ANU SWAPN BLOG
  • Home
  • Home
  • Articles
  • Poems
  • Image Quotes
  • Tech and Educational
  • About Us

# मधुमिता - एक भयकथा - भाग 5# - horror stories in marathi

 August 08, 2020     article     1 comment   


Anu Swapn Blog

मधुमिता - एक भयकथा - भाग 5


horror stories in marathi

मधुमिता भाग १ साठी खालील लिंकवर क्लिक करा 👇
 https://anuswap.blogspot.com/2020/07/MADHUMITA-PART1.html

मधुमिता भाग २ साठी खालील लिंकवर क्लिक करा 👇  
https://anuswap.blogspot.com/2020/07/Madhumita-Part2.html

मधुमिता भाग 3 साठी खालील लिंकवर क्लिक करा 👇  
https://anuswap.blogspot.com/2020/07/Madhumita-HorrorStory-Part3.html

मधुमिता भाग 4 साठी खालील लिंकवर क्लिक करा 👇  
https://anuswap.blogspot.com/2020/08/Madhumita-horror-stories-in-marathi-part4.html


click below link image for buying this amazing products

अविनाशने परत अदवैत्यला प्लँचेट खेळायला चालू करायला सांगितलं.... परत सर्वांनी ग्लासवर बोट ठेवले.... परत विझलेल्या मेणबत्त्या पेटवल्या.... 

अदवैत्य म्हणाला, " आमच्या आजूबाजूला कोणी आत्मा असेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा... आम्हाला तुमचे नाव काय आहे ते सांगा ???"

आता परत ग्लास हलायला चालू झाला आणि तो "येस" पाशी येऊन थांबला... 

अविनाश म्हणाला, " तुमचे नाव आम्हाला सांगा... मला तुमचा चेहरा पहिल्यासारखा वाटतो...."

परत ग्लास हलू लागला पहिल्यांदा तो "m" अक्षरावर गेला.... परत "a", "d", "h", "u", "m", "i", "t" आणि शेवटी तो "a" वर येऊन थांबला.... सर्वांनी त्या अक्षरांची जुळवाजुळव केली आणि शेवटी त्यातून एक शब्द तयार झाला तो म्हणजे "madhumita" आणि मग मात्र अविनाशला कळाले कि तो आत्मा दुसरा तिसरा कोणी नसून मधुमिता ताईचा आहे.... त्याला धक्काच बसला.... अशी कशी मधुमिता ताई आपल्याला सोडून गेली.... 

जगदीशने अविनाशला विचारले, " तू मधुमिताला ओळखतॊस???"

अविनाश म्हणाला, " हो मी ओळखतो... मनोहर काकांची भाची आहे ती.... लहानपणी मी इकडे सुट्टीला यायचो तेव्हा मधुमिता ताईहि यायची, आम्ही एकत्रच खेळायचो.... ती मला आंबे आवडतात म्हणून दरवर्षी तिकडे शहरात पाठवून द्यायची.... मला माझ्या मोठ्या बहिणीसारखीच होती...." आणि अविनाशच्या डोळ्यातून अश्रू आले.... असे कसे झाले... त्याला आता हा प्रश्न शांत बसू देत नव्हता.... मनोहर काका तर म्हणत होते कि एक महिन्याभरापूर्वीच ती इथे आली होती तिच्या नवऱ्यासोबत आणि आता हे मी काय बघतोय तेच कळेना... 

अविनाशने अदवैत्यला विचारले, " आपण तिला प्रत्यक्ष बोलावून माझ्या मनातल्या प्रश्नांचा गुंता सोडवू शकतो का??"

अदवैत्य म्हणाला, " मी तुम्हाला आधीच सांगितले आहे कि, मी आत्मा बोलावू शकतो पण घालवू शकत नाही... आणि एकदा आत्म्याने आपल्याला त्याची ईच्छा बोलावून दाखवली कि, ती अपूर्ण ईच्छा पूर्ण केल्याशिवाय तो जात नाही... आता मी मंतरलेले पाणी टाकून एकदा तिला घालवला आहे... पण आता माझ्याकडील तेही पाणी संपलय... हे पुन्हा चेहरा दाखवायला सांगणं म्हणजे आपल्यासाठी रिस्की आहे... बघ बाबा काय करायचं ते.... 

सीमा म्हणाली, " ती अविनाशच्या बहिणीसारखी आहे आणि आपल्याला काही नाही करणार.... आणि तिच्यासोबत काय घडलय ते आपल्याला कळायलाच हवं..."

अदवैत्य म्हणाला, " ठीक आहे, मी बोलावतो तिला पण घाबरून कुणीही हात काढू नका ग्लासवरचा आणि त्या कुंकवाच्या रिंगणाबाहेरही जाऊ नका... "

परत अदवैत्य म्हणाला, " मधुमिताताई आम्हाला आपल्यासोबत काय घडलय ते सांगा... आम्हाला तुमचा चेहरा दाखवा... "

असे म्हटल्यानंतर लगेच परत खिडक्या उघडझाप करू लागल्या.... मोठमोठ्याने हसण्याचा आवाज येऊ लागला ... आत्मा म्हणू लागला का उठवलं मला परत गाढ झोपेतून.... आता मी माझी इच्छा तुम्ही पूर्ण केल्याशिवाय परत नाही जाऊ शकत.... माझा चेहरा दाखवायला तो व्यवस्थित असायला तरी हवा ना.... 

अविनाश म्हणाला, "असू दे आम्हाला तो पाहायचा आहे आणि तुझ्यासोबत काय घडलं आहे तेही ऐकायचं आहे"

मधुमिताचा आत्मा म्हणाला, " ठीक आहे, मी माझा चेहरा दाखवते...."

आणि इतक्यात प्लँचेट च्या मधोमध एक आकृती तयार झाली.... केस पूर्णतः जळालेले.... अर्धा चेहऱ्यावर मांस नव्हते.... अर्धे अंग भाजले होते... अंगावर नेसलेली साडी जळून अंगाला पूर्णपणे चिकटली होती.... इतके विद्रुप शरीर पाहून सर्वांचा थरकाप उडाला....  

मधुमिताचा आत्मा  म्हणाला , " अविनाश पाहिलास त्या लोकांनी माझे काय हाल केले आहेत ते... "

अविनाश म्हणाला,  "मधुमिता ताई काय घडलाय तुझ्यासोबत ते आम्हाला सांगशील काय??? आम्ही तुझी ईच्छा पूर्ण करण्यासाठी सर्व तोपरी प्रयत्न करू"

मधुमिताचा आत्मा सांगू लागला, " तर मग ऐक, तीन वर्षांपूर्वी मी एक कोर्स करण्यासाठी शहरात गेले होते... मला लहानमुलांची आणि सोशल वर्किंगची आवड असल्यामुळे अनाथ आश्रमात दर रविवारी जायचे... तिथे मला सुभाष नावाचा मुलगा भेटला... पत्रकार होता, स्वभावाने चांगला होता... तो एक अनाथ मुलगा होता... त्याला जन्मल्याजन्मल्याचं अनथालयाच्या पायरीवर त्याचे आई बाबा टाकून गेले होते...  आमची पहिल्यांदा चांगली मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचे प्रेमात कधी रूपांतर झाले हेच कळले नाही.... त्यानंतर जेव्हा मी शिक्षण पूर्ण करून घरी आले तेव्हा माझं लग्न करायचा विचार घरातले लोक करत होते... त्यांनी मला दोन तीन मुलंही बघून ठेवली होती.... मी हे सुभाषला फोन करून कळवले... सुभाष म्हणाला मी येऊन तुमच्या घरच्यांकडे तुझा हात मागतो.... तो इथे माझा हात मागायला आला...पण तो अनाथ असल्यामुळे आमच्या घरातल्यांनी त्याला नाकारले...  मग तो नको म्हणत असतानाही मी पळून जावून सुभाषबरोबर लग्न केले... यामध्ये मनोहर मामांनी आम्हाला मदत केली... त्यामुळे त्याच्याशी आमच्या आईने नाते तोडून टाकले.... 

आमच्या घरातल्यांनी आम्हाला घरात घेतलेच नाही.... मग आम्ही शहरात राहू लागलो तिथेच भाड्याने घर घेतले आणि आमचा संसार चालू झाला.... सर्व छान चालू होते पण लग्न होऊन तीन वर्ष झाली तरी मुलबाळ नव्हते.... सुभाषला लहान मुलांची खूप आवड होती.... पण एके दिवशी मला मी प्रेग्नन्ट असल्याचं कळलं आणि मला त्यावेळी अडीच महिने होऊन गेले होते... मग मी असे ठरवले कि मनोहर मामा आणि सुभाषला एकदम सरप्राइझ द्यायचे होते .... 

म्हणून मी त्याला घेऊन इकडे गावाकडे आले... मनोहर मामा दोन दिवस जरा शहरात जाणार होते... मग त्यांनी आम्हाला तुमच्या गेस्ट हाऊसची किल्ली दिली आणि ते शहरात निघून गेले.... फार्महाऊसमध्ये सर्व सोयी असल्यामुळे आम्हाला बाकी काही चिंता नव्हती.... सुभाष एक पत्रकार असल्याने त्याला गावातून मुली गायब होतात हे माहिती होत आणि त्या प्रकरणाचा शोध घ्यायच्या निमित्तानं का होईना त्याने आपला कॅमेरा सोबत घेतला होता.... मग आम्ही फार्महाऊसकडे गेलो... मनोहर मामाने आम्हाला आधीच सांगितले होते कि विजू काका रात्री तिथे झोपायला असतो... आणि तुम्ही गेस्ट हाऊस मध्येच राहा आणि शक्यतो त्याला दिसू नका... नाहीतर तुम्ही आल्याचं तो गावात सांगेल... त्यावेळी रात्री साधारण बारा साडेबाराच्या दरम्यान आम्ही गेस्ट हाऊसमध्ये झोपेत होतो आणि इतक्यात आम्हाला तुमच्या फार्महाऊसमध्ये मोठमोठ्याने हसण्याचे आवाज येऊ लागले.... आणि साधारण मुली रडत आहेत असे ऐकू आले.... मी हळूच सुभाषला उठवले आणि त्याला सांगितले कि फार्महाऊसेमध्ये काहीतरी गडबड चालू आहे.... 

क्रमश..... 

लेखिका - सौ. अनुष्का हणमसागर 
© Anu Swapn Blog
 

पुढे काय घडले हे वाचण्यासाठी मधुमिता - एक भयकथा - भाग 6 साठी कंमेंट करा... लाईक करा...

(टीप - वरील लेखाचे सर्व अधिकार हे लेखिकेकडे अबाधित आहेत.... जर कोणी हे लिखाण आपल्या लेखनात जसेच्या तसे वापरले तर कॉपी राईट होऊ शकते.... वरील लेखन हे कोणतीही अंधश्रद्धा पसरविण्यासाठी केले नाही... हि एक मनोरंजन कथा आहे... जरी लेखन शेअर करावयाचे असल्यास वेबसाईट लिंक सहित शेअर करावेत... ह्यातील व्यक्ती आणि कथा काल्पनिक आहेत आणि जरी ह्या कोणाच्या आयुष्याशी मिळत्या जुळत्या असतील तर तो केवळ योगायोग समजावा... धन्यवाद)







  • Share This:  
Email ThisBlogThis!Share to XShare to Facebook
Newer Post Older Post Home

1 comment:

  1. SwapnilAugust 9, 2020 at 8:08 PM

    खुप छान

    ReplyDelete
    Replies
      Reply
Add comment
Load more...

Popular Posts

  • FARMER POEM एका शेतकऱ्याचे मनोगत
  • Sad love quote / विरह
  • BEST BLOGGING NICHE 2021
  • # मधुमिता - एक भयकथा - अंतिम भाग# - horror stories in marathi
ANU SWAPN BLOG

Translate

Categories

  • article
  • International women's day 2021
  • Love Quotes in Marathi
  • poem
  • Quote
  • Tech & Educational

Blog Archive

  • May 2022 (1)
  • March 2022 (1)
  • April 2021 (1)
  • March 2021 (3)
  • February 2021 (1)
  • November 2020 (1)
  • September 2020 (5)
  • August 2020 (5)
  • July 2020 (5)
  • June 2020 (2)
  • May 2020 (8)
  • April 2020 (3)

Anu Swapn blog

This blog is created for only entertainment and knowledge purpose.
Disclaimer | Contact us | Privacy Policy | Terms of us

Copyright © ANU SWAPN BLOG | Powered by Blogger