चंद्र, एका बाजूला सूर्य, एका बाजूला 'येस' आणि एका बाजूला 'नो' , मग इंग्लिश कॅपिटल लेटर्स, त्याखाली अंक असे काढले.... त्यानंतर एक कुंकवाने रिंगण काढले... कागदावर मध्ये तो ग्लास उलटा करून ठेवला.... सात मेणबत्त्या ठेवल्या.... त्याने सर्वांना नियम सांगायला सुरुवात केली... ह्यामध्ये पहिल्यांदा सर्वांनी कुंकवाने काढलेल्या रिंगणात बसायचे, मेणबत्त्या पेटवायच्या, एकाने फार्महाऊसमधील सर्व लाईट्स घालवायच्या, सर्वांनी कागदावरील ग्लासवर आपल्या एका हाताचं बोट ठेवायचं आणि काही झालं तरी आपलं बोट त्यावरून काढायचं नाही.... किंवा कोणीतरी हाक मारतय आस वाटल्यास कुंकवाने काढलेल्या रिंगणाबाहेर जायचं नाही... सर्वांनी नियम ऐकून घेतले... आणि तयार झाले.... रात्री १२.०० चा अलार्म वाजला आणि सर्वजण रिंगणात बसले... ठरल्याप्रमाणे पहिल्यांदा मेणबत्त्या पेटवल्या... आणि अविनाशने मोबाइलची टॉर्च हातात घेऊन फार्महाऊसमधील दिवे मालवले आणि तो रिंगणात येऊन बसला.... परत सर्वांनी काचेच्या ग्लासवर एका हाताचे बोट ठेवले....
अदवैत्यने म्हणायला चालू केले, " ह्या घरात किंवा आजूबाजूला कोणी आत्मा असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि आम्हाला आपले दुःख सांगा..." तरी काहीच होत नव्हते... परत त्याने दुसऱ्यांदा हेच वाक्य म्हंटले पण तरीही रिस्पॉन्स नाही मिळाला...
अविनाश म्हणाला, " बघ मी म्हणालो नव्हतो असं काही नसत म्हणून.... " आणि इतक्यात ग्लास अचानक सरकू लागला....
सायली अदवैत्यला म्हणाली, "अदवैत्य, तूच हे सर्व करत आहेस ना मला माहिती आहे..."
अदवैत्य म्हणाला, " नाही मी नाही करत आहे, ग्लास आपोआपच हालत आहे... "
आणि खरंच ग्लास आपोआपच सरकत सरकत 'येस' कडे गेला आणि त्यावर जाऊन थांबला...
आता मात्र सर्वजणच घाबरले होते... कारण तिथे असलेल्या शक्तीने त्यांना तिच्या अस्तित्वाची झलक दाखवली होती... परत अदवैत्य म्हणू लागला, " कि ह्याठिकाणी असलेल्या आत्म्याने आम्हाला काहीतरी करून दाखवावे कि जेणेकरून खरंच आम्हाला ह्या गोष्टीवर विश्वास बसेल.... आणि इतक्यात बाहेर वारे नसतानाही फार्महाऊसमधील पूर्ण बंद असलेल्या खिडक्या आपोआपच उघडझाप करू लागल्या.... बंद पडलेल्या घड्याळाचा काटा अचानकच फिरू लागला.... कोणीतरी आजूबाजूला कुजबुजतंय असे सर्वांना वाटू लागली..... आणि मोठी गगनाला भिडेल अशी किंकाळी ऐकू आली.... आता मात्र सर्वांची भीतीने गाळण उडाली.... सर्वजण घामाघूम झाले होते...
सीमा म्हणाली, " बास, आता हा खेळ बंद करूया... मला खूप भीती वाटत आहे. "
अदवैत्य म्हणाला, " असा खेळ नाही बंद करता येत, कारण आपण त्या आत्म्याला त्याला काय प्रॉब्लेम आहे हे विचारण्यासाठी बोलावलं आहे आणि ते कारण सांगितल्याशिवाय तो आत्मा जात नाही.... आपण जरी त्याला बोलावले असले तरी जायचे आत्माच ठरवतो... कुणीही काही झालं तरी ग्लासवरून हात काढू नका आणि रिंगणाच्या बाहेर जाऊ नका....
अदवैत्य नंतर म्हणू लागला, " तुम्हाला आमचा इथे असण्याचा त्रास होतो आहे का???
परत ग्लास हलू लागला आणि पुन्हा तो 'नो' कडे गेला...
अदवैत्य म्हणाला, " तुम्हाला काही आम्हाला सांगायचे आहे का???"
परत ग्लास हलू लागला आणि पुन्हा तो 'येस' कडे गेला...
शेवटी अदवैत्यने प्रश्न विचारला, "तुमचा चेहरा आम्हाला बघायला मिळेल का???"
आणि इतक्या अंधारात मेणबत्तीच्या उजेडात सायलीच्या मागे एक अर्धवट जळालेला चेहरा सर्वांना दिसला... तो दिसल्यावर सर्वांनी ग्लास वरील हात काढले आणि वाट दिसेल तिकडे पळू लागले... अदवैत्य म्हणाला, "का हात काढला सगळ्यांनी, अरे पळू नका, आता मी काही झालं तरी ह्या आत्म्याला नाही घालवू शकत...." पण त्याच्याकडे एक मंतरलेले पाणी होते त्याने सायलीच्या बाजूला टाकले आणि तो थोड्या वेळा करीता का होईना गायब झाला...."
अविनाशला मात्र सतत तो कोणाचा तरी ओळखीचा चेहरा वाटत होता.... अविनाशने पुन्हा सगळ्यांना ओढून आणून त्या रिंगणात बसविले आणि अदवैत्यला पुन्हा खेळ चालू करायला लावला.... कारण त्याला उत्सुकता लागली होती कि ती व्यक्ती कोण आहे हे पाहण्यासाठीची....
क्रमश.....
लेखिका - सौ. अनुष्का हणमसागर
© Anu Swapn Blog
पुढे ती व्यक्ती कोण होती... अविनाश कसा काय तिला ओळखत होता... तिच्यासोबत काय घडले हे वाचण्यासाठी मधुमिता - एक भयकथा - भाग 5 साठी कंमेंट करा... लाईक करा...
(टीप - वरील लेखाचे सर्व अधिकार हे लेखिकेकडे अबाधित आहेत.... जर कोणी हे लिखाण आपल्या लेखनात जसेच्या तसे वापरले तर कॉपी राईट होऊ शकते.... वरील लेखन हे कोणतीही अंधश्रद्धा पसरविण्यासाठी केले नाही... हि एक मनोरंजन कथा आहे... जरी लेखन शेअर करावयाचे असल्यास वेबसाईट लिंक सहित शेअर करावेत... ह्यातील व्यक्ती आणि कथा काल्पनिक आहेत आणि जरी ह्या कोणाच्या आयुष्याशी मिळत्या जुळत्या असतील तर तो केवळ योगायोग समजावा... धन्यवाद)
वरील मधुमिता - एक भयकथा - भाग 4 आवडल्यास भाग 5 साठी नक्कीच कंमेंट करा.... कंमेंट केल्यास लवकरात लवकर चौथा भाग प्रकाशित करेन

👍
ReplyDelete