Best Blogging Niche in Marathi– 14 That Will Make Money (Easily)
![]() |
| Best Blogging niche in marathi |
ब्लॉग म्हणजे काय? What is Mean By Blog??
ब्लॉग हे एक असे माध्यम आहे की ज्यामधुन तुम्ही तुमचे विचार, मतं, आणि एखाद्या गोष्टीविषयचे सखोल ज्ञान हे लोकांपर्यंत पोहचवू शकता. तुम्ही तुमच्या ज्ञानाची माहिती ही ऑडिओ क्लिप्स, व्हिडीओ क्लिप्स किंवा लेखन या माध्यमातुन लोकांना देवू शकता. खरंतर ब्लॉग सुरू करणे ही काही अवघड गोष्ट नाही. ब्लॉगर हे गुगलने आपल्यासाठी फ्री मध्ये तयार केलेला प्लॅटफॉर्म आहे. थोडीशी कोडींगबद्दलची माहिती असल्यास नक्कीच आपण ब्लॉग चांगल्यारितीने लिहून पब्लीश करू शकतो. तसेच ब-याच फ्री मध्ये थीम्स् आहेत की त्या आपण ब्लॉग साठी वापरून आकर्षक ब्लॉग तयार करू शकतो.
सध्या ब्लॉगिंग
करणे हा विषयच ट्रेंडिंगमध्ये असल्यामुळे आपण आपले करिअर यातुनही घडवू शकतो. आपले ज्ञान
हे लोकापर्यंत पोहचवू शकतो. पण तो यशस्वी होण्यासाठी तितकेच प्रयत्न करणेही गरजेचे
आहे. ब्लॉग लिहीण्यासाठी आपणास आपण लिखाण करत असलेल्या विषयाची पुरेपूर माहिती असणे
आवश्यक आहे. ब्लाग लिहीण्यासाठी आपणास योग्य अशा niche ची माहिती असणे आवश्यक आहे.
योग्य niche च आपल्याला योग्य दिशा दाखवून ब्लॉगिंग क्षेत्रात यशस्वी होण्यास मदत करू
शकतो. जर तुम्ही योग्य niche च्या माध्यमातुन योग्य ट्राफिक आपल्या ब्लॉगवर घेवून येत
असाल तर नक्कीच तुम्हाला गुगल अॅडसेन्स अप्रुवल मिळून पैसे जास्त कमाविण्यासाठी संधी
निर्माण होते.
ब्लॉगिंग करताना योग्य कीवर्ड निवडून त्यावर काम केले तर नक्कीच तुम्ही यशस्वी ब्लॉगर होवू शकता. आपण कीवर्ड सर्च करण्यासाठी खालील टूल्स चा वापर करू शकतो. त्यातील काही सर्च टूल्स हे फ्री मध्ये आहेत. तर काही थोडे पैसे घालून आपण ऑनलाईन विकत घेवू शकतो.
सर्वात लोकप्रिय 14 ब्लॉग नीचेस (Top 14 niche for blogging)
1) आरोग्य व स्वास्थ्य (Health & Fitness)
सध्या लोक आपल्या
आरोग्याविषयी व स्वास्थ्याविषयी खुपच जागरूक आहेत. त्यामुळे आजकाल बरेच लोक हयाविषयी
नेटवर सर्च करत असतात. जर तुम्हाला
1) एका विशिष्ट
आहाराची माहीती असेल ( उदा. केटो डाएट, ग्लुटेन मुक्त आहार, इ),
2) व्यायामाचे विशिष्ट प्रकार माहिती असतील ( उदा. योगा, वजन उचलणे, पोटाच्या व्यायामाचे प्रकार, सुर्यनमस्कार, इ.),
3) होमिओपॅथी,
एक्युपंक्चर, इत्यादी
जर तुम्ही
यातील जाणकार असाल तर नक्कीच तुम्हाला हे niche योग्य दिशा दाखवेल आणि तुम्ही हयाबद्दल
माहिती देवू शकाल. Google AdSense हया niche ला नक्कीच जास्त पैसे देते.
2) नोकरी
व करिअर (Jobs & Career)
नुकतेच शिक्षण
पुर्ण केलेले विद्यार्थी हे नोकरीच्या शोधात असतात. तुम्ही अशी एखादी वेबसाईट तयार
करू शकता की त्या वेबसाईटद्वार अशा लोकांना नोकरी व करिअर या दोन्हींबद्दल माहिती देवू
शकता तसेच कुठे किती संधी आहेत हयाबद्दलही योग्य मार्गदर्शन करू शकता. अर्थात तुम्हाला
त्या क्षेत्रातली योग्य माहिती असणे आवश्यक आहे. हया विषयामध्येही लेखन करणारे ब्लॉगर
खुप कमी आहेत.
3) तंत्रज्ञान (Technology)
जर तुम्ही
इंजिनिअर असाल तर niche या विषयावर तुम्ही लिहू शकता. तुम्ही तुमच्या फिल्डशी संबंधीत
या ब्लॉगमध्ये लिहू शकता. हा ब्लॉगिंगसाठी सर्वात लोकप्रिय niche आहे. तुम्ही लेटेस्ट
टेक्नॉलॉजी, मोबाईल, लॅपटॉप, इलेक्ट्रीकल व इलेक्ट्रॉनिक्स वस्तु याबद्दलची माहिती
देवू शकता.
4) स्पोर्टस
(Sports)
जर तुम्हाला
खेळ बघायला व खेळ खेळायला आवडत असतील तसेच तुमचा या विषयावर चांगला अभ्यास असेल तर
तुम्ही नक्कीच या विषयावर लिहू शकता. तसेच भारतामध्ये या विषयावर लिहिणारे खुप कमी
ब्लॉगर्स आहेत. जर तुम्हाला भारतातील विविध खेळांची माहिती जगाला करून द्यायची असेल
तर तुम्ही नक्कीच या क्षेत्रामधील तुमचे ज्ञान ब्लॉगच्या माध्यमातुन जगासमोर मांडू
शकता.
5) व्यवसाय व मार्केटींग (Business & Marketing)
जर तुमची
पार्श्वभुमी ही व्यवसायाशी किंवा मार्केंटींगशी संबंधीत असेल तर या niche विषयी ब्लॉग
तयार करणे ही एक चांगली कल्पना असू शकते. आपण जर व्यवसाय कसा सुरू केला जातो तसेच त्या
व्यवसायासंबंधीत मार्केटींग कसे केले जाते हे सांगणारा ब्लॉग जर तुम्ही तयार केला तर
नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरू शकते. B to B (Business to Business), B to C ( Business
to Customer), स्मॉल बिझीनेस, स्वयंरोजगार, सोशल मिडीया मार्केटींग, Affiliate Marketing,
इ. या विषयांबद्दल तुम्ही नक्कीच मार्गदर्शन करू शकता. या साठीही Google AdSense चांगले
पैसे देतात.
7) प्रवास (Travel)
जर तुम्हाला
फिरायची आवड असेल तसेच तुम्ही चांगले फोटोग्राफर असाल तर तुम्ही हा विषय अगदीच लोकांपर्यंत
पोहाचवू शकता. तुमच्या स्वतःच्या प्रवासाबद्दल, हॉटेलींग, खरेदी याबद्दल तुम्ही यामध्ये
लिहू शकता. तसेच एखादा देश किंवा खंड, तेथे जाण्यासाठी लागणारी प्रवासाची साधने, प्रार्थनास्थळे,
निसर्ग, आसपासचे मार्ग, रेस्टॉरंटस्, हॉटेल्स्, याबद्दलची तपशीलवार माहिती तुम्ही या ब्लॉगमध्ये देवू शकता. तसेच तेथील
फोटोंच्या माध्यमातुन तुम्ही तेथील स्थळांचे वर्णनाचे लेखनही यात करू शकता.
8) हस्तकला ब्लॉग (Craft Blog)
जर तुम्हाला
विणणे, रंगविणे, शिवणकाम, दागदागिने तयार करणे, मातीच्या वस्तु तयार करणे या गोष्टींची
आवड असेल तर तुम्ही याबद्दल लोकांना माहिती देवू शकता. तसेच याचे व्हिडीओही बनवू शकता.
तुम्ही या ब्लॉगद्वारे केलेल्या वस्तु विकूही शकता. तसेच त्याचे फोटाज् किंवा व्हिडीओज्
तुम्ही प्रिंटरेस्ट सारख्या वेबसाईटवर टाकू शकता.
9) डी.आय.वाय
ब्लॉग (DIY Blog)
जर तुम्हाला
घर सजवायला आवडत असेल तसेच तुम्हाला घरामध्ये काही इंटिरिअर किंवा ग्हसजावटीसाठी काही
वस्तु बनविण्यास आवडत असेल तर तुम्ही नक्कीच या विषयाबद्दल लिहू शकता. आजकाल लोक घर
सजविण्यासाठी वेगवेगळया वस्तु वापरत असतात आणि याबद्दल सर्च करणा-या लोकांची संख्याही
खुप जास्त आहे. तुम्ही याबद्दल काही टिटोरिअल्स देवू शकता किंवा वस्तु कशा बनवायच्या
याबद्दल माहिती देवू शकता.
9) फुड ब्लॉग (Food Blog)
लोकांना नेहमीच
नवीन काहीना काही पदार्थ खायची हौस असते. भारतामध्ये तर खव्वय्यांची संख्या जास्त आहे.
जर तुम्ही उत्तम शेफ असाल त्यामुळे हा ब्लॉग तर सर्वात लोकप्रिय होवू शकतो. आपण हयामध्ये
रेसिपीज या फोटोसहीत शेअर करू शकता. छान व सुलभ पाककृतींबद्दल लिहू शकता. आपल्या रेसिपी
बुक तयार करून विक्री करू शकता.
10) शैक्षणिक
ब्लॉग (Educational Blog)
असा एखादा
विषय ज्या विषयाबद्दल तुम्हाला चांगली माहिती आहे तो विषय घेवून तुम्ही लोकांना शिकवू
शकता. उदा. तुम्ही जर गणित या विषयात तज्ञ असाल तर तुम्ही एखादे गणित सोप्या पद्धतीने
कसे सोडवायचे याबद्दलची तपशीलवार माहीती या ब्लॉगमध्ये देवू शकता, तुम्ही जर सॉफ्टवेअर
तयार करण्यात तरबेज असाल तर तुम्ही स्टेप बाय स्टेप कोडींग या विषयाबद्दल माहिती देवू
शकता, एखादी वेबसाईट तयार करण्याच्या टिप्स् देवू शकता. केमिस्ट्री, फिजीक्स्, बायोलॉजी,
झुलॉजी, बॉटनी हे विषय माहिती असतील तर तुम्ही याबद्दलची माहितीही देवू शकता. इंग्लीश
स्पिकींग या विषयाबद्दल व्हिडीओज् बनवू शकता तसेच व्याकरणाबद्दलही माहिती देवू शकता.
12) लाईफस्टाईल (Lifestyle)
या ब्लॉगमध्ये
विविध विषयांच्या श्रेणींबद्दल लिहू शकता. उदा. फुडस्, फॅशन्स, प्रवास, सौंदर्य हा
विषय महिलांसाठी तसेच पुरूषांसाठी स्टाईल, फिटनेस आणि संगीताबद्दल लिहू शकता.
13) कला व संस्कृती (Arts & Culture)
हा विषयही
जरा दुर्लक्षित विषय आहे. जर तुम्ही प्रत्येक देशाच्या कलेविषयी किंवा संस्कृतीविषयी
माहिती घेवून जर त्याबद्दलची माहिती जनतेसमोर आणली तरी लोकांना प्रत्येक प्रांतातील
सर्व संस्कृती व कलेबद्दल माहिती मिळण्यास उपयोग होईल.
14) बॅंकिंग व वित्त (Banking & Finance)
बॅंकींग हे क्षेत्राशी आपण निगडीत असाल, जर आपण या विषयाची पदवी घेतली असेल तर आपण लोकांना फायनान्स बदद्ल माहिती दिली तर या विषयावर चांगला ब्लॉग होवू शकतो. सद्यातरी या विषयावर लिखाण करणारे लोक खुप कमी आहेत.
© Anu Swapn Blog

Super ������
ReplyDeleteHard
ReplyDelete