ठरल्याप्रमाणे सर्वजण पुढील प्लॅनच्या तयारीला लागले.... रात्री अदवैत्यने परत प्लँचेट चा डाव मांडला पोलीस इन्स्पेक्टर संजय यांना हा सर्व प्रसंग खरा आहे दाखवण्याची हि एकच संधी होती... अदवैत्यने सर्व वस्तू आणल्या... पूर्वी तयार केलेलं प्लँचेट बोर्ड तसाच होता.... त्याने संजयना नियम समजावून सांगितले.... अदवैत्यने मेणबत्त्या लावल्या... अविनाशने लाईटस घालवल्या आणि सर्वजन पुन्हा कुंकवाने काढलेल्या घेऱ्यात बसले.... सर्वांनी काचेच्या ग्लासवर बोट ठेवले....
परत त्याने मधुमिताला बोलवायला चालू केले.... "मधुमिता तू आजूबाजूला असशील तर तुझ्या अस्तित्वाची आम्हाला झलक दाखव...." असे दोन तीन वेळा म्हणून दाखवले.... पण काहीच प्रतिसाद मिळत नव्हता.... अद्वैतचे लक्ष हे संजयने हातात घातलेल्या अंगठीकडे गेले... त्या अंगठीत ओम अक्षर कोरले होते आणि त्यामुळेच त्यांना काहीच प्रतिसाद मिळत नव्हता... त्याने संजयला अंगठी काढायला सांगितले आणि ती कुंकवाच्या घेऱ्याच्या बाहेर फेकायला सांगितली... संजयने सांगितल्याप्रमाणे अंगठी बाहेर काढून फेकली.... परत अदवैत्यने प्लँचेट खेळायला चालू केले आणि ग्लास पुढे सरकू लागला आधी संजयला वाटले कि हे सर्व अदवैत्यच करत आहे... पण त्याने निरखून पहिले तर तो कोणताही जोर त्या ग्लासवर लावत नव्हता.... तो ग्लास आपोआपच पुढे सरकत होता.... आणि पुन्हा तो "येस" पाशी जाऊन थांबला... संजयला हे नवीनच होते... त्यामुळे त्याचा अविनाशच्या गोष्टीवर हळूहळू विश्वास बसू लागला होता....
Click below Link for getting related products
अदवैत्य पुढे म्हणाला, " मधुमिता काहीतरी करून दाखव कि संजय साहेबांचा ह्या गोष्टीवर विश्वास बसेल..."
इतक्यात अचानकच बाहेर कोल्ह्याची कोल्हेकुई चालू झाली... घरातील कपाटांची दारे आपोआपच उघडझाप होऊ लागली.... खुर्च्या, टेबलांनी आपोआपच जागा सोडली.... घड्याळ्यामधे अचानकच बेल वाजू लागली आणि संजयला कोणीतरी रडायला लागलाय असा विहिरीकडून आवाज येऊ लागला.... तो उठत असताना अदवैत्यने त्यांना सांगितले कि ग्लासवरचा हात काढू नका... मी तुमची तिच्याशी भेट करून देतो.... आता मात्र संजय थोडाफार का असेना घाबरला होता....
अदवैत्य म्हणाला, " मधुमिता तुझ्या मनातील सर्व गोष्टी संजय साहेबांना समजावून सांग.... आणि ते आपल्याला मदत करण्यासाठी इथे आले आहेत... त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेव.... त्यांच्याशी बोल.... "
इतक्यात पुन्हा मधुमीताच अक्राविक्राळ रूप त्यांच्या समोर आलं... ते रूप बघून संजय पुरताच हादरला... त्याला समजलं कि हिला कोणत्या प्रकारे हाल हाल करून मारले असेल ते.... त्याने तिला प्रश्न विचारायला सुरुवात केली...
संजय मधुमिताला म्हणाला, " तुम्ही जेव्हा खिडकीतून आत पाहत होता तेव्हा तिथे काय काय चालले होते???"
मधुमिता म्हणाली कि, " साहेब आम्ही गेस्ट हाऊस मध्ये होतो तेव्हा आम्हाला मुलींच्या रडण्याचे आवाज येऊ लागले होते... म्हणून आम्ही फार्महाऊसकडे आलो... आतमध्ये तीन मुली होत्या त्यांना बांधले होते आणि त्या सोडविण्यासाठी याचना करत होत्या.... आतमध्ये साधारण पाच ते सहा गुंड होते आणि त्यांचा म्होरक्या विजू तिथं बसला होता.... त्या मुलींना शहरात नेऊन विकायची चर्चा त्यांच्यात चालली होती आणि त्यांना विकण्यासाठी तो दुसऱ्या दिवशीच निघणार होता... आम्ही हे सर्व आमच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड केले होते.... तोपर्यंत त्यातील एकाने आम्हाला पहिले व आम्ही पळू लागलो आणि आम्ही पळत असतानाच मी पडले... तो कॅमेरा माझ्या हातातून सुटून कुठेतरी पडला किंवा त्यांनी उचलला त्यामुळे मला तुम्हाला आता पुरावे म्हणून दाखवायला काहीच उरले नाही.... बाकी अविनाशने तुम्हाला माझी आणि माझ्या नवऱ्याची हत्या कशी केली हे सांगितलेच असेल.... आता त्यांना शिक्षा देऊन आमच्या आत्म्यांना ह्या निर्दयी दुनियेतून मुक्त करावं हीच माझी इच्छा आहे... "
संजयने मधुमिताचे सर्व बोलणे ऐकून घेतले.... त्यांनी तिला कॅमेरा सापडल्याचे सांगितलं... पण तो बंद पडला आहे... तो दुरुस्त होतोय का हे पाहण्यासाठी जगदीश शहरात गेला आहे... तो दुरुस्त होईपर्यंत माझ्या डोक्यात एक आयडिया आली आहे त्याप्रमाणे जर आपण सर्वांनी काम केले तर नक्कीच गुन्हेगारांना सजा मिळायला वेळ नाही लागणार... या सर्वांमध्ये मधुमिताची, अविनाशच्या काकांची आणि अदवैत्यच्या बाबांची साथ हवी आहे... आणि आपण विजूकडून सर्व गुन्ह्यांची कबुली करून घेऊच...
मधुमिता म्हणाली, " मी तर कधीपासूनच तयार आहे ह्या सर्वांचा बदला घ्यायला... सांगा मी काय करू शकते... "
संजय म्हणाला, " फक्त तुला रात्रीच हे काम करायचं आहे... आम्ही विजूला इथे कस आणायचे हे पाहतो.... फक्त एकच मागणी आहे कि तू विजूला काही करायचं नाही.... "
मधुमिताने हो म्हंटले.... संजय सर्वांना प्लॅन सांगू लागला... पहिल्यांदा काकांना इथे बोलावून घ्या...
अविनाश संजयला म्हणाला , " अरे पण काकांना बोलावलं कि, आई बाबांना संशय येईल कि.... मला त्यांचा लग्नाचा वाढदिवस हे सर्व सांगून नाही बिघडवायचा.... "
संजय म्हणाला, " आपण काकांना अचानकच गावात जमिनीचं काहीतरी काम निघालय असं सांगून बोलावून घेऊ.... त्यांना हेच वाक्य तुमच्या आई बाबांना सांगायला सांगू..."
घड्याळात तीन वाजले आणि मधुमिताची परत जाण्याची वेळ झाली.... तिने संजयने सांगितलेला सर्व प्लॅन समजून घेतला....
अदवैत्यने तिला घालविण्यासाठी परत प्लँचेट चा डाव खेळला... आणि ती निघून गेली..
त्यानंतर सकाळी अविनाशने काकांना फोन केला कि, " गावात एक पार्टी आली आहे जमिनीच्या संदर्भात आणि तुम्ही या गावाकडे.... "
पोलीस इन्स्पेक्टर संजय यांनी अदवैत्यलाही फोन करून त्याच्या मांत्रिक बाबांना बोलावून घेतले... येताना त्यांना आत्म्याला मोक्ष मिळावा ह्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी आणण्यास सांगितले....
काकाही सकाळी लगेचच गावी येण्यासाठी निघाले आणि दुपारपर्यंत पोहोचले देखील.... त्याचप्रमाणे अदवैत्यचे बाबा देखील त्याच वेळी आले.... सर्वजण फार्महाऊसच्या हॉलमध्ये बसले...
अविनाशला काका म्हणाले, "कुठं आहे पार्टी??? जी जागेसंदर्भात आम्हाला भेटणार होती... आणि अदवैत्यचे बाबा इथे काय करत आहेत???"
पोलीस इन्स्पेक्टर संजय यांनी काकांना आणि अदवैत्यच्या बाबांना घडलेला सर्व प्रकार समजावून सांगितला.... काकांना हे सर्व पटतच नव्हते.... आपला विश्वासू सेक्रेटरी विजू आपल्या नावाखाली हे सर्व वाईट कृत्य करत आहे याच्यावर त्यांना विश्वासच बसत नव्हता...
अविनाशचे काका म्हणाले, " यावर आता काय उपाय आहे???"
पोलीस इन्स्पेक्टर संजय म्हणाले, " काका आम्ही एक खूप छान प्लॅन केला आहे... आणि त्यामध्ये आम्हाला तुमची आणि अदवैत्यच्या बाबांची मदत लागेल.... आपण मधुमिताला सर्वजण मिळून न्याय मिळवून देऊ... गावातील इतर मुली कोठे आहेत हे सुद्धा शोधून काढू.... "
संजय यांनी सर्वांना प्लॅन समजावून सांगितला आणि सर्वजण त्यामध्ये मदत करायला तयार झाले...

Ata last part asel na lvkr liha topn😃😊
ReplyDeleteYes
DeleteWow
ReplyDelete