ANU SWAPN BLOG
  • Home
  • Home
  • Articles
  • Poems
  • Image Quotes
  • Tech and Educational
  • About Us

# मधुमिता - एक भयकथा - भाग 6# - horror stories in marathi

 August 13, 2020     article     2 comments   


Anu Swapn Blog

मधुमिता - एक भयकथा - भाग 6


horror stories in marathi

मधुमिता भाग १ साठी खालील लिंकवर क्लिक करा 👇
 https://anuswap.blogspot.com/2020/07/MADHUMITA-PART1.html

मधुमिता भाग २ साठी खालील लिंकवर क्लिक करा 👇  
https://anuswap.blogspot.com/2020/07/Madhumita-Part2.html

मधुमिता भाग 3 साठी खालील लिंकवर क्लिक करा 👇  
https://anuswap.blogspot.com/2020/07/Madhumita-HorrorStory-Part3.html

मधुमिता भाग 4 साठी खालील लिंकवर क्लिक करा 👇  
https://anuswap.blogspot.com/2020/08/Madhumita-horror-stories-in-marathi-part4.html

मधुमिता भाग 5 साठी खालील लिंकवर क्लिक करा 👇 
https://anuswap.blogspot.com/2020/08/Madhumita-bhag5-horror-stories-in-marathi.html


सुभाषने बरोबर आपला कॅमेरा घेतला.... आम्ही त्या फार्महाऊसच्या जवळ जाऊ लागलो.... आतमध्ये पाच ते सहा गुंड होते, सोबत तुमच्या काकांचा सेक्रेटरी विजूही तिथे होता आणि त्यांनी गावातील तीन ते चार मुलींना पकडून आणून बांधून ठेवले होते.... आम्ही हे सर्व खिडकीतून पाहत होतो... विजू ह्या सर्वांचा म्होरक्या होता... ते त्या मुलींना शहरात कुठेतरी नेऊन विकणार होते.... सुभाषने आपला कॅमेरा काढला आणि सर्व रेकॉर्ड करत होता.... तितक्यात त्यांच्यातल्या कोणीतरी आम्हाला पहिले आणि ते सर्व आमच्या मागे लागले... पळता पळता सुभाषकडील कॅमेरा मी माझ्या हातात घेतला.... पुढे पळत असताना माझा पाय विहिरीजवळच्या एका झाडाच्या मुळात अडकला आणि मी तिथे खाली पडले आणि तो कॅमेरा माझ्या हातातून निसटून कुठेतरी जाऊन पडला.... सुभाषने मागे पहिले तेव्हा मी पडले होते... तरीही मी त्याला जा म्हणत होते... त्याने माझे नाही ऐकले... तो मला उठविण्यासाठी परत आला आणि तिथेच घात झाला.... त्यांनी त्याला पकडले आणि कॅमेराबद्दल विचारायला सुरवात केली... तो हाडाचा पत्रकार होता त्याने शेवटपर्यंत तो कॅमेरा कुठे आहे हे नाही सांगितले आणि त्यांनी त्याला माझ्या डोळ्यासमोर मारले आणि त्याला झऱ्याच्या पलीकडे एका झाडाखाली पुरले.... 

त्यानंतर त्यांनी मला पकडून त्या विजूच्या समोर घेऊन गेले.... त्या विजूने परत मला विचारायला सुरुवात केली कि कॅमेरा कुठे आहे??? मी सांगत होते, " मला माहित नाही, तो अंधारात कुठेतरी पडला..." त्याला ते पटतच नव्हते... 
त्यांच्यातलाच एकजण म्हणाला बॉस जर आपण हिला नाही मारले तर आपले पितळ उघडे पडेल.... आणि कॅमेरा काय आपण सकाळी शोधू.... आता हिला मारनेच योग्य आहे.... 

मी ओरडत होते, " मला मारू नका, माझ्या पोटात एक जीव आहे... कृपा करा मला मारू नका"

पण त्यांनी माझे ऐकले नाही.... त्यातील एकाने माझ्या डोक्यात काहीतरी मारले... मी खाली बेशुद्ध पडले... माझ्या डोक्यातून भळाभळा रक्त वाहत होते.... त्यांना वाटले कि मी मेले... मग नंतर त्यांनी मला जाळायचे ठरवले.... पण जळत असतानाच मी शुद्धीवर आले आणि ओरडू लागले.... मी ओरडत असल्याचे पाहून ते घाबरले कि कोणीतरी माझ्या किंचाळ्या ऐकतील म्हणून त्यांनी परत मला विझवले आणि मला जिवंतच बाथरूम खोदून त्यात पुरले....  दुसऱ्या दिवशी शेजारच्या गावातील फरशीवाला आणि प्लंबरवाला आणून सर्व पॅक करून घेतले.... बहुतेक तो कॅमेरा विहिरीत पडला आणि खराब झाला असेल.... आणि कदाचित त्यांना मिळाला असेल आणि त्यांनी तो एकमेव पुरावा नाहीसा केला असेल... आणि त्यांना अडकवायचा एकच पुरावा माझ्याकडे होता.... आणि तोही नाहीसा झाला.... त्यामुळे मीही कॅमेरा नाही शोधला.... 

मला मारलं ह्याच काही नाही रे... पण त्यांनी माझ्या न जन्माला आलेल्या बाळालाही मारले त्याचबरोबर माझ्या नवऱ्यालाही मारले.... आणि त्या मुलींनाही त्यांनी काहीतरी केलं असेल.... माझी एकच ईच्छा होती कि, मी आई होणार आहे, हे माझ्या नवऱ्याला मला सांगायचं होत.... 

ह्या सर्वांचा बदला मी घेणारच आहे.... मी त्या नराधमांना सर्वांना मारणार आहे... आणि जोपर्यंत तुम्ही माझी हि ईच्छा पूर्ण करत नाही तोपर्यंत मी तुम्हालाही इथून सोडणार नाही.... आणि माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या आत्म्यालाही मोक्ष मिळणार नाही... आमचे आत्मे इथेच भटकत राहतील कायमचे... कृपा करून मला मदत करा आणि त्या मुलींच त्यांनी काय केलं आहे त्याचा शोध लावा.... मी इथून बाहेर नाही पडू शकत कारण फार्महाऊसच्या समोर तुळशीचे वृन्दावन आहे आणि फार्महाऊसच्या तीनही बाजूला तुळशीची पवित्र रोपे आहेत.... तसेच मागील बाजूला जो झरा आहे त्यात मंदिरातले अभिषेकाचे पवित्र पाणी मिसळत असते... ह्या सर्व पवित्र गोष्टींनी माझ्या आत्म्याला जखडून ठेवलाय त्यामुळे मला कुठेच बाहेर जाता येत नाही.... नाहीतर मी कधीच त्यांना संपवलं असत.... 

अविनाश मधुमिताच्या आत्म्याला म्हणाला, " हे बघ मधुमिता ताई आम्ही तुला सर्वोतोपरी मदत करू पण एक अट आहे कि तू त्या गुंडांना किंवा विजूला काही करणार नाहीस..."

मधुमिता म्हणाली, " हे कस शक्य आहे... त्या लोकांना मारल्याशिवाय मला मुक्ती नाही भेटणार... " 

सायली मधुमिताला म्हणाली, " आम्ही तुझे दुःख समजु शकतो, पण त्या लोकांना मारणे हा त्यावरील उपाय नाही.... आणि त्यांना तू मारलस तर आपल्याला कस कळणार कि त्यांनी त्या व गावातील इत्तर मुलींसोबत काय केलं ते.... आणि पोलीस आहेत कि.... त्यांना फासावर चढवू आपण... "

मधुमिताचा आत्मा म्हणाला, " ठीक आहे पण जोपर्यंत माझी इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही गाव सोडून कुठे जाणार नाही असे मला वचन द्या... आणि मनोहर काकांना ह्यातील काही सांगू नका त्यांना धक्का बसेल"
यावर सर्वजण हो म्हणाले

अविनाश म्हणाला, " माझा एक मित्र पोलीस आहे... मी त्याला इकडे बोलावून घेतो... त्यानंतर आपण त्याच्याशी चर्चा करून हा प्रश्न सोडवू आणि त्या लोकांना बेड्यात अडकवू.... फक्त मला सांग कि तू कुठे पडली होतीस म्हणजे आम्हाला तो कॅमेरा मिळतो का बघता येईल... सकाळी आम्ही त्याचा शोध घेऊ... आणि विजूला इकडे आणून त्याच्याकडून सर्व गोष्टींचा छडा कसा लावायचा ते आम्ही सर्व मिळून ठरवू... तू हि एक वचन दे कि तो इकडे आला तर तू त्याला काही करणार नाहीस म्हणून... "

हे सर्वजण आपल्यासाठी इतका प्रयत्न करत आहेत म्हंटल्यावर मधुमिताने त्यांना वचन दिले.... इतक्यात घड्याळात ३ वाजून गेले होते... आता मधुमिताची आजची वेळ संपत आली होती.... मधुमिताने सर्वांना ती जाणार असल्याचे सांगितले आणि तो ग्लास परत सरकत "बाय" वर गेला आणि मधुमिताचा आत्मा गायब झाला.... हे सर्व ऐकून सर्वांचे मन अगदी सुन्न झाले होते.... किती निर्दयी असतात लोक पैशासाठी तीन तीन निरागस जीवांचा त्यांनी बळी घेतला आणि त्या मुलींचेही काय केले असेल????... 

सर्वांना त्यानंतर झोप नाही लागली.... सकाळी उजेड पडल्या पडल्याच सर्वजण विहिरीकडे पळाले आणि त्यांची कॅमेरा शोधण्याची मोहीम चालू झाली... ते सगळीकडे कॅमेरा शोधत होते पण त्यांना काही केल्या तो सापडतच नव्हता... आणि पूर्वाचे लक्ष विहिरीत आडव्या आलेल्या झाडाच्या फांदीकडे गेले.... तिथे कोणतीतरी वस्तू दोन फांद्यांच्या मध्ये लटकत होती.... खरंतर ती वस्तू दोन दिवसांपूर्वी तिथे दिसत नव्हती पण अचानकच ती आज दिसू लागली होती... सर्वांनी आत वाकून पहिले, जगदीशने आंबे काढायची मोठी अकडा काठी आणली आणि तो ती वस्तू बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागला... आणि पाहतो तो काय तो सुभाषचा कॅमेरा होता... त्यांनी तो चालू करण्याचा प्रयत्न केला पण तो चालू होत नव्हता... 

मग अदवैत्य म्हणाला, " हे बघा कोणीतरी शहरात जाऊन हा कॅमेरा दुरुस्त करून आणावयास हवा... आणि येताना माझ्या बाबांना घेऊन या... कारण ह्या दोघांच्या आत्म्यांना मुक्ती कशी द्यायची हे फक्त माझे बाबाच सांगू शकतात... "

जगदीश म्हणाला, " ठीक आहे... मी शहरात  जातो आणि कॅमेरा दुरुस्त होतो का हे पाहतो.... "

अविनाशने आपल्या पोलीस मित्राला फोन करून बोलावून घेतले.... अविनाशच्या पोलीस मित्र संजय त्या ठिकाणी आला... आणि त्याला अविनाशने  सर्व अहवाल सांगितला... त्याला कोणत्याच गोष्टीवर काही केल्या विश्वास बसत नव्हता तरी पण एक मित्र ह्या नात्याने त्याने त्यांच्या शोधकार्यात त्यांना मदत करायचे ठरवले.... पण तो म्हणाला मलाही मधुमिता ताईला बघायचे आहे आणि त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत... तिच्याशी बोलल्यानंतरच पुढचा सापळा रचू.... मला मुली गायब होतात हे माहिती होत... पण गावात आल्यानंतर एकही गाववाला मला योग्य उत्तर देत नव्हता... आणि त्यांच्या अशा वागण्यावरूनच मला कळले कि... इथे काहीतरी गडबड आहे... आणि मुलीना गायब करण्यात गावातील मोठी राजकारणी व्यक्तीचाच हात असणार... हे लोक त्यांना घाबरत असल्यामुळे ते ह्या प्रकरणाबद्दल कोणालाही काही सांगणार नाहीत याची मला खात्री होती.... 

अविनाश म्हणाला, " ठीक आहे आपण तिला इथे रात्री बोलावून घेऊ... "

क्रमश..... 

लेखिका - सौ. अनुष्का हणमसागर 
© Anu Swapn Blog
 

पुढे काय घडले हे वाचण्यासाठी मधुमिता - एक भयकथा - भाग 7 साठी कंमेंट करा... लाईक करा...

(टीप - वरील लेखाचे सर्व अधिकार हे लेखिकेकडे अबाधित आहेत.... जर कोणी हे लिखाण आपल्या लेखनात जसेच्या तसे वापरले तर कॉपी राईट होऊ शकते.... वरील लेखन हे कोणतीही अंधश्रद्धा पसरविण्यासाठी केले नाही... हि एक मनोरंजन कथा आहे... जरी लेखन शेअर करावयाचे असल्यास वेबसाईट लिंक सहित शेअर करावेत... ह्यातील व्यक्ती आणि कथा काल्पनिक आहेत आणि जरी ह्या कोणाच्या आयुष्याशी मिळत्या जुळत्या असतील तर तो केवळ योगायोग समजावा... धन्यवाद)







  • Share This:  
Email ThisBlogThis!Share to XShare to Facebook
Newer Post Older Post Home

2 comments:

  1. SnehalAugust 14, 2020 at 5:50 PM

    👍

    ReplyDelete
    Replies
      Reply
  2. SwapnilAugust 15, 2020 at 7:34 PM

    Best 👍

    ReplyDelete
    Replies
      Reply
Add comment
Load more...

Popular Posts

  • FARMER POEM एका शेतकऱ्याचे मनोगत
  • Sad love quote / विरह
  • BEST BLOGGING NICHE 2021
  • # मधुमिता - एक भयकथा - अंतिम भाग# - horror stories in marathi
ANU SWAPN BLOG

Translate

Categories

  • article
  • International women's day 2021
  • Love Quotes in Marathi
  • poem
  • Quote
  • Tech & Educational

Blog Archive

  • May 2022 (1)
  • March 2022 (1)
  • April 2021 (1)
  • March 2021 (3)
  • February 2021 (1)
  • November 2020 (1)
  • September 2020 (5)
  • August 2020 (5)
  • July 2020 (5)
  • June 2020 (2)
  • May 2020 (8)
  • April 2020 (3)

Anu Swapn blog

This blog is created for only entertainment and knowledge purpose.
Disclaimer | Contact us | Privacy Policy | Terms of us

Copyright © ANU SWAPN BLOG | Powered by Blogger