
सुशांत आणि वैशाली हे दोघे एकाच कंपनीमध्ये काम करत होते.... दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होत.... दोघेही वेल सेटल्ड असल्यामुळे त्यांच्या प्रेमाला घरातून पाठिंबा मिळाला आणि लग्न झालं.... लॉकडाऊन मध्येच त्यांचं लग्न लावून दिल.... दोघेही सुखी संसाराची स्वप्ने बघत होती.... सुशांतची फॅमिली एकत्र असल्यामुळे दोघांनाही एकांत मिळत नव्हता आणि लॉकडाऊनमुळे त्यांना हनीमूनलाही कुठे जाता येत नव्हते.... त्यामुळे दोघांनाही "का रे दुरावा" असे झाले होते.... पण लग्नानंतर सुशांतच्या एका मामाचा गावाकडून फोन आला कि, " दोघेही गावाकडे या चौदा दिवस राहायला, इथेच क्वारंटाईन व्हा.... तुम्हालाही एकांत मिळेल.... "
सुशांतला तर लॉटरी लागल्याचाच आनंद झाला.... सुशांतच्या शहरापासून साधारण एक तास अंतरावर गाव होते.... गावामध्ये मामा, मामी आणि एक लहान भाचा राहत होते.... मामाचे घर अगदी मोठे असल्यामुळे सुशांतला तिथे मोकळीकच होती... सुशांतने मामाच्या फोनबद्दल घरात माहिती दिली आणि त्यांनीही दोघांना जाण्यासाठी परवानगी दिली... सुशांत आणि वैशालीचा आनंद आता गगनात मावेना... दोघेही जायच्या तयारीला लागले.... दोघांनी जाण्यासाठी बॅग भरली.... सेफ्टी म्हणून मास्क, सॅनिटायझरहि सोबत घेतले.... सर्व टेस्ट आणि पेपरवर्क आधीच पूर्ण करून घेतले.... आता उद्या सकाळीच निघायचे आणि गाव गाठायचे हे ठरवूनच दोघे झोपी गेले.... नशिबाने अजून सुशांतच्या आणि मामाच्या गावात कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नव्हता.... सकाळी उठून दोघेही जायच्या तयारीला लागले....
आणि इतक्यात बॉसचा अर्जंट फोन आला कि, "सुशांत आज थोडा वेळ देशील का??? महत्वाची मीटिंग आहे एका क्लाईंटसोबत आणि तेवढी अटेंड कर.... "
सुशांत बॉसला म्हणाला, " पण सर मी लग्नासाठी रजा घेतली होती वीस दिवसांची..."
बॉस म्हणाले, " हो मला माहिती आहे रे पण काय करायचे??? लॉकडाऊनमुळे आधीच ऑफिसची कामे कमी झाली आहेत... आणि हि मिटिंग आपल्याला करावीच लागेल...."
शेवटी होय नाही करत करत सुशांत तयार झाला....
सुशांत वैशालीला म्हणाला, " हे बघ वैशाली गाव जवळच आहे त्यामुळे आपण जरी रात्री आठ वाजता निघालो तरी अर्धा एक तासात गावात पोहचू शकतो.... त्यामुळे तू काही काळजी करू नकोस.... आपण कितीही वेळ झाला तरी आजच निघू.... "
त्याने घरातल्यानाही हि गोष्ट सांगितली.... घरातल्यांनी रात्री निघण्यासाठी मनाई केली....
सुशांतची आई म्हणाली, " अरे सुशांत आत्ताच तुमचं लग्न झालं आहे आणि तुम्ही अजून नवीन आहात ... अजून वैशालीच्या हातावरची मेहंदीही उतरली नाही आणि चुडाही तसाच आहे... उगाच रात्री निघू नका... "
सुशांत आईला म्हणाला, " अग आई गाव जवळच आहे आणि आम्ही चारचाकी घेऊन जाणार आहोत... आणि भूत खेत आम्ही नाही मानत.... "
सुशांतच्या ह्या अशा वाक्यामुळे त्याची आई पुढे काही म्हणू नाही शकली.... जसा सुशांत म्हणत होता अगदी तास त्याला रात्री ऑफिसमधून यायला खूप वेळ झाला.... सुशांतने मामला फोन करून सांगितले कि आम्ही थोड्याच वेळात निघत आहोत आणि रात्री मामीला माझ्या आवडीची वांग्याची चरचरीत भाजी करायला सांग.... सुशांतला त्याचा मामा सांगत होता कि इतक्या रात्री दोघे असे निघू नका आणि उद्या आला तरी चालतंय कि.... तरीही सुशांत कोणाचाही ऐकण्याच्या मनःस्तिथीत नव्हता... त्याने आजच येणार आहे म्हणून सांगितलं.... यावर मामाही काही बोलू शकला नाही....
दोघांनी सामानाची आवराआवर करून गाडीत भरले... रात्री नऊच्या दरम्यानच निघाले.... गाडी आता गावाच्या दिशेला लागली.... सुशांत आता जरा निर्धास्त झाला होता.... गाडी आता घाटात लागली आणि सगळीकडे अंधाराचे राज्य पसरले होते... आजूबाजूला जंगल असल्यामुळे विविध प्राण्यांचे, पक्ष्यांचे आवाज येत होते... अधूनमधून घुबडांचे आवाजही येत होते.... सुशांतने म्युसिक प्लेअर चालू केला होता... मस्त गाणी लावली होती.... त्यामुळे दोघेही अगदी रोमँटिक झाले होते.... सुशांत वैशालीला म्हणाला, "बघ ना किती निरव शांतता आहे इकडे.... वातावरण हि अगदी सुंदर आहे... "
वैशाली सुशांतला म्हणाली, " हो ना.... "
सुशांत जरा रोमँटिक मूड मध्ये गाणे म्हणू लागला, " हम तुम एक गाडी मी बंद हो, और गाडी बंद पड जाये, इन जंगलंकी भुलभुलैय्या मे हम दोनो खो जाये.... "
वैशाली लाजली आणि म्हणाली "ईश्श" काहीतरीच काय.... इथे जर इतक्या रात्री गाडी बंद पडली ना तर कोणी मेकॅनिक पण नाही मिळणार इकडे.... "
आणि असे म्हणत असतानाच सुशांतच्या गाडीतून एक आवाज झाला आणि गाडी बंद पडली.... दोघेही घाबरले सुशांत म्हणाला, "काय झालं असेल गाडीला... मी तर निघायचं म्हणून सकाळीच सर्व चेक करून घेतलं होत गाडीचं.... "
वैशाली म्हणाली, " तरी आई म्हणत होत्या कि इतक्या रात्री जाऊ नका म्हणून.... तुम्ही नाही ऐकलं त्यांचं... "
सुशांत म्हणाला, "सब नसीबका का खेल है.... असुदे मी खाली उतरून गाडीचं इंजिन चेक करून बघतो काय झालाय ते... काहीतरी किरकोळ प्रॉब्लेम असेल... "
वैशाली म्हणाली, " अरे सुशांत तुला वेड बीड लागलय का??? इतक्या रात्री ह्या जंगलात अंधारात बाहेर पडणार आहेस गाडीतून... इथे कोणकोणती जनावर असतील काय माहिती.... वाघ बिग असला तर??? तू काही खाली उतरू नकोस...
सुशांत म्हणाला, " मी खाली उतरलो नाही तर मला कस कळणार गाडीला काय झालय ते... एक काम करू आधी आपण मामाला फोन करू कि दुसरी गाडी पाठवून द्या न्यायला... सुशांतने मोबाइल बघितला पण रेंज नव्हती आणि वैशालीच्या फोनलाही रेंज नव्हती.... त्यामुळे सुशांतला खाली उतरून इंजिन बघण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता.... दोघांनीही पुढे मागे पहिले आणि आजूबाजूला कानोसा घेतला कोणी नाही हे बघून खाली उतरले.... सुशांतने बॉनेट उघडून इंजिन बघितले... वैशाली टॉर्च पकडून बाजूलाच उभी होती.... थोडेफार प्रयत्न केल्यानंतर गाडी चालू झाली.... परत गाडी घाटमाथ्यावरून उताराला लागली आणि समोर गावाचा बोर्ड होता... पण त्याठिकाणी दोन रस्ते फुटले होते आणि त्या बोर्डवर कुठलीही दिशादर्शक खूण नव्हती.... सुशांतनेही हा असा रस्ता पहिला नव्हता.... कदाचित पुढे काहीतरी काम चालू असेल म्हणून पर्यायी रस्ता त्यासाठी केला असेल.... त्याने गाडी त्या रस्त्याकडे वळविली....
पुढे गेल्यानंतर त्याला सर्वच अनोळखी वाटू लागले... परंतु पुढे कुठेना कुठे हा रस्ता बाहेर पडत असेल म्हणून तो गप्प बसला.... गाडी एका पुलाजवळ आली.... जरा पुढे गेल्यानंतर त्यांना एक बाई एका लहान मुलाला कडेवर घेऊन उभी होती आणि ती गाडीला हात करत होती...
वैशाली सुशांतला म्हणाली, " सुशांत बघ ना त्या पुलाजवळ कोणतीतरी बाई गाडीत येण्यासाठी हात करत आहे... इतक्या रात्री ह्या जंगलात बाई कुठून आली असेल???"
सुशांत वैशालीला म्हणाला, " इथे डोंगरमाथ्यावर काही वाड्या वस्त्या असतील तेथील असेल ती... कदाचित तिला गावात जायचं असेल म्हणून ती इथे थांबली असेल... वाहन भेटले कि त्यात बसून जायचं.... काय करू??? मी गाडी थांबवू का तिच्या हातात लहान मूल आहे... "
वैशाली म्हणाली, " चोर वैगेरे तर नसेल ना?? "
सुशांत म्हणाला, " आपण गाडी सावकाश घेऊ.... आणि तसा तिचा हेतू वाटल्यास गाडी जोरात पळवू.... "
गाडी सावकाश घेत असतानाच वैशालीला तिथे एक बोर्ड दिसला.... त्यावर लिहिले होते " इथे गाडी थांबवण्यास मनाई आहे..." हे ती सुशांतला सांगणार त्याच वेळी सुशांतने गाडी थांबवली आणि त्या बाईला विचारू लागला... "बाई कुठे जायचं आहे तुम्हाला??? " बाई काहीच बोलत नव्हती फक्त रस्त्याकडे बोट करून दाखवत होती... बाईची सर्व केस विस्कटलेले होते आणि सर्व चेहऱ्यावर आले होते... त्यामुळे तिचा चेहरा दिसत नव्हता.... पण बाईने पदराखाली झाकून ठेवलेले तिचे बाळ मात्र खूप रडत होते.... वैशालीला हि दया आली आणि तिने गाडीचा मागील दरवाजा उघडून तिला आत घेतले...
सुशांतने गाडी चालू केली आणि गाडी त्या बाईने दाखवलेल्या रस्त्याला लागली.... वैशाली त्या बाईला प्रश्न विचारू लागली "बाई तुम्ही कोण??? इतक्या रात्री ह्या जंगलात काय करत आहात??? बाई अजूनही शांतच होती आणि काही उत्तरच देत नव्हती.... वैशालीला वाटले कि कदाचित मुकी असेल.... म्हणून तिने प्रश्न विचारायचे बंद केले....
परत थोड्या वेळाने गाडी फिरून त्याच रोडवरती आणि पुलावरती आली.... पहिल्यांदा सुशांतच्या लक्षात नाही आले पण वैशालीच्या लक्षात आले कि हा बोर्ड आपण जरा वेळेपूर्वीच पहिला होता आणि परत आपण त्याच ठिकाणी आलो आहोत....
वैशाली सुशांतला म्हणाली, " आपण पूर्वीच्या ठिकाणीच आलो आहोत... "
सुशांत म्हणाला, "अग तशीच लोकेशन असेल इथेही... त्यामुळे तुला तसे वाटत असेल...."
परत परत असे चार ते पाच वेळा त्यांच्यासोबत घडले.... मग सुशांतला कळले कि आपण बराच वेळ झाले एकाच ठिकाणी गोल गोल फिरत आहोत.... त्याच्या लक्षात आले कि आपल्याला "चकवा" बसला आहे....
मागील सीटवरील बाळाच्या रडण्याचा आवाज मात्र वाढत होता.... त्या बाईचं मागे काय चाललं आहे हे पाहण्यासाठी वैशालीने समोरील आरशातून पाहिलं... तेव्हा त्या बाईने ते मूल पदराखालून बाहेर काढले.... त्या मुलाच्या चेहऱ्यावर जखमा होत्या आणि रक्त ओघळत होते.... ती बाई ते रक्त चाटत होती... आता वैशालीला घाम फुटला... तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता कारण तिने जे पहिले ते पाहून इत्तर कोणालाही घेरीच आली असती.... त्या बाईचा चेहरा अतिशय विद्रुप दिसत होता... चेहऱ्यावर मांसाचा गोळाच होता.... त्यातून मोठे लाल डोळे बाहेर आले होते.... जीभ एका साईडला लोंबकळत होती... दात मोठे होते आणि भयंकर होते.... आणि ती बाईही त्या आरशातून वैशालीकडे बघून हसत होती.... हे सर्व पाहून वैशाली मोठ्याने ओरडली " भूत, भूत " आणि सुशांतलाही कळेना कि हि अशी का म्हणत आहे ते.... सुशांतचे लक्षही त्या आरशातून बाईकडे गेले... आणि त्याचीही शुद्ध हरपली आणि गाडी पुढच्या कठड्याला जाऊन धडकली....
त्यानंतर जेव्हा ते दोघे शुद्धीवर आले त्यावेळी ते दोघेही हॉस्पिटलमध्ये होते... वैशालीच्या डोक्याला लागले होते आणि सुशांतचा हात फ्रॅक्चर झाला होता.... सुशांतचा मामा त्यांच्या शेजारी बसला होता....
सुशांतने मामला विचारले कि काय झाले होते.... तुमचा अपघात झाला होता... आणि त्यातून तुम्ही कसेबसे वाचला आहात... तुम्ही बराच वेळ झाला तरी घरी नाही पोहोचला म्हणून आम्ही गावातील लोकांना घेऊन सगळीकडे तुमची शोधाशोध केली.... आणि सकाळी तुमची गाडी आम्हाला पडलेल्या पुलाजवळ सापडली... आणि त्यावेळीच आम्हाला समजले कि तुम्हाला चकवा बसला असणार....
मामा सांगू लागला ज्या रस्त्यावर रस्ता समजून तुम्ही गेला होता तो रस्ता बंद आहे.... तो पूल पूर्वीच कोसळला होता.... ज्यावेळी तो पूल कोसळला त्यावेळी एक गाडी त्या पुलावरून जात होती त्यावेळी त्या गाडीतील सर्वजण त्यात मेले.... आणि त्या ठिकाणी रात्री कोणी गेलं तर त्यांना "चकवा " बसतो... कधीकधी त्या पडलेल्या गाडीतील लोकांचे आत्मे तिथे लोकांना तिथे दिसतात... तुमच्यासोबतही असच घडलं ना??? सुशांतने मामाकडे पाहून मान डोलवली.... आणि तेव्हापासून रात्री कधीही गाडी घेऊन बाहेर जायचं नाही असा कानाला खडा लावला....
समाप्त....
Nice
ReplyDelete