ANU SWAPN BLOG
  • Home
  • Home
  • Articles
  • Poems
  • Image Quotes
  • Tech and Educational
  • About Us

Best Love Status Quotes for facebook, Instagram, Whatsapp, DP, Valentine Day Quotes

 April 11, 2021     Love Quotes in Marathi, poem, Quote     1 comment   

Best Love Status Quotes | Love Shayari | Romantic Quotes | Whatapp Status Quotes |

Love Quotes in Marathi
Love Status Quotes in Marathi


जीवनात आपल्याला आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही आपल्यासाठी सर्वोत्कृष्ठ love quotes in Marathi घेवून आलो आहोत. तुम्ही तुमच्या भावना आपल्या प्रिय व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी हे love quotes चा वापर करू शकता. तसेच आपण याद्वारे आपल्या प्रियजनांपर्यंत आपले सुख दुःख पोहचवू शकता. आपण हया ब्लॉगमध्ये Inspirational Quotes, Life Quotes, Motivational Quotes, Love quotes in Marathi, Love quotes collection in Marathi, Romantic Quotes in Marathi, Love Quotes for Wife, Love Quotes for Husband, Love Quotes for Girlfriend, Love Quotes for Boyfriend, Love Quotes Status for Whatsapp, Love Quotes Status for Instagram & Instareels, Love Quotes Status for Facebook, Emotional Love Quotes in Marathi, Prem Kavita , Heart Touching love Status, Marathi Love Status, Romantic Love Status in Marathi, Marathi Sad Love Status, Love Status for boys, Marathi status for love Life, Marathi love romantic shayari, latest love status in Marathi या सर्वांचाही आनंद घेवू शकता.


Love Quotes in Marathi
Love Quotes in Marathi 


Love quotes in Marathi | Love quotes collection in Marathi | Prem Kavita | Love Quotes Status for Whatsapp | Love Quotes Status for Instagram | Love Quotes Status for Facebook


मनातल सांगण्यासाठी शब्दांना

ओठांपर्यंत यावं लागतं...

शब्दांवाचुनी प्रेम कळायला

मनाचा सोबती व्हावं लागत...

 💖💖💖💖💖💖


माझ आयुष्याचा सुरूवात ही

तुझ्यापासुनच चालु होते आणि

तुझ्यापाशीच संपते

  💖💖💖💖💖💖


तुझ्या प्रेमाच्या सरींमध्ये,

भिजूनी घ्यावसं वाटलं...

तु सतत सोबत असावीस,

असं आभाळ मनात दाटलं...

  💖💖💖💖💖💖


अधिर जीव वेडा

तुझ्यात गुंतला...

प्रेमाचा खेळ नवा

माझ्या मनी रंगला...

 💖💖💖💖💖💖


Love Quotes for Girlfriend
Love Quotes for Girlfriend
 

Romantic Quotes in Marathi | Love Quotes for Girlfriend | Love Quotes for Wife | Love Quotes Status for Whatsapp | Love Quotes Status for Instagram | Love Quotes Status for Facebook

 

तिच्या अलवार शब्दांनी माझी

सुंदर कविता सजली...

कवितेचे गीत बहरूनी आले,

गीतांचे सुर सांगूनी गेली...

 💖💖💖💖💖💖

 

वा-यावरती भिरभिरणारी

तु स्वच्छंद अशी फुलराणी...

माझ्या जीवन कादंबरीतील,

तु एक सुंदर प्रेम कहानी...

  💖💖💖💖💖💖


पाहूनी नशीले डोळे तुझे

झालो मी बेधूंद...

तुझ्या प्रितीचा मला

लागला छंद...

  💖💖💖💖💖💖


घायाळ केलं दिलाला माझ्या,

तुझ्या नजरेच्या बाणाने...

वेडया मनाला समजावूनी सांग

जरा लाडीक प्रेमाने...

 💖💖💖💖💖💖

 

आज चांदण्यांनाही

नभातुन खाली उतरूनी

यावेसे वाटले...

तुझे शृंगारीक रूप

त्यांनाही चंद्रापरी भासले...

  💖💖💖💖💖💖


माझ्या मनातील तुझी जागा

कोणीच घेवू शकत नाही...

कसा समजावू तूला

मी आता कुणाचाच होवू शकत नाही...

  💖💖💖💖💖💖


कधीतरी तु दिसावीस,

असे मनाला वाटले...

तुझ्या प्रेमाच्या आठवणींचे

काहूर मनात दाटले...

  💖💖💖💖💖💖


या अधिर मनाला,

कितीही समजावलं तरी समजत नाही...

का माहिती माझे प्रेम,

तुला अजूनही उमगत नाही...

  💖💖💖💖💖💖


नदीच्या किनारी तुझी

वाट पाहत थांबायचयं...

प्रेमाची आस होवून

तुझ्या गाली खुलायचयं...

उनाड पाऊस होवून,

तुझ्या प्रेमात कोसळायचयं...

आयुष्याच्या प्रत्येक क्षणांमध्ये

 💖💖💖💖💖💖


Love Status for Whatapp
Love Quotes Status for Whatsapp


Love Quotes for Husband | Love Quotes for Boyfriend | Love Status for boys | Love Quotes Status for Whatsapp | Love Quotes Status for Instagram | Love Quotes Status for Facebook

 

निलवर्ण नभातून चंद्रही

खाली उतरूनी आला...

तुझ्या प्रितीचे चांदणे

माझ्या मनात शिंपूनी गेला...

 💖💖💖💖💖💖

 

कृष्णाच्या बासुरीतून

प्रेमाची धून आली...

साद ऐकुनी त्याची

राधा बावरी झाली...

 💖💖💖💖💖💖

 

तुच माझा शब्द,

तुच माझा श्वास...

जीवनातील प्रत्येक

वळणावरती तुच

माझ्यासाठी खास...

 💖💖💖💖💖💖

 

अधिर मनातून वाहणारा

तु बेधुंद वारा...

तुझ्या प्रेमात भिजूनी

गेला हा आसमंत सारा...

 💖💖💖💖💖💖


 

Emotional Love Quotes in Marathi
Emotional Love Quotes in Marathi

Emotional Love Quotes in Marathi | Heart Touching love Status | Marathi Sad Love Status | Marathi Love Status |


तुझी स्वप्न अजूनही पडतात

मला अधूनमधून...

आठवणी दाटून येतात

माझ्या मनात संधी साधून...

 💖💖💖💖💖💖

 

ओल्या सांजवेळी मन

आठवांशी बिलगले...

किती सांगू या स्पंदनांना

श्वास तुझ्यात विरघळले...

 💖💖💖💖💖💖

 

एकदा पाऊसाला वाटलं की,

तुझ्या आठवणींची सर होवून बरसावं...

पण पाऊसाला काय माहित होत की,

तुझ्या आठवणींनीही माझी साथ

कधीच सोडली आहे..

 💖💖💖💖💖💖

 

तु विसरला असशील

पण मी नाही विसरले...

आपल्यातले प्रेम फक्त

आठवणींपुरते उरले...

 💖💖💖💖💖💖

 

तुझे रूसणे, फुगणे

मला आजही आठवते...

तुझ्या प्रितीच्या क्षणांचे

पाणी डोळयांत साठवते...

 💖💖💖💖💖💖

 

नजरेतूनी ओघळणारा प्रत्येक थेंब

तुझ्या आठवणींची साक्ष देत आहे...

कधीतरी भेटशील पून्हा नव्याने

असा मला आजही विश्वास आहे...

 💖💖💖💖💖💖

 

तुझ्या भेटीचा प्रत्येक क्षण

मला आजही आठवतो...

दुराव्याचे भाव सारे माझ्या

मनात साठवतो...

 💖💖💖💖💖💖

 

व्याकुळ माझ्या मनाला,

समजावयाला तुझी साद आली...

तुझ्या आठवणींनी,

माझी ओंजळ भरूनी गेली...

  💖💖💖💖💖💖


सुनीच मैफिल माझी,

रितेच शब्द राहिले...

सोबतीला सूर नाही,

पण प्रेम तुला वाहिले...

💖💖💖💖

 

Romantic Love Status in Marathi
Romantic Love status in Marathi

Romantic Love Status in Marathi | Marathi status for love Life | Marathi love romantic shayari | latest love status in Marathi


पुनवेचा चंद्रही आज

लाजूनी चूर झाला...

लाली आली गालावरती

मिलनाचा क्षण आला...

 💖💖💖💖💖💖

 

तुझ्याशी बोलण्यातही

एक वेगळीच मजा आहे...

तुझ्या नजरेत कैद होऊन जाणे

ही एक सुंदर सजा आहे...

 💖💖💖💖💖💖

 

तुझ्या माझ्या प्रितीला,

असावा सुगंध मातीचा...

असाच दरवळत राहो,

विश्वास तुझ्या साथीचा...

 💖💖💖💖💖💖

 

भावनांच्या सागरावरील,

प्रितीचा वाराही स्तब्ध आहे...

क्षितीजावरचा सुर्यही,

आपल्या प्रेमाची साक्ष देत आहे...

 💖💖💖💖💖💖

 

माझ्या सोबतीला आणि काय हवं...

पापण्यांच्या किना-याला

तुझ्या प्रितीचा गावं नवं...

हृदयात श्वासापरी तु एकरूप व्हावं...

 💖💖💖💖💖💖

 

आपल्यात कधी न संपणार

प्रेमाच नातं असावं...

सुखी संसाराचा स्वप्न,

माझ्या मनी वसावं...

 💖💖💖💖💖💖

 

माझ्या मनाच्या गाभा-यात,

तुझ्या प्रितीचा दीप तेवत आहे...

प्रेमाच गीत सारे,

वाराही गात आहे...

 💖💖💖💖💖💖

 

तु मला पाहिलं, मी तुला पाहिलं

आपल्याला पाहून, नाजुकसं फुलही हसलं

इतक्यात विरहाच वादळ आलं

क्षणात सारं स्वप्न विरूनी गेल

ते नाजुकसं फुलही सूकूनी गेल

तु मला सोडूनी गेलीस

आणि माझ्या डोळयातलं

प्रेम डोळयातच राहिलं.

 💖💖💖💖💖💖

 

ओल्या पापण्यांच्या कवेत

तु मला घेशील का?

ऐकुनी आर्त साद माझी

तु येशील का?

माझ्या मनातील आठवणींचे पाणी

डोळयांमध्ये भरशील का?

सोबत घालवलेल्या क्षणांची आठवण

तु ठेवशील का?

ओठांत राहिलेल्या शब्दांचा

आवाज तु होशील का?

माझ्या जीवनाचा सोबती व्हायला

तु परत येशील का?

 💖💖💖💖💖💖

 

तुझ्या आठवणींची सोबत घेवूनी

तुझ्याचसाठी जगतो आहे...

तुझ्या अस्तित्वांच्या भासांत,

प्रेमाची गोडी अनुभवतो आहे...

 💖💖💖💖💖💖

 

तुझ्या माझ्या प्रितीला,

पारिजातकाचा दरवळ असावा...

माझ्या हृदयातील श्वास तुझा,

अमृतापरी भासावा...

 💖💖💖💖💖💖

 

वाट पाहणारी पुनवेची

जशी चंद्राची चकोर असते...

तसे मन माझे तुला

भेटण्यासाठी आतूर असते...

 💖💖💖💖💖💖

 

तुझ्या डोळयातील आसवांचे

मी मोतीच व्हावं...

तुझ्या प्रेमळ पावसांच्या,

सरीत मी भिजूनी जावं...

 💖💖💖💖💖💖

 

माझ्या हृदयाला तुझ्या

श्वासाची साथ हवी...

दोघे मिळूनी लिहूया

प्रेमाची कहानी नवी...

 💖💖💖💖💖💖

 

घन आले ओथंबूनी

त्यात मन गेले चिंब भिजूनी

घन बरसला सुखाचा

त्यात ऋतु आगळा प्रेमाचा

 💖💖💖💖💖💖


आवडल्यास नक्कीच लायक करा, कंमेंट करा आणि शेअर करा.... 

Credit : Google Chrome

Picture Credit : www.Pixabay.com


@Anu Swapn Blog

@Allquoteinmarathi

 

 

 


  • Share This:  
Email ThisBlogThis!Share to XShare to Facebook
Newer Post Older Post Home

1 comment:

  1. UnknownApril 13, 2021 at 5:38 PM

    Super👌🏻👌🏻👌🏻, best ever

    ReplyDelete
    Replies
      Reply
Add comment
Load more...

Popular Posts

  • FARMER POEM एका शेतकऱ्याचे मनोगत
  • Sad love quote / विरह
  • BEST BLOGGING NICHE 2021
  • # मधुमिता - एक भयकथा - अंतिम भाग# - horror stories in marathi
ANU SWAPN BLOG

Translate

Categories

  • article
  • International women's day 2021
  • Love Quotes in Marathi
  • poem
  • Quote
  • Tech & Educational

Blog Archive

  • May 2022 (1)
  • March 2022 (1)
  • April 2021 (1)
  • March 2021 (3)
  • February 2021 (1)
  • November 2020 (1)
  • September 2020 (5)
  • August 2020 (5)
  • July 2020 (5)
  • June 2020 (2)
  • May 2020 (8)
  • April 2020 (3)

Anu Swapn blog

This blog is created for only entertainment and knowledge purpose.
Disclaimer | Contact us | Privacy Policy | Terms of us

Copyright © ANU SWAPN BLOG | Powered by Blogger