ANU SWAPN BLOG
  • Home
  • Home
  • Articles
  • Poems
  • Image Quotes
  • Tech and Educational
  • About Us

ESSAY, HISTORY & SPEECH ON WORLDS WOMEN'S DAY 8 MARCH IN MARATHI

 March 07, 2021     International women's day 2021     1 comment   

 

जागतिक महिला दिनाचा इतिहास History of International Women's Day


International Woman's Day
WORLDS WOMAN DAY 8 MARCH

       पुर्वी पुरूषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांना सर्व जगभरात मतदानाचा हक्क नाकारला होता. महिलांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी 1890 साली अमेरिकेत मतदान हक्कांसंदर्भात स्थापन झालेली ‘‘द नॅशनल अमेरिकन वुमन सफ्रेज असोसिएशन‘‘ ही संस्था कार्यरत होती. स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी कृष्णवर्णीय तसेच देशांतरीत महिला कामगारांनी त्या काळातील क्रांतिकारी माक्र्सवाद्यांनी केलेल्या सार्वत्रिक मतदानाच्या मागणीला पाठींबा देण्याचे ठरविले.                                               

      आंतराराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद १९०७ साली स्टुटगार्ड येथे भरली. त्या मध्ये कम्युनिस्ट कार्यकर्त्या क्लारा झेटकिन यांनी अशी घोषणा केली की "सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळविण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे." दहा तासांचा दिवस, महिलांना कामाच्या जागी सुरक्षितता, लिंग, मालमत्ता, वर्ण या बरोबरच सर्व स्त्रीयांना मतदानाचा हक्क मिळावा अशा मागण्यांसाठी न्युयाॅर्कमध्ये ८ मार्च१९०८रोजी वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री कामगारांनी रूटगर्स चैकात जमून भव्य आंदोलने केली. क्लारा झेटकिन हयांच्यावर या गोष्टींचा प्रभाव झाला आणि त्यांनी १९१० साली कोपनहेगन येथे झालेल्या दुस-या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत ८ मार्च १९०८ रोजी केलेल्या भव्य आंदोलनाच्या स्मरणार्थ 8 मार्च हा दिवस "जागतिक महिला दिन" म्हणून साजरा करण्यात यावा हा ठराव मांडला आणि तो पास झाला.

      युनोने १९७५ हे वर्ष जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केले आणि त्यानिमित्ताने संयुक्त राष्ट्र संघटनेने ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे ठरविले. भारतामध्ये ८ मार्च १९४३ साली पहिला जागतिक महिला दिन साजरा झाला. 


ESSAY ON WORLDS WOMAN DAY 8 MARCH IN MARATHI


किती सहज, सुंदर, सहनशील,

तु एक अखंड नारी....

तुझ्या हाती सा-या विश्वाच्या

कल्याणाची दोरी.... 

      स्त्री ही देवाची सुंदर निर्मिती आहे. स्त्रीशिवाय जीवनाची कल्पना करणे खुप कठीण आहे. स्त्री हे त्याग, प्रेम, काळजी, गुढता, अश्रु, सौंदर्य व आशिर्वाद यांचा मिलाफ आहे. ती एक आई, मुलगी, बहीण, पत्नी, मैत्रीण या नात्यांमध्ये सामावलेली आहे. तिच्यामुळेच जीवनात रंग आहेत. स्त्रीचे जीवन म्हणजेच एक पुस्तक आहे. तिची व्याख्या ही शब्दांत करता येत नाही. जगातील प्रत्येक महिला हे आपले जीवन आपल्या कुटंुबासाठी व्यतित करत असते. आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी ती अहोरात्र काम करत असते. आपले सर्व आयुष्य हे ती कुठल्याही फळाची अपेक्षा न करता इतरांसाठी घालविते. स्त्री हे आदिशक्तीचे रूप आहे. जर तिने एखादी गोष्ट करायची ठरविली तर तिला कोणी अडवू शकत नाही. जर परिवारावर कोणतेही संकट आले तर सर्व निभावून नेते. 

जिच्या हाती पाळण्याची दोरी । ती जगाला उद्धारी

ऐसी वर्णिली मातेची थोरवी । शेकडो गुरूनिही

मातेच्या स्वभावे पुत्राची घडण । त्यास उज्वल ठेवी तिचे वर्तन

स्त्रियाच्या तेजावरीच पुरूषाचे मोठेपण । ऐसे आहे. 

      म्हणजेच ज्या स्त्रीच्या हाती पाळण्याची दोरी आहे. तीच जगाची उद्धारकर्ती आहे. जसा आईचा स्वभाव असतो तशीच पुत्राची घडण होते. त्यामुळे स्त्रीचा नेहमीच आदर केला पाहिजे. स्त्रीला दुय्यम समजण्यापेक्षा तिला तिचे स्थान द्या. स्त्रीच्या तेजामुळेच पुरूषाचा मोठेपणा सिद्ध होतो.

जागतिक महिला दिन का साजरा केला जातो 

      हा महिलांना त्यांच्या योग्यतेची जाणीव करून देणे तसेच त्यांच्यातील क्षमतेला प्रोस्ताहित करण्यासाठी साजरा केला जातो. वुमन डे साजरा करणे म्हणजे स्त्रीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे होय. या दिवशी महिलांच्या व्यवस्थापना, धैर्य, सामथ्र्याचे कौतुक केले जाते. महिलांच्या सक्षमीकरणाच्या मुद्दयांकडे लक्ष दिले जावे हा त्यामागील उद्देश असतो. या दिवशी स्त्रियांना त्यांच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल पुरस्कार दिला जातो तसेच त्यांचा सन्मान केला जातो.

      महिलांमध्ये अपार शक्ती आणि क्षमता आहे. जगात स्त्रियांनी सर्वच क्षेत्रात किर्ती स्थापित केली आहे. त्यांच्यातील अद्भूत साहस, अथक परिश्रम तसेच बुद्धीमतेच्या जोरावर त्यांनी जगात आपली ओळख निर्माण केली आहे. आता सर्वच क्षेत्रात महिला सशक्त होत आहेत. 

भारतीय किर्तीमान स्त्रियांची ओळख 

1) स्वराज्यजननी जिजामाता - यांनी स्वराज्य निर्मितीचे स्वप्न उराशी बाळगले आणि स्वराज्य निर्मितचे धडे छत्रपती शिवाजी महाराजांना दिले आणि स्वराज्याची निर्मिती केली.

2) डाॅ. आनंदीबाई जोशी - भारतातील पहिल्या महिला डाॅक्टर आहेत.

3) सावित्रीबाई फुले - महिलांना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन त्यांनी दिले. तसेच महिलांच्या शिक्षणासाठी त्या अहोरात्र झटल्या. त्यांना भारतातील पहिल्या शिक्षिका म्हणून सन्मान मिळाला.

4) मदर टेरेसा - त्यांनी सामाजिक कार्याला आपले जीवन वाहून घेतले. नोबेल पुरस्कार जिंकणा-या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत.

5) किरण बेदी - भारतीय पोलिस दलात आय.पी.एस अधिकारी म्हणून त्यांनी काम केले. तसेच संयुक्त राष्ट्रांच्या सिव्हील पोलिस सल्लागार नियुक्त झालेल्या त्या पहिल्या महिला झाल्या.

5)न्यायमुर्ती एम. फातिमा बीवी - भारतीय सर्वोच्च न्यायालयात पहिल्या महिला न्यायाधीश म्हणून नियुक्त झाल्या

6)कल्पना चावला - अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला आहेत. त्यांनी मिशन स्पेशालिस्ट आणि प्रायमरी रोबोटिक आर्म ऑपरेटर म्हणून स्पेस शटलवर अंतराळात काम करण्यास गेल्या होत्या.

7) मेरी क्युरी - यांनी रेडीअमचा शोध लावला. त्या भौतिक आणि रसायनशास्त्रात विख्यात होत्या. त्यांना भौतिक आणि रसायनशास्त्रात नोबेल पुरस्कार प्राप्त झालेल्या पहिल्या महिला शास्त्रज्ञ आहेत. 

      हया सर्व महिलांव्यतिरिक्त आणखी महान महिला आहेत ज्या आपआपल्या परीने आपल्या देशात महान कार्य करून किर्तीमान स्थापित करत आहेत. तसेच अनेक स्त्रिया हया आपआपल्या क्षेत्रांमध्ये नावलौकिक मिळवत आहेत. अशा सर्व महिलांच्या कार्याला मानाचा मुजरा आणि लाख लाख सलाम...

💃@ANU SWAPN BLOG

  • Share This:  
Email ThisBlogThis!Share to XShare to Facebook
Newer Post Older Post Home

1 comment:

  1. SwapnilMarch 7, 2021 at 8:23 PM

    👍 खूप छान

    ReplyDelete
    Replies
      Reply
Add comment
Load more...

Popular Posts

  • FARMER POEM एका शेतकऱ्याचे मनोगत
  • Sad love quote / विरह
  • BEST BLOGGING NICHE 2021
  • # मधुमिता - एक भयकथा - अंतिम भाग# - horror stories in marathi
ANU SWAPN BLOG

Translate

Categories

  • article
  • International women's day 2021
  • Love Quotes in Marathi
  • poem
  • Quote
  • Tech & Educational

Blog Archive

  • May 2022 (1)
  • March 2022 (1)
  • April 2021 (1)
  • March 2021 (3)
  • February 2021 (1)
  • November 2020 (1)
  • September 2020 (5)
  • August 2020 (5)
  • July 2020 (5)
  • June 2020 (2)
  • May 2020 (8)
  • April 2020 (3)

Anu Swapn blog

This blog is created for only entertainment and knowledge purpose.
Disclaimer | Contact us | Privacy Policy | Terms of us

Copyright © ANU SWAPN BLOG | Powered by Blogger